Latest Post

Dy.s.p.संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई,दोन  पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व एक आरोपी ताब्यात

आज दि.  २९/०१/२०२१ रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे   हा  पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा  येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली असून आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

*सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , PI गाडे, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पो का रवींद मेढे ,सुनील शिंदे ,सचिन ताजणे, सचिन लोंढे यांच्या पथकाने केली.


राहुरी (प्रतिनिधी  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतकरी देविदास देसाई यांची विज मोटार चोरीस गेली असुन त्यांच्या  तक्रारी वरुन राहुरी पोलीस स्टेशनला भांद वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे         या परिसरात  शेतकर्यांच्या विज मोटारी चोरुन चार - दोन हजारात भंगारात विकणारी मोठी टोळी कार्यरत असुन पोलीसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील विहीरीतील पाणबुडी तसेच नदी काठावरील पाणबुडी चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असुन चोरलेली विज मोटार चार - दोन हजारात भंगारात विकली जात असुन विज मोटार चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत चोरीचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी आता तक्रर देण्याचेच टाळत आहे नदीवर टाकलेली विज मोटार  व केबल चोरणारी टोळीच या परिसरात वावरत असुन पोलीसांनी विज मोटार चोरणारे व त्या विकत घेणारे या दोघावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे भंगार व्यवसाय करणाराकडे साठा रजिस्टर असणे गरजेचे असताना एकाही भंगार व्यवसायीकाकडे तशी नोंद वही आढळत नसुन अनेक ठिकाणी चोरीचे सामान खरेदी केले जात आहे संक्रापुर येथील अनेकांच्या विज मोटारी अद्याप पर्यत चोरीस गेलेल्या आहेत काहींनी तक्रारी दिल्या परंतु त्याचा पुढे काहीच  तपास न झाल्यामुळे आता शेतकरीही चोरी होवुनही गप्प बसत आहे संक्रापुर येथील शेतकरी देविदास देसाई यांनी राहुरी पोलीसाकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे संक्रापुर येथील शेतातील विहीरीतुन २७जानेवारी ते २८ जानेवारी रात्री १ ते सहा वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी विहीरीतील पाच हाँर्स पाँवरची पानबुडी तसेच १२५ फुट केबलची चोरी करुन अंदाजे आठ हजार रुपयाचे नुकसान केले आहे या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगाव पोलीस पुढील तपास करत आहे विज मोटार चोरांचा व चोरीच्या मोटारी विकत घेणार्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली असुन या बाबत लवकरच एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून निवेदन देणार आहे.

राहुरी( प्रतिनिधी मिनाष पटेकर )राहुरी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या  ४४ ग्रामपंचायतीच्या व संभावी ३८ ग्रामपंचायतीच्या अशा ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उपविभागिय अधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षेतेखाली काढण्यात आली.राहुरी तालुक्यात नुकत्याच ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुक संपन्न झाल्या यामधे निवडणुक आयोगाना  सरपंच पदाचे आरक्षण गोपनिय ठेवत त्याचे आरक्षण आज दि.२७ जानेवारी रोजी काढण्यात आले.यावेळी तहसिलदार फसियोदिन शेख,नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी आरक्षण सोडतीसाठी परिश्रम घेतले.यावेळी गटविकास अधिकारी गोंविद खामकर,कृषी अधिकारी महेश ठोकळे,दत्ता गोसावी,सुनिल हुडे,सयाजी,शंडगे,अभिजित क्षिरसागर,अश्विनी नन्नवरे, सुलोचना वाघमारे,महेश देशमुख,जावेद शेख,अंकुश सोनार अदि अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले.राहुरी येथे आज बुधवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी११ वाजता केशरंग मंगल कार्यालय येथे सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडती पार पडल्या.

आरक्षण पुढील प्रमाणे- 

अनुसुचित जाती - ११ जागा पैकी

ताहाराबाद,कुकडवेढे,वांबोरी,चेडगाव,केंदळ खुर्द, चिंचाळे(गडधे आखाडा)या गावात

पुरुष सरपंच राहणार आहे.तर मांजरी,मल्हारवाडी,मुसळवाडी,वळण,खुडसरगाव,

चिंचाळे (गडदे आखाडा)महिल सरपंच असणार आहे.

अनुसुचित जमाती-१० जागा

मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे,ब्राम्हणगाव भांड,उंबरे,महिला सरपंच राहणार आहे,

तर वरशिंदे(वाबळेवाडी),रामपुर,कात्रड,केंदळ बु,खडांबे खुर्द,येथे पुरुष महिला सरपंच असणार आहे.

नागराकांचा मागस प्रवर्ग-२२जागा पैकी 

सोनगाव,सडे,धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण दरडगाव थडी,टाकळीमिया,बाभुळगाव,कानडगाव ,डिग्रस,याजागेवर महिला सरपंच होणार आहेत.तर 

तुळापुर,पिंपळगाव फुनगी,आंबी, चादेगाव,चिंचविहिरे,कनगर बु,वावरथ जांभळी,जांभुळबन,पिप्री वळण,करजगाव,मोरवाडी,गणेगाव, या २० गावात पुरष सरपंच होणार आहे.

तर सात्रळ, निंभेर, तांदुळवाडी ,तांभेंरे, घोरपवाडी, बा.नांदुर ,कोंढवड, वरवंडी, खडांबे बुद्रुक गुंजाळे संक्रापूर दवणगाव केसापूर बोधेगाव लाख पाथरे खुर्द कोपरे तिळापुर हे पुरुष सरपंच होणार आहे.

तर गुहा कुरणवाडी  म्हैसगाव राहुरी खुर्द मानोरी देसवंडी तमनर आखाडा पिंपरी अवघड ब्राह्मणी मोकळ धामोरी, बुद्रुक आरडगाव चिंचोली गंगापूर अमळनेर ,जातप, माहेगाव ,वांजुळपोई ,कोल्हार खुर्द, येथे महिला सरपंच होणार आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदारांच्या कार्य तत्परतेमुळे दिव्यांग व्यक्तीला झटपट रेशन कार्ड मिळाले असुन आधार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना धन्यवाद दिले आहे.   रामकृष्ण नगर शिरसगाव येथील रहीवासी संदिप गोपीनाथ गंभीरे हे रेशनकार्ड मिळविण्यासाठी  तहसील कार्यालयात आले होते पुरवठा विभागात गेल्यानंतर त्यांना आठ दहा दिवसांनी या असे सांगितले त्यामुळे निराश झालेले पायाने अधु असलेले दिव्यांग गंभीरे जड अंतकरणाने तहसील कार्यालयाचा जिना उतरत होता त्याच वेळेस तहसीलदार प्रशांत पाटील कार्यालयात जाण्यासाठी जिना चढत होते एक दिव्यांग व्यक्ती जिना उतरताना त्यांनी पाहीले या दिव्यांग व्यक्तीचे नक्कीच काही तरी महत्वाचे काम असणार आहे अशी शंका त्यांना आली त्यांनी दोन पावले मागे घेत त्या दिव्यांग व्यक्तीची अस्थावाईकपणे चौकशी केली त्या वेळी त्या दिव्यांगाला हे माहीत नव्हते की हेच तहसीलदार आहेत व यांच्या सहीनेच आपल्याला रेशनकार्ड मिळणार आहे तहासीलदार प्रशांत पाटील यांनी चौकशी केल्यानंतर दिव्यांग व्यक्ती संदीप गंभींरे यांनी सांगितले की रेशनकार्ड मिळावे या करीता हेलापाटे मारत आहे त्या वेळी तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यासं हाताला धरुन मागे फिरविले अन माझ्या बरोबर चल मी तुला रेशनकार्ड देतो असे म्हणाले या वाक्यामुळे गंभीरे यांना नवल वाटले की पुरवठा अधिकार्यांनी नाही म्हटले मग हे कोठुन देणार तहासीलदार पाटील यांनी गंभीरे यांना हाताला धरुन पुरवठा विभागात नेले व तातडीने रेशनकार्ड तयार करण्याचा आदेश दिला अन काही वेळातच गंभीरे यांचे रेशनकार्ड तयार झाले तहसीलदार पाटील यांनी सही करुन ते त्यांच्या हातात दिले त्या वेळी संदिपं  गंभीरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता ही आनंदाची बातमी गंभीरे यांनी आधार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण खडके यांना सांगितली त्यांनीही संघटनेच्या वतीने तहसीलदार पाटील यांचे आभार मानले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी कामकाजाच्या दुसर्याच दिवशी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की वार्ड नंबर सात पूर्णवाद नगर येथील आरोपी निरज वैद्य हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने घेवुन फिरत आहे उपविभागीय अधिकारी संदिपं मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि सानप ऐ पी आय संभाजी पाटील पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोलीस काँन्स्टेबल राहुल नरोडे यांनी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या अधारे शोध घेतला असता निरज वैद्य हा संशयास्पद फिरताना आढळून आला त्याची अंग झडती घेतली असता त्याचा कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले असुन संबधीता विरुध्द आर्म आँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपुर येथील एका व्हाँटसअप गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने मजकुर टाकल्याबद्दल दोन व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असुन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्यास कडक कारवाई करण्याचा ईशारा पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिला आहे.श्रीरामपुर येथील एका गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकण्यात आली होती ही बाब बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सानप यांच्या लक्षात आणुन दिली  पोलीस निरीक्षक सानप यांनी तातडीने संबधीत गृप अँडमीनला बोलावुन घेतले व संबधीत आक्षेपार्ह पोस्ट बद्दल विचारणा केली त्यांनी ही पोस्ट  दोन युवकांनी टाकली असुन त्या नंतर गृपचे सेटींग बदलुन ओन्ली अँडमीन असे करण्यात आल्याचेही सांगितले त्यामुळे पोलीस निरीक्षक सानप यांनी त्या दोघांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले पोलीस स्टेशनला आणल्या नंतर त्या दोघांनी ती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे कबुल केले त्यां नंतर त्यांचेवर दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने पोस्ट टाकून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणल्या नंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमा झाला होता पोलीसा निरीक्षक सानप यांनी दोन्ही बाजुच्या लोकांना समजुन सांगीतले व अशा प्रकारे पोस्ट टाकणार्या व्यक्ती विरुध्द कडक कारवाई  केली जाईल सोशल मिडीया हे चांगले प्रसार माध्यम असले तरी त्याचा गैरवापर कुणी करु नये व्हाँटस्अप गृप फेस बुक ट्विटर वर कुणी कुणाचा अपमान मानहानी होईल अशी पोस्ट टाकल्यास वा फाँरवर्ड केल्यास गृप अँडमीनसह पोस्ट फाँरवर्ड करणारावर कडक कारवाई केली जाईल सर्व व्हाँटस्अप गृपवर पोलीसांची नजर आहे समाजात अशांतता निर्माण होईल असे कृत्य कोणी करु नये असे अवाहनही पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राजनीति समाचार चे पत्रकार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेचे सभासद शेख खलील शेख यासीन राहणार मालेगाव यांची महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या मालेगाव शहर संघटक पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद यांनी दिली खलील शेख हे गेल्या दोन वर्षांपासून प्रेय संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेशी एकनिष्ठ असून सामाजिक चळवळीत त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो याच बरोबर राजनीती समाचार या वृत्तपत्रातून त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे त्यांच्या या कार्याचा आढावा घेता पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांची निवड केली तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष असलम बिनसाद यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश उपाध्यक्ष बिके सौदागर प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के शेख नाशिक जिल्हा सचिव वहाब खान महेबुबखान नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर पठाण चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी चांदवड तालुका उपाध्यक्ष रवींद्र केदारे मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास पठारे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष असलम बिनसाद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख मालेगाव शहर अध्यक्ष इलियास छोटू मिया राहता तालुका अध्यक्ष विजय खरात राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी तसेच अकबर भाई शेख ,अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, मुरलीधर किंगर ,साईनाथ बनकर ,,लक्ष्मण साठे आदींनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget