श्रीरामपूर प्रतिनिधी - मस्जिदवरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे यासाठी मनसेच्यावतीने श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.दि.04.05.2022 रोजी बाबा हुसेन शिंदे यांचे नेतृत्वाखाली 33 कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करीत राधिका हॉटेल समोरील महाराष्ट्र नव निर्माण सेना कार्यालय येथून मोटारसायकलवर निघून निलायम हॉटेल, डावखर चौक मार्गे श्रीराम मंदीर येथे आले त्यानंतर सदर कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करीत पदयात्रेने सोनारगल्ली मार्गे शिवाजीरोड वरील
स्वदेशी चहा दुकानासमोर येवुन दि. 04.05.2022 रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी रोड वरील येणाऱ्या जाणाऱ्यांना रहदारीस अडथळा करुन घोषणाबाजी केली.या प्रसंगी मनसे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, डॉक्टर संजय नवथर, सागर बोंडगे,संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, निलेश सोनवणे,मच्छिंद्र हिंगमिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे,
रतन वर्मा,विकास शिंदे, मच्छिंद्र शिंदे,शुभम शिंदे मंगेश जाधव, अक्षय अभंग, रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कारले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे ,रोकडे आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाबा शिंदे व इतर कार्यकर्ते यांना फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 149 व महा.पो. का.क. 68 प्रमाणे सुचना पत्र दिलेले असतांना तसेच जिल्हा दंडाधिकारी, अहमदनगर यांचेकडील आदेश क्र. डी.सी/ कार्या/ 9ब1/ 986/2022 दि. 29.04.2022 अन्वये संपुर्ण अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सिमेच्या हददीत दि. 01.05.2022 ते दि. 05.05.2022 पावेतो कोणतीही परवानगी न घेता पदयात्रा काढून शिवाजी चौक येथे लाऊडस्पिकर लावुन लोकांची गर्दी जमवुन रहदारीस अडथळा निर्माण करुन मा. जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांचे आदेशाचा भंग केला. यावरून श्रीरामपुर शहर पोस्टे गुन्हा रजि नं 307/2022 भादवि कलम 341, 188, 34 सह महा.पो.अधिनियम 37 (1)(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
Post a Comment