अजमत फातिमा इंग्लिश स्कूल ॲड ज्यूनि. काॅलेजची विद्यार्थीनी तालुक्यात प्रथम
श्रीरामपूर - शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखत श्रीरामपूर येथील सरकार मान्य मान्यताप्राप्त अल्पसंख्याक स्वयं अर्थसहाय्यित संस्था, मोहम्मद इब्राहिम एज्युकेशन सोसायटी संचलित, अजमत फातिमा इंग्लिश स्कूल ॲड ज्युनि. काॅलेज विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत विज्ञान शाखेत निशाद अबुबकर शाह हिने ९०.१७ टक्के गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात तसेच काॅलेज मध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला . द्वितीय क्रमांक जोया जावेद अहमद शेख ७५ टक्के तर तृतीय सबिया अफजल शेख ७१.१७ टक्के गुण मिळवून यशाची नवी शिखरे गाठली आहेत. या कामी यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरनिय श्री.मोहम्मद इब्राहिम साहेब अली शेख साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहसीन शेख सर , उपाध्यक्ष श्री. मतीन शेख सर , सचिव श्री. मुबीन शेख सर , प्राचार्य लुकस दिवे , सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment