स्वरांजली महिला बचत गटाच्या महिलांना सात लाख किमतीची कडबा कुट्टी, फवारणी यंत्र, घरघंटी,पेरणी यंत्र आदी शेती उपयोगी विविध औजारांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री.खंडागळे म्हणाले की,ग्रामीण महिला ह्या मुख्यता प्रपंचाचा गाडा हाकतात.ग्रामीण महिला ह्या मुळातच कष्टाळू असतात.बहुतांश ग्रामीण महिला ह्या शेती व्यवसायाशी निगडीत असतात.अनेक महिला शेतीत प्रत्यक्ष राबतात.अशा महिलांना औजार बँकेव्दारे उपलब्ध झालेल्या औजारांचा निश्चितच लाभ होईल.सदरची औजारे सदर महिलांना भाडेतत्वावरही देता येतील आणि त्यातून अर्थार्जन करता येईल.सदरची औजारे बचत गटांस दिल्याबद्दल श्री.खंडागळे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळास धन्यवाद दिले. यावेळी म.आ.वि.महामंडळाचे व्यवस्थापक महेश अबुज व बचत गटाच्या मार्गदर्शिक कल्पना काळे यांनी सदर योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर योगेश्वर झावरे,अतुल दौले व राम झेंडे यांनी औजाराबाबत व त्याच्या वापराबाबत माहिती दिली. कार्यक्रमास स्वरांजली महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री शशिकांत तेलोरे,
निकिता तेलोरे,सविता गायकवाड ,रंजना पवार,वंदना पवार ,तरन्नुम सय्यद,नंदा पोपळघट,लता पोपळघट, निर्मला पोपळघट,नूतन पोपळघट, शशिकांत तेलोरे, पप्पू मांजरे, निशिकांत तेलोरे, रुपेश सिकची आदि उपस्थित होते.
Post a Comment