Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी:- प्रस्तुत बातमीतील हकीकत अशी की मौजे वाकडी.ता.राहाता शिवारातील वाकडी-राहता जाणारे लगत हॉटेल न्यू आनंद येथे ४ इसम जेवण करण्यासाठी दि.५/०५/२०२२ रोजी २.३० च्या सुमारास आले होते.जेवण उशिरा दिले असे मुद्दाम कारण पुढे करून हॉटेल चालक श्री.विजय हरिभाऊ चोळके यांच्या डोक्याला गावठी कट्ट्याचा तुंबा मारून त्यांना जखमी केले तसेच रुपये ५ लाखाची संध्याकाळपर्यंत व्यवस्था करा असे सांगून गावठी कट्टा मधून फायर करत असताना हॉटेलचालक विजय चाळके याने आरोपीचा हात पकडल्याने पुढील अनर्थ टळला,सदरची घटना ४.३० वाजेच्या सुमारास घडली. हॉटेल चालक विजय हरिभाऊ चोळके यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर I १३९/२०२२ भादविक ३९७,३८६,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी १) सतीश रावसाहेब वायदंडे(राहणार गणेश नगर वाकडी शिवार तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) २) रमेश तानाजी वायदंडे (राहणार गणेश नगर वाकडी शिवार तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) ३) गोरक्षनाथ लक्ष्मण भुसाळ(राहणार रामपूरवाडी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) ४) दत्तात्रय रामदास जगताप (राहणार रामपुरवाडी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून त्यांना त्यांची ओळख पटवून अल्पावधीतच अटक करण्यात आली आहे यातील आरोपी रमेश तानाजी वायदंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,मा.स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,आणि श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन निरीक्षक श्री.मच्छिंद्र खाडे,पोसई/संजय निकम,श्री.अतुल बोरसे,पोहेकॉ/राजेंद्र लवांडे पोहेकॉ/मोहन शिंदे,पोहेकॉ/अशोक आढागळे,पोना/प्रशांत रणवरे,पोना/आबासाहेब गोरे,पोना/दादा लोंढे,पोना/अनिल शेंगाळे,चापोना/ साजीद पठाण,पोकॉ/ सुनील दिघे,पोकॉ/ईप्तीकार सय्यद यांनी केली आहे.


कर्जत प्रतिनिधी – सर्वसामान्य नागरीकांवर दहशत करून शिवीगाळ करणे,मारहाण करणे, अल्पवयीन मुलींची छेड काढणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांतील मिरजगावमधील तिघांना कर्जत पोलिसांनी आता चांगलाच दणका दिला आहे.अशा गुन्हेगारांच्या विरोधात आता कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी मोहीम उभारली असून कोणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही असा अल्टिमेटमच त्यांनी दिला आहे.अविनाश महादेव मराळ (रा.मिरजगाव पिरगल्ली), प्रशांत दामोधर सोनवणे,निलेश कान्हू नवले (दोघे रा.मिरजगाव) कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस हवालदार बबन दहिफळे, प्रबोध हांचे, रवी वाघ, जितेंद्र सरोदे आदींनी ही कारवाई केली आहे.तिघां आरोपींवर विविध कलमान्वये कारवाई करून कर्जत पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे.विशेष म्हणजे या तिघांमधील एक आरोपी गेली दीड वर्षांपासून फरार झाला होता. त्यास देखील कर्जत पोलिसांनी अटक केली असून तो मागील दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीला अविनाश महादेव मराळ (रा.मिरजगाव पिरगल्ली) हा विनाकारण त्रास देत होता. मुलगी ही आपल्या घरासमोरून जात असताना आरोपीने तिची गाडी थांबवून तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून अश्लील वर्तन केले. त्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने तो तिला ओरडू नको, नाहीतर मी तुला सोडणार नाही असे म्हणून तो निघून गेला. आरोपी अविनाश मराळ यावर भा.द.वी कलम २२३,३५४ बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली असून त्यास मा. न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.तर करण ईश्वर पवार (रा.मिरजगाव) यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत दामोधर सोनवणे (रा.मिरजगाव) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीची आई मीरा ईश्वर पवार हिस विनाकारण अश्लील शिवीगाळ केली.शिवीगाळ का करतो?,असे विचारल्याने आरोपीला राग आल्याने त्याने त्याने फिर्यादिस शिव्या देत जवळ पडलेला दगड हातामध्ये घेऊन फिर्यादीच्या डाव्या पायावर व पाठीवर मारला.फिर्यादी घाबरून घरात गेला असता आरोपी त्याच्या मागे पळत जाऊन घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची आईमध्ये आली असता तिलाही चापटाने मारहाण करत तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. माझ्या नादी लागाल तर कोयत्याने हातपाय तोडीन अशी धमकी दिली.आरोपीवर भादवि कलम ३२४,४५२,३५४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-शेतातील पाणी वाटपावरून 22 वर्षापूर्वी खून करणारा सुधाकर पुंजाराम ढाकणे (वय 55 रा. ढाकणे वस्ती, शेवगााव) यास न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा भोगत असताना गेल्या आठ वर्षांपासून सुधाकर हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरू केला. तो अक्षयतृतीये सणासाठी आला असता, त्यास पथकाने जेरबंद केले.ढाकणेवस्ती येथे राहणारे सूर्यभान मोहन ढाकणे आणि सुधाकर पुंजाराम ढाकणे यांच्यात शेतातील पाणी वाटपाचे कारणावरून वाद होत होते. सुधाकर याने या वादातून 21 डिसेंबर 1998 रोजी सूर्यभान यास चाकुने वार करून जखमी केले होते. जखमी सूर्यभान यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे उपचारा दरम्यान अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. या गुन्ह्यात खुनाचे वाढील कलम लावण्यात आले होते.अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. आरोपी सुधाकर पुंजाराम ढाकणे याच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.सुधाकर याने शिक्षेविरूध्द औरंगाबाद खंडपीठात आपिल दाखल केले होते. खंडपीठात 28 जुलै 2014 रोजी आपिलात जन्मठेपेची शिक्षा कायम केली होती. तो तेव्हापासून फरार होता. उच्च न्यायालयाने आरोपीचा शोध घेण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिला होता. पोलीस निरीक्षक अनिल कटके विशेष पथकाची स्थापना केली होती.आरोपीचे मूळ गावी शेवगाव येथे जाऊन माहिती घेतली असताना तो पुणे किंवा मुंबई येथे राहत आहे. तो वारंवार वास्तव्याचे टिकाणे बदलून राहतो, अशी माहिती मिळाली. खबर्‍याकडून माहिती मिळाली की, तो अक्षय तृतीयाचे दिवशी वडिलांचे पित्र जेवू घालणे करिता आलेला आहे. परंतु, तो घरात थांबत नसून शेतात लपवून राहत आहे. अक्षय तृतीयेचा कार्यक्रम होताच पळून जाण्याच्या तयारीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास शेतात लपलेल्या अवस्थेत पकडले.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, दत्तात्रय गव्हाणे, फकीर शेख, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सुरेश माळी, संदीप दरंदले, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



घोटी प्रतिनिधी -इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना घोटी पोलीस व दोनही मशिद ट्रस्टच्या वतीने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आव्हानाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत समन्वयाने पहाटेची अजानाचा आवाज कमी करण्यात आला....उर्वरित अजान देतांना प्रार्थना स्थळाच्या आत भोंग्यांचा आवाज ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली. देशभरात अनेक जातीयवादी दंगे यापूर्वी झाले मात्र घोटी शहराने कायम हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.मनसेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, जामा मजिदचे ट्रस्टी डॉ. युनूस रंगरेज, शाही मजिदचे ट्रस्टी मुस्ताक पानसरे यांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच मनसेचे प्रताप जखेरे, निलेश जोशी, मनोज गोवर्धने, राजेश राखेचा, अर्जुन कर्पे, ऋषी शिंगाडे, निलेश बुधवारे, शुभम भगत, अमोल क्षीरसागर, बापू काळे, सचिन छत्रे, पिंटू गतिर आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी दोन्ही समाजाचे ऐक्याचे दर्शन  पाहून अभिनंदन केले.


श्रीरामपूर प्रतिनिधी - मस्जिदवरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे यासाठी मनसेच्यावतीने श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.दि.04.05.2022 रोजी बाबा हुसेन शिंदे यांचे नेतृत्वाखाली 33 कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करीत राधिका हॉटेल समोरील महाराष्ट्र नव निर्माण सेना कार्यालय येथून मोटारसायकलवर निघून निलायम हॉटेल, डावखर चौक मार्गे श्रीराम मंदीर येथे आले त्यानंतर सदर कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करीत पदयात्रेने सोनारगल्ली मार्गे शिवाजीरोड वरील

स्वदेशी चहा दुकानासमोर येवुन दि. 04.05.2022 रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी रोड वरील येणाऱ्या जाणाऱ्यांना रहदारीस अडथळा करुन घोषणाबाजी केली.या प्रसंगी मनसे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, डॉक्टर संजय नवथर, सागर बोंडगे,संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, निलेश सोनवणे,मच्छिंद्र हिंगमिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे,

रतन वर्मा,विकास शिंदे, मच्छिंद्र शिंदे,शुभम शिंदे मंगेश जाधव, अक्षय अभंग, रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कारले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे ,रोकडे आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाबा शिंदे व इतर कार्यकर्ते यांना फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 149 व महा.पो. का.क. 68 प्रमाणे सुचना पत्र दिलेले असतांना तसेच जिल्हा दंडाधिकारी, अहमदनगर यांचेकडील आदेश क्र. डी.सी/ कार्या/ 9ब1/ 986/2022 दि. 29.04.2022 अन्वये संपुर्ण अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सिमेच्या हददीत दि. 01.05.2022 ते दि. 05.05.2022 पावेतो कोणतीही परवानगी न घेता पदयात्रा काढून शिवाजी चौक येथे लाऊडस्पिकर लावुन लोकांची गर्दी जमवुन रहदारीस अडथळा निर्माण करुन मा. जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांचे आदेशाचा भंग केला. यावरून श्रीरामपुर शहर पोस्टे गुन्हा रजि नं  307/2022 भादवि कलम 341, 188, 34 सह महा.पो.अधिनियम 37 (1)(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.


अहमदनगर प्रतिनिधी -कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांचे कडुन घडले माणुसकीचे दर्शन कोतवालीने केले डॉनला चकाचक कोतवाली पोलीस स्टेशनच्या गेट समोर सुमारे १०-१२ वर्षा पासुन एक वेडसर इसम हा फाटके कपडे घालून अनेक दिवसांपासून राहुन भिक्षा मागून जीवन जगत आहे. तसेच त्याचे नखे, केस, दाढी वाढलेल्या अवस्थेत कोतवाली पोलीस स्टेशन व आशा टॉकीज परिसरात फिरतो त्या वरून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक . संपतराव शिंदे हे रोज सदर इसमाला पाहत असत. आज सकाळी सहज थांबून त्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अब्बास शेख उर्फ डॉन असे सांगीतले व माझे वडील व चुलते हे पोलीस खात्यात नोकरीला होते असे सांगीतले त्या मुळे सदरचा इसम हा मुस्लीम समाजाचा असल्याने पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचा स्टाफ यांची व आशा टॉकीज चौकातील गुलाम शेख व लालाभाई कुरेशी जाकीर शेख ( बोस) अन्सार शेख यांच्या मदतीने सदर इसमाची कटींग दाढी करून हातापायाचे नये कापुन त्यास आंधोळ घालून त्यास इंद सणाच्या अनुषंगाने त्यास नवीन पठाणी कपडे घालुन समाजात वावरता येईल अशी त्याची वेषभुषा करून तयार केलेले आहे तसेच कोतवाली पोलीस स्टेशन हदीमध्ये अशा प्रकार रोजचे जोवन व निवारा न मिळणार लोकांचा शोध घेवून त्यांना समाजामध्ये यावरण्या योग्य बनविण्याचा निश्चय केला आहे तसेच पोलीस खात्यामार्फत दिनदुबळ्यांची वेळो वेळी सेवा केली जात असते याचे माणुसकीचे दर्शन पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी घडविले आहे. 

अहमदनगर प्रतिनिधी-कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना  गुप्त बातमी दारा मार्फत माहीती मिळाली की , पंचम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव पंचम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव अ.नगर येथे एक इसम हा महाराष्ट्र राज्यात सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ कब्जात बाळगणे तसेच विक्री करण्यास प्रतिबंध असतांनातयार मावा विक्री करत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती त्यांना मिळाली होती  कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या आदेशाने पोना /योगेश भिंगारदिवे /पोकॉ सोमनाथ राउत/ पोकॉ अमोल गाडे पोकॉ/सुजय हिवाळे हे पथक केडगाव येथील पंचम पान शॉपी मधुन लोकाना पैसे घेवून त्याना पुडी देताना दिसला  २१/३० वा सुमारास छापा टाकुन त्यास पंचम पान शॉप पान टपरी मध्ये बसलेल्या इसमास जागीच पकडले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर असे सांगीतले त्याच वेळी तेथे एका मोपेड गाडीवर काळे रंगाच्या मोपेड गाडीवर एक इसम पांढरे रंगाची मोठी पिशवी घेवून पंचम पान शॉप जवळ आला त्या वेळी तात्काळ सदर इसमास पकडुन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विशाल संतोष भगत वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर असे सांगीतले व  जवळील पिशवी मध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली आहे ती मशीनवर मावा बनवणे कामी सागर सहाधु कोतकर यांचे जवळ आलो आहे असे सांगीतले त्या वरुन सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांचे कडे सुगंधीत तंबाखु व  माल  अक्षय बापु राहींज रा १५ ऑगस्ट कॉलनी भुषन नगर केडगाव ता जि अ नगर यांचे कडुन विकत घेतो असे सांगीतले त्यानंतर सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांनाझडतीचा उददेश समजावुन सांगुन त्याची व पंचम पान शॉप टपरीची व काळे रंगाच्या मोपेड गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुददेमाल मिळुन आला तो १ ) २०,००० / - रु किंमतीचे एक मावा बनविण्याचे लोखंडी मशीन व २ एचपी ची मोटार असलेली जु.वा. कि . अं . ( पंचम पानटपरी मध्ये मिळुन आली ) २ ) १,५०० / - रु किंमतीची एका पांढरे रंगाच्या गोणी मध्ये ३ किलो सुट्टी सुगंधी तंबाखुप्रती ५०० रु किलो दरा प्रमाणे किं . अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ३ ) १२०० / - रु किं ची बारीक कापलेली कत्री ( तुकडा ) सुपारी २ किलो अंदाजे प्रती प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ४ ) ६०० / - रु किंमतीचा तयार केलेला सुगंधीत मावा त्याचे वजन अंदाजे १ किलो व प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ५ ) ७५० / - रु किं ची विमल पान मसाला केसर युक्त असे छापलेला हिरवे रंगाचा पाकीटात प्रती पाकीट छापील दर १ ९ ८ रु व विक्री किंमत २५० रुपये प्रमाणे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) 10५ ) ४०,००० / - रु किं ची एक काळ रंगाची सुझुकी एक्सेस मोपेड मोटार सायकल तीच्या पाठीमागील बाजुस MH १६ CN ४ ९ ४ ९ असा क्रं असलेली जुवाकिअं ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कवज्यात मिळुन आली ) ६ ) ६,००० / - रु किंची सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली अंदाजे १० किलो वजनाची प्रती किलो ६०० रु दरा प्रमाणे ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कबज्यात मिळुन आली ) एकूण ६ ९ , ३०० / किमतीची सुगंधीत तंबाखु व मावा बनविण्याचे मशिन इसम नामे सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर याचे कब्जात मिळुन आल्यानेतसेच आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या ताब्यात वरिल मोपेड गाडी व एकत्र केलेली सुपारी सुगंधीत तंबाखु व सुपारी असे मिळुन आल्याने त्याचा पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे यांनी सदरचा  मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे . २१/३० वा सुमारास पचंम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव अ.नगरयेथे इसम नामे १ ) सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर २ ) विशाल संतोष भगत वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर ३ ) अक्षय बापु राहींज रा १५ ऑगस्ट कॉलनी भुषन नगर केडगाव ता जि अ नगर ( फरार ) यानी महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरिरास अपायकारक होवुन दुखापतीची शक्यता आहे असा सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असतांनाही देखील त्यानी त्याची विक्री करण्याचे उददेशाने स्वताच्या कब्जात मावा बनविण्याचे मशिन व सुगंधीत तंबाखु , सुपारी , तयार मावा बाळगतांना मिळुन आला आहे . पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे यांनी त्याचे विरुध्द भा.द.वि.कलम ३२८,१८८ , २७२,२७३ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे . सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,पोना /योगेश भिंगारदिवे /पोकॉ सोमनाथ राउत/ पोकॉ अमोल गाडे पोकॉ/सुजय हिवाळे या पथकाने ही कारवाई केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करत आहेत.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget