Latest Post

दि. २०/०७/२०२० रोजी श्री. दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना
गोपनिय बातमीदारांकडून माहीती मिळाली कि, चिचोंडी पाटील गावचे शिवारात, चिोंडी पाटील ते पिंपळा जाणारे रोडवर एका पोल्ट्री फार्मचे शेडमध्ये इसम नामे नदीम जहीर खान उर्फ शेख, रा. मुकुंदनगर, अ.नगर हा त्याचे हस्तकामार्फत गाय छाप तंबाखूचे अधिकृत चिन्ह व पॅकींगचे साहित्य वापरुन बनावट गाय छाप तंबाखूच्या पुड्या
विक्री करण्याचे उद्देशाने तयार करीत आहेत. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची माहीती गाय छाप तंबाखूचे
अधिकृत उत्पादक मालपाणी ग्रुप, संगमनेर व फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर चे अधिकृत प्रतिनिधी श्री. संकल्प नंदकिशोर लाहोटी, रा. आश्वी बुद्रुक,ता- संगमनेर यांना कळविली. त्यांनी सदरची माहीती त्यांचे कंपणीस कळविल्यानंतर फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर यांनी त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार कार्यवाही करणेयायत लेख त्यानंतर पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाख, अहमदनगर यांनी त्यांचे पथकातील सफी/नानेकर. पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना रविन्द्र कर्डीले, सचिन आडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, चालक पोना/भरत बुधवंत अशांनी मिळून दोन पंच व फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर चे अधिकृत प्रतिनिधी श्री.
संकल्प लाहोटी यांचेसह चिचोंडी गावचे शिवारातील चिचोंडी पाटील ते पिंपळा जाणारे रोडवर जावून सदर ठिकाणी
शेतामध्ये असलेल्या पोल्ट्री फार्मचे शेडमध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम गायछापचे चिन असलेल्या कागदी पुड्यामध्ये तंबाखू भरत असताना दिसला. त्यांस ताब्यात घेवून त्यांस पोलीस स्टाफची पंचाची ओळख सांगून त्यांस त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता १) जब्बार शमशुद्दीन शेख, वय-३० वर्षे, रा. जुना मुकुंदनगर, अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. सदर पोल्ट्री फार्मची झडती घेतली असता सदर ठिकाणी गाव छाप तंबाखूचे प्रत्येकी २० पुडे असलेल्या प्लॅस्टीकच्या पांढन्या रंगाच्या एकूण ३९ गोण्या, त्यावर गाय छाप तंबाखूचे चिन्ह असलेले, गाय छाप तंबाखूचे पुडे पॅकींग करण्याचे फिक्कट विटकरी रंगाचे एकूण १००० नग कागद, त्यावर गाय छाप तंबाखूचे चिन्ह असलेले. तंबाखूचे पुढे पॅकींग करण्यासाठी लागणारा लोखंडी पत्र्याचा साचा. दोन वजन काटे, सुट्या तंबाखूच्या प्रत्येकी ३० किलो वजनाच्या प्लॅस्टीकच्या एकूण चार गोण्या. तंबाखू गोणी पॅकींगचे इलेक्ट्रीक मशिन, गाय छाप तंबाखूच्या रिकाम्या कागदी पुड्या, त्यावर गाय छाप तंबाखूचे चिन्ह असलेले. तंबाखूचे पुडीवर लावण्याचे कागदी लेबल. त्यावर गाय छाप मार्क असलेले. असा एकूण ३,११,६००/-रु. गाय छाप तंबाखूचा बनावट माल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली तंबाखू व पैकीग साहीत्य कोठून आणलेले आहे या बाबत ताब्यात घेतलेल्या
इसमाकडे विचारपूस केली असता त्याने सदरची तंबाखू व जप्त करण्यात आलेले साहीत्य हे २) नदीम जहीर खान
उर्फ शेख, रा. मुकुंदनगर, अ.नगर याचे असल्याचे सांगीतले. इसम नामे जब्बार शमशुद्दीन शेख, वय-३० वर्षे, रा.
जुना मुकुंदनगर, अहमदनगर यांस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालूका पो.स्टे. ला हजर करण्यात
आले असून सदर बाबत गाय छाप तंबाखूचे उत्पादक फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर चे अधिकृत प्रतिनिधी श्री.
संकल्प नंदकिशोर लाहोटी, वय- २६ वर्षे, (डेपो मॅनेजर, गायछाप तंबाय, अहमदनगर शहर), रा. आश्वी बुदूकता- संगमनेर यांनी नगर तालूका पो. स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. I ३६०/२०२०, भादवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७२, ४७५ सह कॉपी राईट अॅक्ट कलम ७ प्रमाणे दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही नगर तालूका पो.स्टे. करीत आहेत. सदरची कौतुकास्पद कामगीरी ही मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. डॉ. श्री. सागर पाटील साहेब, अपर पोलिस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

कोल्हार ( वार्ताहर ):-
कोल्हार भगवतीपुर येथील शिवचरित्र व्याख्याते ,पत्रकार साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांना नवी दिल्ली येथील मानवाधिकार संरक्षण समिती या संस्थेने "कोविड योद्धा" मानपत्र देऊन सन्मानित केले आहे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साईप्रसाद कुंभकर्ण यांनी कोरोना या आजाराबद्दल जनजागृती करणारे वार्तांकन दैनिकाच्या व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून केल्याबद्दल मानवाधिकार संरक्षण समितीचे जी.एम भगत ,प्रवीण गायकवाड ,शिवाजीराव पाटील यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हे मानपत्र प्रदान केले आहे. याबद्दल साईप्रसाद कुंभकर्ण यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूरातील  एका व्यक्तीचा अहवाल पाँझीटीव्ह आला असुन  आणखी १४ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आहे ही माहीती गावात पसरताच नागरीकात घबराटीचे वातावरण पसरले आहे.गावात एका व्यक्तीचा अहवाल तब्बल बारा दिवसांनंतर पाँझीटीव्ह आला त्या नंतर २०० मीटरचा परीसर सीलबंद करण्यात आला त्या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली असे असताना तो रुग्ण गावभर फिरत होता त्यामुळे त्या परीसरातील व्यापार्यांनी प्रशासनास जाब विचारण्यास सुरुवात केली होती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी संबधीतावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना कोरोना कमीटीला दिल्या असल्या तरी दोन दिवस उलटूनही संबधीतावर कारवाई झालेली नाही असे असतानाच पुन्हा एका व्यक्तीचा अहवाल पाँझीटीव्ह आला आहे त्यामुळे पुन्हा तो भाग सील करण्यात येणार आहे पाँझीटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरातील चौदा जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असुन उद्या सकाळी त्यांचे स्वँब घेणार असल्याची माहीती वैद्यकीय अधीकार्यांनी दिली आहे सर्व व्यक्तीना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले  या व्यक्तीच्या घरी काही दिवसापूर्वी लग्न झाले होते त्या नंतर काही दिवसांनी त्यांच्या घरातील वयोवृध्द महीलेचे निधन झाले होते दोन दिवसापूर्वी त्यां घरातील व्यक्तीना त्रास होत असल्यामुळे स्थानिक दोन डाँक्टरकडे तपासणी करण्यात आली होती त्या नंतर त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्या घरातील दोघांचे स्वँब तपासणीसाठी पाठवीण्यात आले होते त्यातील एकाचा अहवाल पाँझीटीव्ह  तर एकाचा अहवाल निगेटीव्ह आला पाँझीटीव्ह आल्याची वार्ता गावात पसरताच नागरीकात भितीचे वातावरण पसरले त्या युवकाला संतलूक हाँस्पीटल येथे पाठविण्यात आले तर त्याच्या घरातील चौदा जणांना स्वँब तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असुन क्वारंटाईन सेंटर येथे पाठविण्यात आले आहे.

बुलडाणा - 20 जुलै
लॉकडाऊन काळात वेळ संपल्यानंतर पेट्रोलपंप मालकाने पेट्रोल न दिल्याने रागाच्या भरात एका माथेफिरू युवकाने बुलडाणा येथील मलकापुर रोडवरील चौधरी पेट्रोलपंप मालकाच्या कैबिन व अन्य दोन रूम मध्ये दोन विषारी कोब्रा व एक धामण असे तीन साप सोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी 13 जुलैच्या दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली होती.घटनेचे दृश्य पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पंपमालक सारिका चौधरी हे पोलिस ठाण्यात गेले होते मात्र प्रकरण आपसात मिटविन्यात आला होता.हा माथेफिरू युवक स्वतः सर्पमित्र बनून फिरतो,याची माहिती काळून बुलडाणा वनविभागाने त्याच्या या कृत्यला वनगुन्ह्यास पात्र धरून आरोपी शुभम अशोक शिलारकर वय 24 वर्ष याच्या विरुद्ध वन रक्षक विष्णु काकड यांनी भातीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमानवय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डीएफओ संजय माळी,एसीएफ रंजीत गायकवाड, आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राहुल चौहान करीत असून सद्या आरोपी फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती आरएफओ गणेश टेकाळे यांनी दिली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनीधी).२०/०७/२०२० रोजी ०१/०० वा.चे सुमारास पोलीस निरीक्षक श्री श्रीहरी बहिरट सो व तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे अशोकनगर, वडाळा महादेव ता.श्रीरामपुर भागात पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेत असतांना आंतरराज्यीय घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार बबलु मोहन चव्हाण रा. कमालपुर हा त्याचे साथीदारासह वडाळा महादेव येथे त्याचे नातेवाईकांकडे येत असुन त्याचेजवळ पिस्तौल (कट्टा) आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस पथकाचे सदर वडाळा फाट्याजवळ सापळा लावून दोन इसमांना निळे रंगाचे विना नंबरचे FZ गाडीसह ताब्यात घेतले त्यातील १) बबलु मोहन चव्हाण ऊर्फ अतिष वय २१ वर्षे रा.कमालपुर ता.श्रीरामपुर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेसोबत एक अल्पवयीन मुलगा मिळुन आलेला असुन त्याचे ताब्यात १) एक गावठी बनावटीचा पिस्तोल (गावठी कट्टा) मॅगझीनसह असलेला त्यास काळे रंगाची फायबरची मुठ असलेला गावटी कट्टा त्यावर U.S.A.A.R.M.Y2.MM अशी अक्षरे असलेला,२) दोन जिवंत काडतुस व ३)एक बिना नंबरची FZS मोटारसायकल तिचा घेसीस नं.MEIRG44BAKO066861 असा एकुण ९०,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आलेले त्यांचेविरुद्ध पोकों/१२१० किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपुर शहर पोस्टेला गु.रनं । ११४४/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३,७,२५ प्रमाणे फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. २) बबलु मोहन चव्हाण ऊर्फ अतिष वय २१ वर्षे रा.कमालपुर ता.श्रीरामपुर याचेवर यापुर्वी अनेक चोरीचे व
घरफोडीचे गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार असुन परराज्यात देखील त्याचेवर गुन्हे दाखल असुन तो अनेक
गुन्यात फरार आहे. 
१) किन्हवली पोस्टे जि.ठाणे । १५३/२०१९ भादविक ४५७,३८०,३४ प्रमाणे, (फरार)
२) शहापुर पोस्टे जि.ठाणे । ३०९/२०१९ भादविक ३०२,४६०,३९६,४१२,४१४ प्रमाणे (फरार)
३) नेवासा पोस्टे । १२६/२०१९ भादविक ४५४,४५७,३८० प्रमाणे
४)श्रीरामपुर तालुका पोस्टे ८७/२०१९ भादविक ४५२,३८० प्रमाणे
५) संगमनेर शहर पोस्टे । १२३/२०१६ भादविक ३७९,३४ प्रमाणे
६) गंगापुर पोस्टे जि, औरंगाबाद 1 ६८/२०१९ भादविक ४६१,३८० प्रमाणे.
७) राहाता पोस्टे । ३५२/२०१९ भादविक ४५७,३८० प्रमाणे
८) उत्तरप्रदेश राज्यात व दिल्ली भागात देखील गुन्हे केल्याची कबुली दिली असुन सदरबाबत माहीती घेत आहोत.
सदरची कारवाई मा.श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे, अपर
पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा. श्री. राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह पोसई अतुल बोरसे, पोसई। दत्तात्रय उणे तपास पथकाचे पोहेकॉ? जालिंदर लोढे, पोकों/ किशोर जाधव, पोकॉ। अर्जुन पोकळे, पोको सुनिल दिघे, पोकों/ पंकज
गोसावी, पोको/ महेंद्र पवार, पोकों/ गणेश गावडे यांनी केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील वार्ड नंबर दोन हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यानंतर महसूल वैद्यकीय व पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने लोकांशी वागत आहे त्याबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष असून प्रशासनाला सहकार्य करण्याची लोकांची भूमिका असताना पोलीस मात्र त्रास देण्याच्या हेतूने काम करीत आहेत . त्यामुळे जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करीत असताना प्रशासन मात्र सहकार्य करीत नसल्याची नाराजी वार्ड नंबर 2 मधील नगरसेवकांनी व्यक्त केली .
निमित्त होते नगर पालिका शाळा क्रमांक पाच मध्ये आयोजित केलेल्या होमिओपॅथिक फोरमच्या औषध वाटप शिबिराचे . याठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.मोहन शिंदे यांनी वार्ड नंबर 2 मध्ये आरोग्य यंत्रणेमार्फत गेल्या चार दिवसापासून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली . जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रुग्णांची रॅपीड चाचणी या भागांमध्ये करण्यात आली असून आरोग्य यंत्रणेच्या कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी बोलताना नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी रॅपीड टेस्ट ही पूर्णता विश्वास पात्र नाही. राजस्थान सरकारने त्यावर बंदी घातली आहे असे असताना जोपर्यंत दुसऱ्या चाचणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत एखाद्या रुग्णाला covid-19 म्हणून घोषित करणे योग्य नाही. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण झाली आहे. अशा रुग्णांना घरीच होम कोरंटाईन केले पाहिजे. दुसऱ्या चाचणीत रुग्ण बाधित आढळला तर त्याला कोविड सेंटर'मध्ये नेण्यास आमची हरकत नाही असे सांगून प्रतिबंधित क्षेत्रातून आणीबाणीच्या प्रसंगी एक रस्ता चालू ठेवण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन त्याला प्रतिसाद देत नाही असा ठपका ठेवला . लोकांना गॅस टाक्या खांद्यावर उचलून बरेच लांब जावे लागत आहे . त्यामुळे एक रस्ता चालू ठेवून तेथे पोलिस बंदोबस्त द्यावा .गरजूंना तेथून सोडण्यात यावे अशी मागणी केली .
 नगरसेवक अंजुमभाई शेख यांनी शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र असताना त्या भागामध्ये अशा प्रकारची चाचणी होत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगून सर्वच लोकांची चाचणी करण्यास आमची हरकत नाही . मात्र त्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे . अनेक प्रकारच्या अफवा पसरल्याने आरोग्य यंत्रणेला काम करण्यात अडचणी येत आहेत . नागरिकांचा विश्वास संपादन करून काम केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळतील . त्यासाठी आम्ही सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत . प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा होऊन देखील एक रस्ता सुरू केलेला नाही . त्याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस जनतेला सहकार्य करीत नाही .लोकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत असे सांगून कोरोनाच्या संकटाचा मुकाबला सर्वांनी मिळून केला पाहिजे असे सांगून विनाकारण वार्ड नंबर 2 बदनाम करू नका असेही त्यांनी आरोग्य अधिकारी व पोलिसांना सुनावले.
 यावेळी नगरसेवक मुक्तार शहा, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, अल्तमश पटेल, अॅड .समीन बागवान, सलीमखान पठाण, तोफिक शेख, सोहेल बारूद वाला,जावेद शेख आदी उपस्थित होते. 

*मदरसा देण्याची तयारी*
संशयित रुग्णांचा अंतिम अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना इतरत्र कोरंटाईन न करता घरीच किंवा आमच्या परिसरातच होम कोरंटाईन करण्यात यावे असे सांगून अंजुमभाई शेख यांनी कोरनटाईन सेंटर म्हणून आपला मदरसा रहमत ए आलम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

*प्रशासनाकडून दुर्लक्ष*
मिल्लत नगर वैदुवाडा पूल व फातेमा कॉलनी सुलतान नगर पूल या ठिकाणी पाटाच्या पुलावर पालिकेतर्फे पाईप बांधून कठडे तयार करण्यात आले होते . मात्र दोन्ही भागातील लोकांनी हे पाईप सोडून येण्या जाण्याचा रस्ता चालू केला आहे . त्या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या शिक्षकांनी लोकांना रोखल्यास त्यांना दमबाजी करण्यात येते . याबाबत प्रांत,तहसीलदार, नगराध्यक्षा,नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे चार दिवसापासून तक्रारी करून ही सर्वच प्रशासनाचे घटक या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने वार्ड नंबर 2 प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा उद्देश सफल होणार नाही . या दोन्ही पुलावरून भल्या सकाळी तसेच रात्री अनेक लोक आपल्या दुचाकी,चारचाकी गाड्या घेऊन जातात. त्यामुळे वार्ड नंबर 2 मधील संसर्ग इतर भागातही पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे .

श्रीरामपूर(प्रतिनिधी)येथील श्रीराम अँकेडमी सीबीएसई  विद्यालयातील कु. ऋतुजा सचिन घेरडे या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत 96 टक्के गुण मिळवून  शाळेत 2 रा क्रमांक व तालुक्यात देखील 2रा क्रमांक पटकावला  आहे.  व यश संपादन केले आहे.
तिला गणित विषयात पैकीचे पैकी 100 गुण मिळाले आहेत. या सुयशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष राम टेकावडे,प्राचार्या सौ. पोटघन, मार्गदर्शक अध्यापिका कश्यप यांच्यासह सर्व शिक्षक-सेवाकवृंदाने तिचे कौतुक केले आहे. ती श्रीरामपूर येथील  डॉ. सौ.सारिका घेरडे  व डॉ. सचिन घेरडे यांची ती सुकन्या आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget