विज मोटर व केबल चोरांचा बंदोबस्त करावा- शेतकऱ्यांची मागणी
श्रीरामपूर( प्रतिनिधी)- तालुक्यातील प्रवरा नदीवर शेतकऱ्यांनी टाकलेल्या वीज मोटार
व केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशा
मागणीचे निवेदन मांडवे फत्याबाद कुरणपूर कडीत येथील ग्रामस्थांनी कोल्हार पोलीस
स्टेशनला दिलेले आहे पोलिसांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की आम्ही
प्रवरा नदीवर वीज मोटर टाकून शेती करता पाणीपुरवठा करत असतो गेल्या चार
महिन्यापूर्वी प्रवरां नदीवरील वीज मोटार त्याचबरोबर वीज मोटारीच्या केबल चोरी
गेलेल्या होत्या त्यावेळी आम्ही तक्रार दाखल केली नाही त्याचाच परिणाम पुन्हा एकदा
प्रवरा नदीवर बसविलेल्या विज मोटारी त्याचबरोबर मोटारीच्या केबल चोरट्यांनी चोरुन
नेल्या असून या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा काही महिन्यापूर्वी कुरणपूर
परिसरातील शेतकऱ्यांच्या देखील अशाच पद्धतीने केबल चोरून नेण्यात आलेल्या होत्या हे
चोरटे चार चाकी वाहनातून येऊन केबल चोरी करतात त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात
नुकसान होते अगोदरच पावसाने व्यत्यय आणल्यामुळे शेतकरी अडचणी सापडलेला आहे त्यातच
मोटारीच्या केबल व विज मोटारी चोरी गेल्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे
त्यामुळे या चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
.पोलिसांना दिलेल्या या निवेदनावर सर्वश्री भाऊसाहेब वडीतके , जगन्नाथ चितळकर,
शहाजी वडीतके, नंदकुमार चितळकर, उद्धव जोशी, अण्णासाहेब गेठे, बाबासाहेब चितळकर,
मुनीर पिंजारी, बबनराव वडीतके, नरेंद्र जोशी, मच्छिंद्र तांबे, संदीप चितळकर, संपत
चितळकर, सुधाकर जोशी, सोन्याबापू वडीतके आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत
Post a Comment