Latest Post

श्रीरामपूर: तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे लवकरच ‘गोल्डन पाम’ या भव्य वॉटर पार्कचा शुभारंभ होणार आहे. या वॉटर पार्कचे उद्घाटन गुरुवार, १५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, आमदार हेमंतजी ओगले, चेअरमन अशोक सहकारी साखर कारखाना भानुदाची मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, सत्यशील दादा शेरकर, सचिन दादा गुजर मा. विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी, बाबासाहेब दिघे, ह भ प डॉक्टर सुभाष महाराज कांडेकर, सौ वंदनाताई मुरकुटे, सुधीर पा. नवले, अनिल पा. नवले सुभाष पाटील नवले महेश पाटील नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गोल्डन पाम’ वॉटर पार्क आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असून, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. विविध वॉटर राईड्स आणि आकर्षक जलक्रीडांचा अनुभव घेण्यासाठी हा वॉटर पार्क निश्चितच एक उत्तम ठिकाण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक सुधीर पा. नवले आणि सुभाष पा. नवले यांनी केले आहे.

संपर्क:

गोल्डन पाम वॉटर पार्क & रिसॉर्ट पाण्याचा टाकीजवळ, बेलापूर बु., ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर

मोबाईल: ७६२०५५८५५५, ९९२२१५५५५०, ८३७८००७९००

कोपरगाव | दिनांक – १३ मे २०२५/गौरव डेंगळे:

शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव ही शाळा यंदाही १००% निकाल लावण्यात यशस्वी ठरली आहे. मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत १६८ पैकी १६८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले, यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


*निकालाचे ठळक पैलू:*


१६८ विद्यार्थ्यांपैकी १५२ विद्यार्थ्यांनी 'डिस्टिंक्शन' (७५% व त्याहून अधिक गुण) मिळवले.


१३ विद्यार्थ्यांना 'फर्स्ट क्लास' (६०% ते ७४.९९%) मिळाला.


०३ विद्यार्थ्यांनी 'सेकंड क्लास' (४५% ते ५९.९९%) मिळवून उत्तीर्णता गाठली.


यावर्षी एकाही विद्यार्थ्याचा अपयश नोंदवले गेले नाही.



*गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव व यश:*


1. मिस. पारिख हरिश्री किरण – ९८.८०% (शाळेतील प्रथम)



2. मिस. साळुंखे कृष्णाप्रिया वासुदेव – ९७.६०% (शाळेतील द्वितीय)



3. मिस. गाडेकर स्नेहा शैलेश – ९७.२०% (शाळेतील तृतीय)




*गुणवर्गवारी:*


९०% पेक्षा अधिक: ५१ विद्यार्थी


८०% ते ८९.९९%: ७१ विद्यार्थी


७०% ते ७९.९९%: ३६ विद्यार्थी


६०% ते ६९.९९%: ७ विद्यार्थी


४५% ते ५९.९९%: ३ विद्यार्थी



*शाळेच्या यशामागील घटक:*


या यशामागे केवळ विद्यार्थ्यांचे परिश्रमच नव्हे तर शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शाळेतील अभ्यासकेंद्रित वातावरण, तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर आणि पालकांचा सतत पाठिंबा हे घटक कारणीभूत आहेत. शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, वेळोवेळी टेस्ट सिरीज, रेमेडियल क्लासेस आणि मानसिक आरोग्याचे प्रशिक्षणही दिले गेले.


*मुख्याध्यापकांचे मत:*


मुख्याध्यापक श्री के एल वाकचौरे यांनी सांगितले की, “आमची शाळा केवळ निकालासाठी नाही तर विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमचे शिक्षक फक्त शिक्षण न देता प्रेरणा देतात, आणि याचाच हा निकाल पुरावा आहे.”


 *भावी वाटचालीसाठी शुभेच्छा:*


या विद्यार्थ्यांनी विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून, त्यांना डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या गेल्या.

श्रीरामपूर - शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखत श्रीरामपूर येथील सरकार मान्य मान्यताप्राप्त अल्पसंख्याक स्वयं अर्थसहाय्यित संस्था, मोहम्मद इब्राहिम एज्युकेशन सोसायटी संचलित, अजमत फातिमा इंग्लिश स्कूल ॲड ज्युनि. काॅलेज विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत  विज्ञान शाखेत निशाद अबुबकर शाह हिने ९०.१७ टक्के गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात तसेच काॅलेज मध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला . द्वितीय क्रमांक जोया जावेद अहमद शेख ७५ टक्के तर तृतीय सबिया अफजल शेख ७१.१७ टक्के गुण मिळवून यशाची नवी शिखरे गाठली आहेत. या कामी यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरनिय श्री.मोहम्मद इब्राहिम साहेब अली शेख साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहसीन शेख सर , उपाध्यक्ष श्री. मतीन शेख सर , सचिव श्री. मुबीन शेख सर , प्राचार्य लुकस दिवे , सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बेलापूर (प्रतिनिधी)-महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान बेलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वेदोत्सव परिक्षेत दधिमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील तसेच बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रीका पटकावली होती. 


श्रीराम जन्म भूमीचे गोविंददेवगिरी महाराज तथा किशोरजी व्यास महाराज यांच्या हस्ते महेश दायमा यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्या यशानंतर महेश दायमा हे उद्या मंगळवार दि. १३ मे रोजी बेलापूर येथे आपल्या मुळ गावी येत असून त्यांच्या यशाबद्दल भव्य अशी मिरवणूक काढून सत्कार समारंभ आयोजित केला आहे.


उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता होणाऱ्या मिरवणूक व सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेलापूर ग्रमस्थ, गावकरी मंडळ, सकल राजस्थानी समाजाने केले आहे.

निधन वार्ता (नागर)-येथील सौ. हौसाबाई सोपानराव देसाई यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुलगी,जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे नाऊर येथील प्रगतशील शेतकरी सोपानराव देसाई यांच्या त्या पत्नी तर शरद, संजय व प्रदीप यांच्या त्या आई होत.बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या त्या चुलती होत्या.त्यांच्यावर उद्या सोमवार दिनांक 12 मे रोजी सकाळी नऊ वाजता नाऊर येथील गोदावरीतीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


बेलापूर, प्रतिनिधी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री. मनोजजी आगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त सकाळी बेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक श्री. मनोजजी आगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यानंतर, ग्रामपंचायत बेलापूर येथे श्री. मनोजजी आगे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. आगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम भराटे, दैनिक जय बाबाचे प्रतिनिधी दिलीप दायमा, पत्रकार सुहास शेलार, बाबा शेख, मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, अरुणोदय पतसंस्थेचे संचालक संजय गोरे, गावकरी संस्थेचे संचालक प्रवीण बाठीया, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, विजय कटारीया, महेश कुऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी श्री. मनोजजी आगे यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


बेलापूर(प्रतिनिधी) गेल्या चार दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेले युद्ध पाकिस्तानने विनंती केल्याने अखेर शस्त्र संधी झाल्यामुळे बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुप व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने घोषणा देऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली भारत पाकिस्तान दरम्यान गेल्या सात तारखेपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भारताने पहलगाम हल्याचा बदला घेण्याकरता नऊ अतिरेकी अड्डे उध्वस्त केले त्याचा परिणाम पाकिस्तानने भारताच्या नागरि वस्त्यावर हल्ले सुरू केले. त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक ठिकाणाला ड्रोन च्या साह्याने लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला .परंतु भारताच्या सैन्य दलाने हा हल्ला परतून लावला. पाकिस्तानने भारतावर हल्ला करून निष्पाप नागरिकांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील भारताने संयम राखत केवळ अतिरेकी असलेल्या ठिकाणावरच हल्ले केले.आणि ही बाब जगासमोर आली त्यामुळे अखेर पाकिस्तानला नमते घेत शस्त्र संधी करणे भाग पडले. याच घटनेचा बेलापूर ग्रामस्थ सत्यमेव जयते ग्रुपचे वतीने फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम ,जय जवान जय किसान, सैन्यदलाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तिरंगा हातात घेऊन सत्यमेव जयते ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यानंतर झेंडा चौकात घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकेची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे संजय भोंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कंड,पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, दिलीप दायमा,दिपकसा क्षत्रिय,विलास नागले,अँड. पांडुरंग कोकणे, बाबुलाल पठाण, भगीरथ मुंडलिक,जाकीर शेख,दिलीप दुधाळ,नंदकिशोर दायमा,विशाल आंबेकर, किरण गागरे,गोपी दाणी,गणेश मगर,महेश कुऱ्हे, संजय शिंदे, भाऊसाहेब तेलोरे, प्रविण बाठीया ,राधेशाम आंबिलवादे,दिलीप अमोलिक,अजीज सय्यद, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, इरफान शेख,सुभाष मोहिते, राहुल माळवदे, बबन मेहेत्रे ,सचिन कणसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget