Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने

पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन  नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश वारुळे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशांनी मिळून शेतकरी, शेतमजुर असे वेशांतर करुन
संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले याने त्याचे नाव 1) कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख, सांगीतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली आसता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये 6 गावठी बनावटीचे कट्टे व 12 जिवंत काडतूस मिळून आले
बारकाईन चौकशी करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे सांगितले.
सदर घटने बाबत पोहेकॉ संदीप कचरु पवार, ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई  पोलीस स्टेशन गु.र.नं. 143/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बेलापुर प्रतिनिधी -जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली दत्तात्रय डहाळे रा. शिर्डी हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी बाजारतळ, बेलापुर येथे येणार आहेत  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने

 अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ / २१४५ मनोहर सिताराम गोसावी, पोहेकॉ / २१६४ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पोहेकॉ/८७२ सुरेश माळी, पोहेकॉ/संदिप घोडके पोना / विशाल दळवी,पोना/ शंकर चौधरी,पोना/दिलीप शिंदे, पोना/संदिप  चव्हाण पोकों / सागर  ससाणे, पोकॉ/ रोहित येमुल पोकों / रणजित  जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, चापोहेकॉ / अर्जुन बडे अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बेलापुर येथील बाजारतळ येथे जावुन सापळा लावुन 

 रेकॉर्डवरील इसम नामे दत्तात्रय डहाळे व त्याचे सोबत एक इसम बेलापुर बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे (१) दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा. श्रीराम नगर, शिर्डी, (२) सुलतान फत्तेमोहमद शेख वय २९ रा. महलगल्ली, बेलापुर असे असल्याचे सांगीतले.

त्यांचे अंगझडतीत एकुण १,४५,७००/- रु. किमतीचा मुददेमाल त्यात ०४ देशी बनावटीचे पिस्टल, ८ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल वरील नमुद दोन्ही इसमांचे कब्जात मिळून आला आहे.

       दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा. श्रीराम नगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी औरंगाबाद जिल्हयात अग्नीशस्त्र सह एक तसेच खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर घटने बाबत पोहेकॉ / मनोहर सिताराम गोसावी नेम. स्थागुशा, अहमदनगर यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदा यांनी केलेली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री  स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र बेलापुर या ठिकाणी स्वामी समर्थ प्रगट दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.                स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त बेलापुर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात सकाळी आरती त्यांनंतर स्वामी चरित्र वाचन नंतर आरती  व शेवटी सहभोजन सायंकाळी पत्रकार देविदास देसाई व प्रतिभा देसाई यांच्या हस्ते आरती असा कार्यक्रम संपन्न झाला स्वामी समर्थ महाराजाच्या प्रगट दिनास परिसरातील सेवेकरी महीला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विठ्ठल गाढे यांनी सर्व सेवेकऱ्यांचे आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील निर्मला रामराव नागले वय वर्ष ६६ या गेल्या वीस दिवसापासून बेपत्ता असुन कुणाला आढळल्यास बेलापुर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे अवाहन निर्मला नागले यांच्या नातेवाईकांनी केली आहे .                 निर्मला नागले या भोळसर स्वभावाच्या असुन वीस दिवसापासून त्या बेपत्ता झालेल्या आहेत त्यांची सर्वत्र शोधाशोध केली परंतु त्या आढळून न आल्यामुळे बेलापुर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद देण्यात आली असुन रंग सावळा उंची पाच फुट डोक्यावरील केस काळे पांढरे असुन त्यांच्या अंगात निळ्या रंगाची साडी आहे सदर वर्णनाची महीला कोठे आढळल्यास बेलापुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे अवाहन नागले कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे

बेलापूरःमहिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम होत असून महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन  महिलांनी  सक्षम व आत्मनिर्भर बनावे असे मत बेलापूर बु चे उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी केले.        बेलापूर बुll येथील स्वरांजली महिला बचत गटाच्या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर अंतर्गत, प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र, राहुरीच्या वतीने,पुणे येथील श्री सिध्दी ऍग्रोटेक लिमिटेड कडून औजार बँकेचे वाटप करण्यात आले यावेळी  ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावकरी पतसंस्थेचे संचालक रावसाहेब अमोलिक हे होते.

स्वरांजली महिला बचत गटाच्या महिलांना सात लाख किमतीची कडबा कुट्टी, फवारणी यंत्र, घरघंटी,पेरणी यंत्र आदी शेती उपयोगी विविध औजारांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री.खंडागळे म्हणाले की,ग्रामीण महिला ह्या मुख्यता प्रपंचाचा गाडा हाकतात.ग्रामीण महिला ह्या मुळातच कष्टाळू असतात.बहुतांश ग्रामीण महिला ह्या शेती व्यवसायाशी निगडीत असतात.अनेक महिला शेतीत प्रत्यक्ष राबतात.अशा महिलांना औजार बँकेव्दारे उपलब्ध झालेल्या औजारांचा निश्चितच लाभ होईल.सदरची औजारे सदर महिलांना भाडेतत्वावरही देता येतील आणि त्यातून अर्थार्जन करता येईल.सदरची औजारे बचत गटांस दिल्याबद्दल श्री.खंडागळे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळास धन्यवाद दिले.                               यावेळी म.आ.वि.महामंडळाचे व्यवस्थापक महेश अबुज व बचत गटाच्या मार्गदर्शिक कल्पना काळे यांनी सदर योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर योगेश्वर झावरे,अतुल दौले व राम झेंडे यांनी औजाराबाबत व त्याच्या वापराबाबत माहिती दिली. कार्यक्रमास स्वरांजली महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री शशिकांत तेलोरे,

निकिता तेलोरे,सविता गायकवाड ,रंजना पवार,वंदना पवार ,तरन्नुम सय्यद,नंदा पोपळघट,लता पोपळघट, निर्मला पोपळघट,नूतन पोपळघट, शशिकांत तेलोरे, पप्पू मांजरे, निशिकांत तेलोरे, रुपेश सिकची आदि उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )-अचानक आलेला अवकाळी पाऊस व झालेली गारपीट यामुळे या भागातील शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला असुन नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी केली आहे                         बेलापुर परिसरातील कुऱ्हे वस्ती दिघी रोड गोखलेवाडी खंडागळे वस्ती गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावासाने तडाखा दिला .अचानक झालेल्या निसार्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले आहे या नुकसानग्रस्त भागास बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक व्हा चेअरमन  पंडीतराव बोंबले राजेंद्र राशिनकर सुरेश कुऱ्हे नरेंद्र कुऱ्हे  वैभव कुऱ्हे शेषराव पवार राजेंद्र लगे भास्कर कुऱ्हे मल्हारी लगे आदिसह अनेकांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देवुन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी होती नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संप सुरु असला तरी मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात येतील हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मीळणे गरजेचे आहे .त्याकरीता शासनाने शेतकरीपुत्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे

बेलापूर(प्रतिनिधी)ः  -बेलापुर बु !! परिसरातील अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूल व दुग्धविकास मंञी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांनी महसूल विभागाच्या अधिका-यांना दिले असल्याची माहिती जि.प सदस्य शरद नवले तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी दिली आहे                                   शनिवारी बेलापूर शिवारातील कुऱ्हे वस्ती,दिघी रोड,गोखलेवाडी,खंडागळे वस्ती,गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावसाने तडाखा दिला.यात गहू,कांदा,हरभरा,ऊस,मका,द्राक्ष,टरबुज, डाळिंब आदि फळबाग व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची  जि. प. सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,संचालक महेश कुऱ्हे आदिंनी  शेतक-यांसह सर्वश्री नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर नागले,दत्ता साळुंके,अनिल वाबळे, श्रीहरी बारहाते,राहुल वाबळे,अर्जुन कुऱ्हे,जालिंदर कुऱ्हे,सुधाकर खंडागळे,मनोज मेहेत्रे,दादासाहेब कुऱ्हे,संतोष अमोलिक, प्रकाश मेहेत्रे, अशोक कुऱ्हे, नामदेव मेहेत्रे, कैलास कुऱ्हे,सोहम लगे,विलास कुऱ्हे,वृद्धेश्वर कुऱ्हे, किरण कुऱ्हे, अनिल कुऱ्हे, गोरक्षनाथ कुऱ्हे, सुनिल कुऱ्हे, राजधर खंडागळे, संजय भुजाडी, वाल्मिक भुजाडी, देवराम गाढे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, मका, ऊस, द्राक्ष, डाळिंब, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त भागाची पहाणी झाल्यानंतर  महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून नुकसानीची माहिती देण्यात आली तसेच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.या मागणीची दाखल घेत महसूल मंञी नामदार विखे पा.यांनी तातडीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.गावाचे लोकप्रतिनिधी तसेच महसूल मंञ्यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल आपदग्रस्त शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget