बेलापूर (प्रतिनिधी )- बेलापूरातील एका व्यक्तीचा अहवाल पाँझीटीव्ह आला असुन आणखी १४ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आहे ही माहीती गावात पसरताच नागरीकात घबराटीचे वातावरण पसरले आहे.गावात एका व्यक्तीचा अहवाल तब्बल बारा दिवसांनंतर पाँझीटीव्ह आला त्या नंतर २०० मीटरचा परीसर सीलबंद करण्यात आला त्या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली असे असताना तो रुग्ण गावभर फिरत होता त्यामुळे त्या परीसरातील व्यापार्यांनी प्रशासनास जाब विचारण्यास सुरुवात केली होती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी संबधीतावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना कोरोना कमीटीला दिल्या असल्या तरी दोन दिवस उलटूनही संबधीतावर कारवाई झालेली नाही असे असतानाच पुन्हा एका व्यक्तीचा अहवाल पाँझीटीव्ह आला आहे त्यामुळे पुन्हा तो भाग सील करण्यात येणार आहे पाँझीटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरातील चौदा जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असुन उद्या सकाळी त्यांचे स्वँब घेणार असल्याची माहीती वैद्यकीय अधीकार्यांनी दिली आहे सर्व व्यक्तीना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले या व्यक्तीच्या घरी काही दिवसापूर्वी लग्न झाले होते त्या नंतर काही दिवसांनी त्यांच्या घरातील वयोवृध्द महीलेचे निधन झाले होते दोन दिवसापूर्वी त्यां घरातील व्यक्तीना त्रास होत असल्यामुळे स्थानिक दोन डाँक्टरकडे तपासणी करण्यात आली होती त्या नंतर त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्या घरातील दोघांचे स्वँब तपासणीसाठी पाठवीण्यात आले होते त्यातील एकाचा अहवाल पाँझीटीव्ह तर एकाचा अहवाल निगेटीव्ह आला पाँझीटीव्ह आल्याची वार्ता गावात पसरताच नागरीकात भितीचे वातावरण पसरले त्या युवकाला संतलूक हाँस्पीटल येथे पाठविण्यात आले तर त्याच्या घरातील चौदा जणांना स्वँब तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असुन क्वारंटाईन सेंटर येथे पाठविण्यात आले आहे.
Post a Comment