महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या , वतीने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध स्वरुपांचे कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी काही वेळा अडवणूक होण्याची शक्यता आहे. वेळेत कागदपत्र मिळत नाही उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर दाखला, जात पडताळणीचा दाखला, बोनाफाईड अशा विविध कागदपत्रांसाठी या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहे. तसेच शाळा व कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतेवेळेस डोनेशनची मागणी केली जात आहे. अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त फी भरु शकत नाही. नियम बाह्य फी मिळत असल्याने शाळा व कॉलेजमध्ये , गर्भश्रीमंत मुलांना ऍडमिशनला, प्रथम प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्या शाळा व कॉलेज व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आत्ताच कुठे कारोनाची तिव्रता कमी असून शाळा व कॉलेजेस सुरु होताच मनमानी फी व डोनेशची आकारणी सुरु केल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे पालक वर्ग हवालदिल झालेला आहे. काही सेतु चालकही दाखले देण्यिकरीता अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत .तरी अशा सर्वावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे काहींना नोकरी नाही, व्यवसाय नाही त्यातच फी व डोनेशनची मागणी वाढत आहे. तसेच जे सेतु कार्यालय, शासकीय फी पेक्षा जास्त अतिरिक्त पैसे घेणार्या सेतू कार्यालयावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर मनसे जिल्हाध्क्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.आसा ईशारा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे या निवेदनावर मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे,तालुकाध्यक्ष गणेश रोकडे, शहराध्यक्ष विशाल लोंढे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, उपजिल्हाध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष प्रविण(आबा) रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, कामगार सेना तालुका अध्यक्ष सचिन पाळंदे, निलेश सोनवणे, संदीप विश्वंबर, अमोल साबणे, अक्षय सूर्यवंशी, विकी परदेशी, मंगेश जाधव, संकेत शेलार, रोहन गायकवाड, श्रीराम थोरात, जगन सुपेकर, अमोल ढाकणे, सागर भोंडगे, अक्षय अभंग, राहुल शिंदे, श्याम लांडे, प्रमोद शिंदे, किशोर बनसोडे, आधी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत
प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळा, महाविद्यालयावर कारवाई करावी मनसेची मागणी
बेलापुर (प्रतिनिधी )-विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना ज्या शाळा महाविद्यालय अडवणूक करेल अशा शाळा/ महाविद्यालयीन विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना च्या वतीने करण्यात आली आहे ,
Post a Comment