Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना ज्या शाळा महाविद्यालय अडवणूक करेल अशा  शाळा/ महाविद्यालयीन विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना च्या वतीने करण्यात आली आहे ,

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या , वतीने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध स्वरुपांचे कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी काही वेळा अडवणूक होण्याची शक्यता  आहे. वेळेत कागदपत्र मिळत नाही उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर दाखला, जात पडताळणीचा दाखला, बोनाफाईड अशा विविध कागदपत्रांसाठी या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याच्या अनेक  तक्रारी येत  आहे. तसेच शाळा व कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतेवेळेस डोनेशनची मागणी केली जात आहे. अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त फी भरु शकत नाही. नियम बाह्य फी मिळत असल्याने शाळा व कॉलेजमध्ये , गर्भश्रीमंत मुलांना ऍडमिशनला, प्रथम प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्या शाळा व कॉलेज व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आत्ताच कुठे कारोनाची तिव्रता कमी असून शाळा व कॉलेजेस सुरु होताच मनमानी फी व डोनेशची आकारणी  सुरु केल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे पालक वर्ग हवालदिल झालेला आहे. काही सेतु चालकही दाखले देण्यिकरीता  अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत .तरी अशा सर्वावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे काहींना नोकरी नाही, व्यवसाय नाही त्यातच फी व डोनेशनची मागणी वाढत आहे. तसेच जे सेतु कार्यालय, शासकीय फी पेक्षा जास्त अतिरिक्त पैसे घेणार्या सेतू कार्यालयावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर मनसे जिल्हाध्क्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.आसा ईशारा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे या निवेदनावर मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  गणेश दिवसे,तालुकाध्यक्ष  गणेश रोकडे, शहराध्यक्ष विशाल लोंढे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, उपजिल्हाध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष प्रविण(आबा) रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, कामगार सेना तालुका अध्यक्ष सचिन पाळंदे, निलेश सोनवणे, संदीप विश्वंबर, अमोल साबणे, अक्षय सूर्यवंशी, विकी परदेशी, मंगेश जाधव, संकेत शेलार, रोहन गायकवाड, श्रीराम थोरात, जगन सुपेकर, अमोल ढाकणे, सागर भोंडगे, अक्षय अभंग, राहुल शिंदे, श्याम लांडे, प्रमोद शिंदे, किशोर बनसोडे, आधी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

अहमदनगर प्रतिनिधी -जिल्ह्यात १० जूलै २०२२ रोजी 'बकरी ईद' व‌ 'देवयानी आषाढी एकादशी' हे सण साजरा करण्यात येणार आहेत.त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने २८ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून ते ११ जूलैच्या रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.सध्या राज्याच्या राजकीय परिस्थितीमुळे निषेध मोर्चा, प्रती निषेधाच्या घटना चालू असून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, जोडे मारो आंदोलन तसेच

राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यालय तोडफोडीच्या घटना घडत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरती योजना अनुषंगाने संपूर्ण देशभरात विविध संघटनांचा विरोध चालू आहे.त्यामुळे विविध राजकीय पक्ष मोर्च, निषेध आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता‌रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात विविध दिंड्या, पालख्या आगमन व प्रस्थान तसेच इतर धार्मिक कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व त्यात समाविष्ट असलेल्या कलमांचा नियमन आदेश वरील कालावधीसाठी जारी करण्याचे अधिकार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत.असे ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-दि. 27.06.2022 रोजी 15.35 वा पोलीस निरक्षक श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन याना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे. प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपुर हा गावटी कटटा बाळगतो, तसेच तो खेरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई समर्थ मंगल कार्यालयाजवळ आहे अशी माहिती मिळालीतेव्हा श्री. मच्छिद्र खाडे, पोलीस निरीक्षक, श्री., अतुल बोरसे, पोसई पोना/1251। शेंगाळे, पोकां/ 173 सुनिल दिघे व चापोको.चैंदभाई पठाण अशानी दि. 27.06, 2022 रोजी 15.50 वा निमगाव खेरी ता श्रीरामपुर येथील शिवारातील खेरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई

समर्थ मंगल कार्यालया जवळ एक इसम आम्हाला उभा दिसला व तो आम्हा पोलीमांना पाहन 'पना लागला त्यावेळी त्याचेवर झडप घालुन पकडले. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत ऊर्फ पांड साइनाथ लेकुरवाळे रा खैरी निमगाव ता. श्रीरामपुर असे सांगितले आहे. त्याची अंगझडती घेतली असता तव्हा त्याचकड एक गावठी कटटा सुमारे 20,000/- रु किंमतीचा व 2 जिवंत काडतुस 1000/- रु किंमतीचे असा मुह्वमाल मिढुन आला आहे.सदरचा मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेवरुन प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खरी निमगाव ता. श्रीरामपुर यांचे विरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर 2102022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई. अतुल बोरसे हे करत आहेत.सदर आरोपी प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपुर यांचेवर खालील प्रमाणे गुन्हें दाखल आहेत,1) श्रीरामपुर ता पो स्टे I 83/ 2014 IPC 380,457 प्रमाणे 2) श्रीरामपुर ता पो स्टे 1 92/ 2014 1PC 399,402 प्रमाणे) नारायणगाव पो स्टे पुणे जिल्हा 1 52/ 2016 1PC 395,392 प्रमाणे महाराष्ट्र सघटीत गुन्हेगारी कायदा कलम 3(1),3(4) प्रमाणे 4) श्रीरामपुर ता पो स्टे I39/2018 IPC 399,402 प्रमाणे 5) श्रीरामपुर ता पो स्टे I113/2018 IPC 353,399,402 प्रमाणे 6) श्रीरामपुर ता पो स्टे 1 145/ 2018 IPC '399,402 प्रमाणे 7) श्रीरामपूर शहर पो स्टे 1922/ 2019 1PC 399,402 ऑर्म अँक्ट 4/25 प्रमाणे नमुद दाखल गुन्हयामध्ये मा. श्री. मनोज पपाटील साहेव, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. स्वाती भोर मेंडम,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि मा. श्री. संदिप मिटके साहेव, उपविभागिय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभागयांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे श्री. मच्छिद्र खाडे, पोलीस निरीक्षक, पोसई अतुल बोरसे, पोना 1251 अनिल शेंगाळे, पोकों। 73 सुनिल दिये चापोकों चाँदभाई पठाण यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-कोरोनाचे संकट टळू दे भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो असे मनोभावे साकडे पाडूरंगाला घालणार असल्याचे  अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणगिरीजी महाराज यांनी सांगितले अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या पालखी व दिंडीचे यश ट्रेलर व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले होते त्या वेळी बोलताना अरुणगिरीजी महाराज म्हणाले की या दिंडीचे हे बारावे वर्ष असुन अतिशय शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे .सर्व वारकऱ्यांना पांढरा पोषाख डोक्यावर टोपी असा गणवेश असुन पुरुष व महीला वारकरी स्वतंत्र वारीत चालत असतात कोरोनामुळे दोन वर्ष पायी दिंडी काढता आली नाही त्यामुळे आता वारकरी विठ्ठल पांडूरंगाच्या भेटीला आसुसलेला आहे .पांडूरंग सर्व भक्तांच्या ईच्छा पूर्ण करतील असा विश्वासही त्यांनी बोलुन दाखविला या वेळी मा ,जि प सदस्य शरद नवले यांनी देवस्थानला दिलेल्या निधीचा आवर्जुन उल्लेख करुन संस्थानला आणखी निधीची गरज असल्याचेही

अरुणगिरीजी महाराज म्हणाले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले माजी सरपंच भरत साळूंके खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड प्रकाश कुऱ्हे  पत्रकार' देविदास देसाई नवनाथ कुताळ यश ट्रेलरचे मालक उल्हास कुताळ कुंदन कुताळ वसंतराव कुताळ रविंद्र कुताळ दादासाहेब कुताळ विलास मेहेत्रे कन्हैय्या कुताळ यश कुताळ प्रकाश कुऱ्हे भाऊसाहेब वाबळे शशिकांत नवले चंद्रकांत नवले रफीक बागवान  आदिंनी पालखीचे स्वागत केले. बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करून ह.भ.प.अरूणगिरीजी महाराजांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,दिलीप दायमा,शिवदास दायमा, प्रकाश कु-हे,सचिन वाघ,समीर जहागिरदार,राजेंद्र कुताळ,नितीन नवले, सुभाष राशिनकर,कुंदन कुताळ, आदी उपस्थित होते

श्रीरामपूर प्रतिनिधी-बाभळेश्वर येथील विवाहितेचा रांजणखोल-खंडाळा शिवारात प्रवरा कॅनॉलमध्ये काल रविवारी मृतदेह आढळून आला. सासरच्या लोकांकडून तिचा घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.वैशाली उर्फ कल्याणी धीरज पाटोळकर (वय 34) असे या विवाहितेचे नाव आहे. काल रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास खंडाळा- रांजणखोल रोड येथील अचानकनगर भागात प्रवरा कॅनॉल मधील पुलाला अडकलेल्या अवस्थेत हिचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.खंडाळा-रांजणखोल शिवारात पाटाच्या पुलाला महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी रांजणखोलचे पोलीस पाटील कृष्णा अभंग यांना दिली. त्यांनी ही माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. शेलार, रघुवीर कारखिले, श्री. बोरसे फौजफाट्यासह हजर झाले. यावेळी महिलेच्या पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी तिचेे वडील व भाऊ यांनी केली.श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती येथील तिचे माहेर असून सासर बाभळेश्वर येथील आहे. कल्याणी उर्फ वैशाली हिचा पती धीरज पाटोळकर याचे तिच्यासोबत अनेकदा वाद होत होते. या वादातून पती धीरज पाटोळकर हा वैशाली हिला मारहाण करून तिचा राग करत होता. त्यामुळेच वैशाली हिचा पतीकडून घातपात झाला असावा, असा आरोप वैशाली हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दुपारी या विवाहितेवर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देताच अहमदनगर शहराचे पोलीस उपअधीक्षक यांचे पथक, एलसीबी आणि तोफखाना पोलिसांनी शुक्रवार, शनिवार हातभट्टी आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई केली.उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या पथकाने माळीवाडा वेस ते इम्पिरिअल चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. रोख रकमेसह 32 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार चालविणारे रोहित रवींद्र कदम आणि आकाश प्रकाश कदम (दोघे रा. माळीवाडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.बागडपट्टी येथे तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. 18 हजार 360 रुपयांची रोकड हस्तगत केली. दिलीप एकनाथ जाधव, गणेश प्रल्हाद चोभे, संजीव रामचंद्र राऊत, अमित अनिल कुमार, बिलाल मन्सुर शेख आणि मंगेश बाळासाहेब फुलसौंदर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीच्या पथकाने 16 तोटी कारंजा येथे अड्ड्यांवर कारवाई केली. आकाश बाबासाहेब ठोंबरे (वय 30 रा. वारूळाचा मारूती) आणि रितेश दिलीप लसगरे (वय 30 रा. मोची गल्ली) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नेप्ती नाका परिसरातील गणपती कारखान्याच्या मागे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करत चार हजार रुपयांची दारू नष्ट केली. याप्रकरणी कैलास संजय निकम (वय 28 रा. नेप्ती नाका) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक चाळ, रेल्वेस्टेशन येथील हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर एलसीबी पथकाने कारवाई केली. या कारवाईत साडेतीन हजारांची दारू नष्ट करण्यात आली. राजू खंडू आठवले (वय 45, रा. सारसनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामवाडी, बोल्हेगावातील संभाजीनगर आणि कोंड्यामामा चौकात सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. या तीन अड्ड्यांमधील चार हजारांची दारू नष्ट करण्यात आली. हाशिर शहीद शेख (वय 65 रा. रामवाडी झोपडपट्टी), संजय नामदेव कांबळे (वय 44 रा. बोल्हेगाव) आणि करण अर्जुन साळुंके (वय 24 रा. मंगलगेट) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बेलापूरः(प्रतिनिधी  )-येथील कु-हे वस्ती भागामध्ये कमी दाबाने तसेच खंडीत वीज पुरवठा होत असल्याने नविन रोहिञ(डी.पी)बसवावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलिंद दुधे यांचेकडे निवेदनाव्दारे केली. आहे                                  महावितरणला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर गावातील कु-हे वस्ती परिसरात असलेले रोहिञ ओव्हरलोड होते.यामुळे दाबनियमनात सातत्य राहात नाही.अनेकदा कमी दाबाने वीज पुरवठा होतो.यामुळे अनेकदा कृषीपंप जळतात.नियमीत दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पीकांना विहिरीस पाणी असून पाणी देता येत नाही.यामुळे पिकांचे नुकसान होते ,तसेच  वीज  नसल्याने वस्त्यांवरील लोकांना अंधारात राहावे लागते.यामुळे या परिसरात राञीच्यावेळी भितीचे वातावरण असते याकडे लक्ष वेधण्यात आले.त्यामुळे ह्या परिसरासठी नविन रोहिञ बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.                                याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन देण्यात आले होते या वेळी,गोरक्षनाथ कु-हे,केदारनाथ कु-हे ,मधुकर अनाप,तान्हाजी कु-हे ,कारभारी भगत,केशव कु-हे ,विशाल आंबेकर,अशोक कु-हे ,बापुसहेब कु-हे ,विजय कु-हे ,सुनिल जाधव,महेश कु-हे ,अमोल कु-हे ,महेश भगवान कु-हे ,प्रकाश साळुंके ,आदित्य बिगरे,सागर धनसिंग ,अक्षय पवार आदि उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget