श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळच्या दरम्यान एका एजंटने काही लोकांना जमवून अधिकारी व कर्मचार्यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक एजंट व कर्मचारी त्यांच्यामध्ये काही कागदपत्र घेण्यावरून बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. त्या एजंटने बाहेरून काही लोकांना जमवून आणले. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद होत असल्याचे पाहून काही अधिकारी, कर्मचारी व एजंटसह गर्दी जमली. त्या एजंट्स व त्याने जमवलेल्या लोकांनी कर्मचारी अधिकार्यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. हा प्रकार पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.या घटनेची माहिती कळताच पोलीस त्या ठिकाणी आले. या प्रकरणाची पोलिसांनी सर्व माहिती घेतली. त्या एजंटला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे घर गाठले मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती .

Post a Comment