श्रीरामपूर प्रतिनिधी - राज्यभरात चालू असलेले भोंगा प्रकारा मुळे श्रद्धे पोटी देवदर्शना साठी येणाऱ्या भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या करिता मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदनदेण्यात आले या निवेदनात श्रीक्षेत्र शिर्डी येथील ओराईबाबांची पहाटेची काकडआरती व शेजआरती, तसेच श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल मंदिराची दैनंदिन आरती गेल्या दोन दिवसांपासून जनीक्षेपकांवरून करण्याचे बंद करण्यात आलेले आहे श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठी आहे. श्रीसाईबाबांवरील श्रद्धेपोटी दूर अंतरावरून पाया भाविकांची गैरसोय होतु नये, तसेच अवघ्या महाराष्ट्राटे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल चरणी नतमस्तक होणासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांचा ओघ लक्षात घेता या दोन्हीही तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी दैनंदिन आरतीचा भक्तजणांना लाभ व्हावा व गैरसोय दुर हावी म्हणून परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणारी दैनंदिन आरती यापुढेही ध्वनीक्षेपकावरून चालु ठेवण्यारा यावी. हे दोन्हीही तिर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्त्रोत आहेत. तसेच श्रीसाईबाबा व श्रीविठ्ठल-रुमीगी है दोन्हीही दैवत राष्ट्रिय एकात्मतेची प्रतिक मानली जातात. परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे आरती सुरू असतांना असंख्य भाविक मनोमन भक्तीभावाने सहभागी होवून, आहे त्या ठिकाणावरून परनेश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात. भाविक भक्तांचा तो अधिकार ध्वनीक्षेरकांमुळे संपुष्टात येवु नये, यासाठी दोन्हीही तिर्थक्षेत्राचे ठिकाणी परंपरेनुसार होणारी आरती यापुढेही छनी वोपळांवरुनच करण्यात यावी, याबाबत आमच्या भावना लक्षात घेवुन प्रशासनाने योग्य ती दखल घेवुन कार्यवाही करावी अशी मागणी श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली या वेळी अहमदभाई जहागीरदार,मुक्तारभाई शाह,महेबूबभाई कुरेशी ,कलीम भाई कुरेशी ,रियाजखान पठाण ,यासिनभाई सय्यद ,रमजानशाह हैदरशाह,अहेमद शाह सिकंदर शाह ,रहिमभाई शेख ,फयाज जब्बार कुरेशी ,रज्जाकभाई पठाण ,ताराचंद रणदिवे ,राहुल काशिनाथ लिहिणार ,शेख बदर बनेसाहब ,शाह अकबर वजीर सह मुस्लिम जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

Post a Comment