अहमदनगर प्रतिनिधी:- प्रस्तुत बातमीतील हकीकत अशी की मौजे वाकडी.ता.राहाता शिवारातील वाकडी-राहता जाणारे लगत हॉटेल न्यू आनंद येथे ४ इसम जेवण करण्यासाठी दि.५/०५/२०२२ रोजी २.३० च्या सुमारास आले होते.जेवण उशिरा दिले असे मुद्दाम कारण पुढे करून हॉटेल चालक श्री.विजय हरिभाऊ चोळके यांच्या डोक्याला गावठी कट्ट्याचा तुंबा मारून त्यांना जखमी केले तसेच रुपये ५ लाखाची संध्याकाळपर्यंत व्यवस्था करा असे सांगून गावठी कट्टा मधून फायर करत असताना हॉटेलचालक विजय चाळके याने आरोपीचा हात पकडल्याने पुढील अनर्थ टळला,सदरची घटना ४.३० वाजेच्या सुमारास घडली. हॉटेल चालक विजय हरिभाऊ चोळके यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर I १३९/२०२२ भादविक ३९७,३८६,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी १) सतीश रावसाहेब वायदंडे(राहणार गणेश नगर वाकडी शिवार तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) २) रमेश तानाजी वायदंडे (राहणार गणेश नगर वाकडी शिवार तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) ३) गोरक्षनाथ लक्ष्मण भुसाळ(राहणार रामपूरवाडी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) ४) दत्तात्रय रामदास जगताप (राहणार रामपुरवाडी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून त्यांना त्यांची ओळख पटवून अल्पावधीतच अटक करण्यात आली आहे यातील आरोपी रमेश तानाजी वायदंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,मा.स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,आणि श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन निरीक्षक श्री.मच्छिंद्र खाडे,पोसई/संजय निकम,श्री.अतुल बोरसे,पोहेकॉ/राजेंद्र लवांडे पोहेकॉ/मोहन शिंदे,पोहेकॉ/अशोक आढागळे,पोना/प्रशांत रणवरे,पोना/आबासाहेब गोरे,पोना/दादा लोंढे,पोना/अनिल शेंगाळे,चापोना/ साजीद पठाण,पोकॉ/ सुनील दिघे,पोकॉ/ईप्तीकार सय्यद यांनी केली आहे.

Post a Comment