बेलापूर ग्रामंचायतीच्या वतीने रविवारी शाडू गणपती मुर्ती बनविणेची कार्यशाळा
बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार(दि.१७)रोजी स.९ वा. रयत शिक्षण संस्था,सातारा येथील ख्यातनाम कलाशिक्षक राजेन्द्र घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शाडु मातीच्या गणपती मुर्ती बनविण्याची कार्यशाळा'आयोजित करण्यात आली आहे. शाडु मातीच्या गणपती मुर्ती पर्यारणपुरक मानल्या जातात.याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणेच्या हेतूने सदरच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार १७ आॕगष्ट रोजी सकाळी ९ वा. श्री.संत सावता महाराज मंदिर(अरुणकुमार वैद्य पथ)येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात फक्त बेलापूर-ऐनतपूर येथील विद्यार्थी सहभागी होवू शकतील.प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १००विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल.शाडू माती आयोजक देतील तर पाण्यासाठी आवश्यक भांडे विद्यार्थ्याने सोबत आणावे. नाव नोंदणीसाठी ग्रामपंचायत बेलापूर कार्यालयात सचिन साळुंके(९६५७७११००१),प्रमोद जनरल स्टोअर्सचे हेमंत मुथा(८३०८४८०९,व सुदर्शन सुपर शाॕपीचे सुधीर करवा (९०११७९४४९८)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत बेलापूर बुll व सत्यमेव ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment