अवैध व्यवसायाविरोधात बेलापुर पोलीसांची मोठी कारवाई साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त
बेलापुर (प्रतिनिधी )-जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी बेलापुर पोलीसांच्या मदतीने प्रवरा नदीपात्रातुन होत असलेल्या बेकायदा वाळू वहातुक करणाऱ्या वहानावर मोठी कारवाई करुन सात लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला असुन तीन वहानावर कारवाई करण्यात आली आहे उक्कलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असुन लगेच गेल्यास वाळूची वहाने मिळून येतील अशी गुप्त खबर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली त्यांनी तातडीने आपले वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना सोबत घेवुन छापा टाकला असता तीन वहाने वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू वहातुक करताना आढळून आली पहील्या घटनेत रमेश धनवटे व अभिषेक किशोर गायकवाड रा उक्कलगाव हे प्रवरा नदीपात्रात नाव घाटाजवळ टाटा झेनाँन गाडी क्रमांक एमएच ४१ जी ९०७९ मधुन अवैधरित्यावाळु वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी २ लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वाहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपये किंमतीची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या बाबतची खबर पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिली दुसऱ्या घटनेत गणेश फुलपगार उक्कलगाव व सागर साळवे राहणार बेलापुर हे उक्कलगाव शिवारात झेनाँन क्रमांक एमएच १९ एस ७३९४ मधुन अवैधरित्या वाळू वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीसऱ्या घटनेत नाना बाळू गुंजाळ हा एक पांढऱ्या रंगाचा टाटा झेनाँन क्रमांक एमएच १५ ईजी १७० किंमत रुपये दोन लाख पन्नास हजार व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा असा एकुण ७ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन संबधीता विरोधात भा द वि कलम ३७९ सह भारतीय पर्यावरण संरक्षक कायदा कलम ३/१५ प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे करत आहेत [बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व सर्व सदस्यांनी गाव व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीसांनी मोठी कारवाई केली असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे ]
Post a Comment