कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांचे कडुन घडले माणुसकीचे दर्शन.

अहमदनगर प्रतिनिधी -कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांचे कडुन घडले माणुसकीचे दर्शन कोतवालीने केले डॉनला चकाचक कोतवाली पोलीस स्टेशनच्या गेट समोर सुमारे १०-१२ वर्षा पासुन एक वेडसर इसम हा फाटके कपडे घालून अनेक दिवसांपासून राहुन भिक्षा मागून जीवन जगत आहे. तसेच त्याचे नखे, केस, दाढी वाढलेल्या अवस्थेत कोतवाली पोलीस स्टेशन व आशा टॉकीज परिसरात फिरतो त्या वरून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक . संपतराव शिंदे हे रोज सदर इसमाला पाहत असत. आज सकाळी सहज थांबून त्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अब्बास शेख उर्फ डॉन असे सांगीतले व माझे वडील व चुलते हे पोलीस खात्यात नोकरीला होते असे सांगीतले त्या मुळे सदरचा इसम हा मुस्लीम समाजाचा असल्याने पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचा स्टाफ यांची व आशा टॉकीज चौकातील गुलाम शेख व लालाभाई कुरेशी जाकीर शेख ( बोस) अन्सार शेख यांच्या मदतीने सदर इसमाची कटींग दाढी करून हातापायाचे नये कापुन त्यास आंधोळ घालून त्यास इंद सणाच्या अनुषंगाने त्यास नवीन पठाणी कपडे घालुन समाजात वावरता येईल अशी त्याची वेषभुषा करून तयार केलेले आहे तसेच कोतवाली पोलीस स्टेशन हदीमध्ये अशा प्रकार रोजचे जोवन व निवारा न मिळणार लोकांचा शोध घेवून त्यांना समाजामध्ये यावरण्या योग्य बनविण्याचा निश्चय केला आहे तसेच पोलीस खात्यामार्फत दिनदुबळ्यांची वेळो वेळी सेवा केली जात असते याचे माणुसकीचे दर्शन पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी घडविले आहे. 

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget