Latest Post

कोपरगांव (गौरव डेंगळे): 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आत्मा मालक क्रीडा संकुल येथे पहिली राष्ट्रीय 3A साईड राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये पुरुष विभागात व महिला विभागात तेलंगा संघाने विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट संपादन केला.

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतातून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक,गुजरात, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, पाँडिचेरी,उत्तर प्रदेश,देहू दमन या राज्यातून १५० खेळाडूंसह २५ स्पर्धा अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

राष्ट्रीय स्पर्धा दोन गटांमध्ये खेळण्यात आली होती.१४ वर्षाखालील मुला-मुलींचा गट तर पुरुष व महिला खुला गट.

तीन दिवस रंगलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाच्या मुला मुलींच्या गटांमध्ये दमन संघाने विजेतेपद पटकावले. पुरुष व महिला गटामध्ये तेलंगणा संघाने दुहेरी विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोपरगावचे तहसीलदार श्री महेश सावंत, आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, पत्रकार श्री स्वामीराज कुलथे,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू, सचिव श्री मारुती हजारे,नितीन बलराज,शैलेंद्र त्रिपाठी आधीच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून एस निसंग व योगेश तावडे यांनी काम बघितले.सामना अधिकारी म्हणून श्री लक्ष्मण,बी भरत,जी किरण व एम चंद्र यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून रुचन्द्र कुमार  व पंकज वेंगला यांनी जबाबदारी संभाळली. दुसरी राष्ट्रीय 3A साईड व्हॉलीबॉल स्पर्धा ही डिसेंबर महिन्यात तेलंगणा राज्यात रंगणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.


*3A राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:*


*१४ वर्षाखालील मुले:*

प्रथम क्रमांक: दमन 

द्वितीय क्रमांक: कर्नाटक

तृतीय क्रमांक: महाराष्ट्र 


*१४ वर्षाखालील मुली:*

प्रथम क्रमांक: दमन 

द्वितीय क्रमांक: आंध्र प्रदेश

तृतीय क्रमांक: महाराष्ट्र 


*पुरुष:*

प्रथम क्रमांक: तेलंगणा

द्वितीय क्रमांक: पांडिचेरी

तृतीय क्रमांक: पंजाब


*महिला:*

प्रथम क्रमांक: तेलंगणा

द्वितीय क्रमांक: देहू दमन

तृतीय क्रमांक: छत्तीसगड

कोपरगाव ( गौरव डेंगळे): आई-वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जगातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असतात.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य देखील शिक्षक करत असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जगातील प्रत्येक घडामोडीचा ज्ञान अवगत होण्याकरिता शिक्षक कायम प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थी कक्षामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे प्रतिपादन  सर्जेराव मते यांनी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानादरम्यान बोलताना केले.

श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवता असते. आज इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते सर्जेराव मते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.मते यांनी आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना संत तुकारामाच्या अभंगवाणीतून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी मन प्रसन्न करून अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला चांगले यश मिळेल हे सांगितले त्यासाठी सर्वांनी पहाटे सकाळी लवकर उठून आळस झटकून अभ्यास करावा हे सांगितले तसेच परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवावा व नंतर बाकीचे प्रश्न सोडवावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते मते यांचे शाळेच्या वतीने प्राचार्य के एल वाकचौरे यांनी स्वागत केले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अक्षदा ढवळे हिने केले. 

मते यांनी अगदी गमतीदार पद्धतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मुद्दे मांडून विद्यार्थ्यांची उत्सुकता शेवटपर्यंत उत्साही ठेवली.

कोपरगाव (गौरव डेंगळे) : नुकत्याच पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १ रोप्य ५ कास्य पदक पटकावली. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये रोप्य , तर मनु भाकर, सरबजीत सिंग, स्वप्नील कुसळे,अमन शेरावत तर भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले.हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सह वरील पाच खेळाडूंचे खडू चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे चित्रकार श्री मंगेश गायकवाड पाटील यांनी रेखाटले.७८ व्या स्वातंत्र्यदिनी पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेले चित्र कोपरगाव मध्ये प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक जण या पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेल्या चित्राबरोबर सेल्फी व फोटो घेऊ लागला.माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की पदक विजेते सर्व खेळाडू ग्रामीण भागातले असून युवा विद्यार्थ्यांनी या खेळाकडून प्रेरणा घेऊन मैदानावर मेहनत करून आपल्या राज्याचे व देशाचे नाव उज्वल करावे, जेणेकरून आगामी काळामध्ये आपल्यापैकीही कोणी विद्यार्थी राज्याकडून व देशाकडून खेळताना पदक जिंकेल व मला त्यांचा फोटो काढण्याची संधी मिळेल. पदक विजेते खेळाडू म्हणजे भारताचा गौरव आहे व या खेळाडूंचा छोटासा गौरव मी माझ्या चित्राच्या माध्यमातून करत आहे असे ते पुढे म्हणाले. सुंदर असे रेखाटलेले चित्रांचे कौतुक शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,सर्व सुपरवायझर प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नैथिलीन फर्नांडिस व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव (गौरव डेंगळे) : आजच्या युगामध्ये सर्वजण आपल्या स्वतःचा स्वार्थ व हितासाठीच लढत आहे.देवाने मनुष्य जीवाला सर्व गोष्टी दिलेल्या असताना देखील मनुष्य दुसऱ्याच्या मदतीला धावताना देखील विचार करायला लागला आहे.पण शारदा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे यांनी एक उपक्रम हाती घेतला.या उपक्रमामध्ये लायन्स क्लब संचलित मूकबधिर विद्यालयाला शाळेच्या इयत्ता नववी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली व या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मूकबधिर विद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांचं दिनचर्या शारदा शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली. यामध्ये त्यांच्या मूक बधिर संकेत खुणा,चिन्हाची भाषा हे कसे मूक बधिर विद्यार्थ्यांना शिकवले जाते याचा देखील शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. हेच नव्हे तर या भेटीतून शाळेतील विद्यार्थ्यांना या मूकबधिर विद्यार्थ्यांप्रती आपुलकी वाटली व त्यांना काहीतरी आपण भेट दिली पाहिजे असे सर्वांच्या मनात आले. मनातच नाही तर या विद्यार्थ्यांनी तसेच शाळेच्या शिक्षकांनी या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व क्रीडा साहित्य भेट दिले.१५ ऑगस्ट पूर्वी दिलेल्या हे साहित्य बघितल्यानंतर या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य वाकचौरे म्हणाले की समाजातील प्रत्येकाने मूकबधिर विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी.या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे असला पाहिजे.सर्वांनीच एक दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे. आम्ही केलेली ही सुरुवात असून आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या इयत्तेचे वर्ग क्षेत्रभेटीसाठी आपल्याकडे घेऊन येणार असे ते पुढे म्हणाले.यावेळी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक गोलवड, गायकवाड,टिक्कल,डुकरे,पाचोरे,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,क्रीडाध्यक्ष धनंजय देवकर, क्षेत्रभेट प्रमुख विशाल आल्हाट

आदी उपस्थित होते.

कोपरगाव (गौरव डेंगळे): जनसन्मान यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोपरगाव येथे आले असताना श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक मंगेश गायकवाड यांनी दादांना चार्कॉल पेंटिंग भेट दिली.यावेळी दादांनी गायकवाड यांना प्रश्न विचारला की ही पेंटिंग नक्की माझ्यासाठीच का? यावेळी मंचावर हशा पिकला.

गायकवाड यांनी भेट दिलेली पेंटिंग ही एका तासात चार्कॉलच्या साह्याने बनवली.पेंटिंग उघडली असता मंचावरील सर्व उपस्थित दादांचे चित्र बघून भारावून गेले. दादांनी चित्रकार गायकवाड यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी खासदार सुनिल तटकरे,आमदार आशुतोषदादा काळे,कोपरगावचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अध्यक्ष श्री धनंजय देवकर,संगीत शिक्षक दिग्विजय भोरे आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी श्री हरिहर केशव गोविंद भगवानांच्या जलाभिषेकासाठी पुणतांबा येथुन गंगेचे पाणी घेवुन आलेल्या कावडीचे बेलापुर ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने पारंपारिक वाद्याच्या जयघोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले. बेलापुरचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांना श्रावणातील दुसऱ्या सोमवारी पुणतांबा येथुन पवित्र गंगेचे जल आणुन श्री  हरिहर केशव गोविंद भगवानांचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. या ही वर्षी गावातील तरुण गंगाजल आणण्यासाठी पुणतांबा येथे गेले होते .तेथुन जल घेवुन पायी चालत पहाटे साडेचार वाजता ते बेलापुरातील विजय स्तंभाजवळ पोहोचले .बाजार सामितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,पत्रकार देविदास देसाई, विष्णूपंत डावरे, तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी,विशाल आंबेकर,राधेशाम आंबीलवादे राजेंद्र राशिनकर,प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले आदिनी कावडीचे स्वागत केले.त्यानंतर बँण्ड पथकाच्या जयघोषात श्री हरिहरकेशव गोविंद मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली.गावातील महीला भगीनींनी जागोजागी सडा रांगोळी काढल्या तसेच पवित्र जल घेवुन आलेल्या कावडी धारकांची आरती करुन जल पुजन करण्यात आले.त्यानंतर पवित्र गंगेच्या जलाने भगवान श्री हरिहर केशव गोवींदाना अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर महाआरती करण्यात आली.बऱ्याच वर्षानंतर अशा प्रकारे जल घेवुन आलेल्या युवकांचे स्वागत ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आल्याचे पाहुन गंगेचे जल घेवुन आलेल्या तरुणांचा उत्साह वाढला होता.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): कोपरगांवमध्ये भारत माता की जय,वंदे मातरम, सायकल रॅलीने शहर दुमदुमले.घरोघरी तिरंगा फडकवण्याच्या मोहिमेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सायकल रॅली काढली.

७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उत्साही सायकलपटूंनी त्यांच्या डॅशबोर्डवर तिरंगा फडकवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री शारदा स्कूल पर्यंत तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये शाळेतील १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाला प्रोत्साहन दिले.सायकल रॅलीमुळे आज कोपरगाव नगरी हे तिरंगामै झालेली दिसून आली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget