बेलापूर परिसरातील गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे महसूल मंञ्यांचे आदेश

बेलापूर(प्रतिनिधी)ः  -बेलापुर बु !! परिसरातील अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूल व दुग्धविकास मंञी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांनी महसूल विभागाच्या अधिका-यांना दिले असल्याची माहिती जि.प सदस्य शरद नवले तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी दिली आहे                                   शनिवारी बेलापूर शिवारातील कुऱ्हे वस्ती,दिघी रोड,गोखलेवाडी,खंडागळे वस्ती,गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावसाने तडाखा दिला.यात गहू,कांदा,हरभरा,ऊस,मका,द्राक्ष,टरबुज, डाळिंब आदि फळबाग व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची  जि. प. सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,संचालक महेश कुऱ्हे आदिंनी  शेतक-यांसह सर्वश्री नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर नागले,दत्ता साळुंके,अनिल वाबळे, श्रीहरी बारहाते,राहुल वाबळे,अर्जुन कुऱ्हे,जालिंदर कुऱ्हे,सुधाकर खंडागळे,मनोज मेहेत्रे,दादासाहेब कुऱ्हे,संतोष अमोलिक, प्रकाश मेहेत्रे, अशोक कुऱ्हे, नामदेव मेहेत्रे, कैलास कुऱ्हे,सोहम लगे,विलास कुऱ्हे,वृद्धेश्वर कुऱ्हे, किरण कुऱ्हे, अनिल कुऱ्हे, गोरक्षनाथ कुऱ्हे, सुनिल कुऱ्हे, राजधर खंडागळे, संजय भुजाडी, वाल्मिक भुजाडी, देवराम गाढे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, मका, ऊस, द्राक्ष, डाळिंब, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त भागाची पहाणी झाल्यानंतर  महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून नुकसानीची माहिती देण्यात आली तसेच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.या मागणीची दाखल घेत महसूल मंञी नामदार विखे पा.यांनी तातडीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.गावाचे लोकप्रतिनिधी तसेच महसूल मंञ्यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल आपदग्रस्त शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget