Latest Post

कोपरगाव(गौरव डेंगळे)१३/१:सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे सहाव्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दि ११ जानेवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपून वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील अहिल्यानगर,मालेगाव, संभाजीनगर,कोपरगाव,वैजापूर, श्रीरामपूर,राहता,लोणी,शिर्डी येथून २२ शाळेतील ४४ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.या इंग्रजी वकृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांक श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलने पटकावला.दानिश शेख व कनिका सावंत यांनी वकृत्व स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले.स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण माननीय सुहास गोडगे(अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती व गोदावरी बायोरिफायनरीज, साखरवाडी),कल्याणी व्यास,शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नाथलीन फर्नांडिस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून गणेश डांगे,नानासाहेब वाघ व नेहा पहाडे यांनी काम पाहिले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच पारितोषिक प्राप्त शाळेंना मानचिन्ह व बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली.यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विभागाचे शिक्षक यास्मिन पठाण,मोनिका भांडगे,शिल्पा खांडेकर,तरणुम शेख,स्मिता परिमल,हेमा कडू,स्मिता लोखंडे, वैजंती कुटे,स्वप्निल पाटील,साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, विशाल आल्हाट व महेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.




👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ १०,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

ऑक्झोलिअम कॉन्व्हेंट स्कूल अहिल्यानगर ₹ ७०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लोणी ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

संत विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल ₹ ३०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

संजीवनी सैनिकी स्कूल, कोपरगाव ₹ २,०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 न्यू एरा इंग्लिश मीडियम स्कूल, मालेगाव.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

अशोक आयडियल स्कूल श्रीरामपूर.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल, कोराळे ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. 

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

न्याती समता इंटरनॅशनल स्कूल, श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

खंडाळा (गौरव डेंगळे): अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यावतीने जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.१४ तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या १४ शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने समूह गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला व श्रीरामपूर तालुक्यातून एकमेव शाळेने बक्षीस पटकावण्याचा मान मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना रवींद्र पाटोळे,सुनील सिनारे,सुनील खरात,सुनील बिराडे तसेच शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे

प्रवासाचे सहकार्य राधाकिसन बोरकर यांनी केले.तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत खंडाळा,तंटामुक्ती समिती तसेच सर्व पालक वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ती एका कुटुंबासारखी आहे. कुटुंबप्रमुखाचे काम सतत सुरू असते. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही,तरी पण जेवढे मला चांगलं करता येईल तेवढे चांगले करण्याचा मी प्रयत्न करीन.समस्या या न संपणाऱ्या असतात. त्या निर्माण होणारच आहेत,त्यात जेवढया मला सोडवता येतील तेवढे करण्याचा माझा प्रयत्न राहील.सर्व पत्रकारांनी या कामी आम्हाला सहकार्य करावे.पत्रकारांसाठी पत्रकार दिन हा फक्त कार्यक्रमाचे स्वरूप न राहता या निमित्ताने सर्व पत्रकारांचे संपूर्ण बॉडी चेकअप करून शुगर, बीपी, किडनी, कोलेस्ट्रॉल व इतर लिपींग प्रोफाइलची प्रत्येकाची तपासणी नगरपालिकेमार्फत आज आणि उद्या केली जाणार आहे. हा एक वेगळा प्रयत्न आहे. सर्वांशी सल्लामसलत करून भविष्यात आपल्या सहकार्याने नगरपालिकेचा कारभार करू. कामाच्या गडबडीत स्वतःच्या प्रकृतीकडे आपण दुर्लक्ष करतो पण आपण आपलाही विचार करावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.

येथील आगाशे सभागृहात काल नगर परिषदेतर्फे पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रास्ताविकपर भाषण करताना मुख्याधिकारी घोलप बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा हे होते.व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे,संपादक करण नवले,ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी यांची उपस्थिती होती.


प्रारंभ स्वीप कार्यक्रमांतर्गत नगरपालिकेने घेतलेल्या विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित पत्रकारांच्या हस्ते पार पडला.यामध्ये रांगोळी, चित्रकला व इतर स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी नगरपालिकेचे वसुली विभागाचे काम तत्पर असावे,त्यांचे खाते प्रमुख मागे कोपऱ्यात बसतात त्यामुळे पुढे काय चाललंय हे त्यांना कळत नाही.त्यांना पुढे बसवावे. पैसे स्विकारण्यासाठी खिडक्या वाढवाव्यात अशी सूचना केली.

संपादक करण नवले यांनी सण उत्सव काळात रस्त्यांचे सुयोग्य नियोजन करावे. अतिक्रमण विभागाला सूचना द्याव्यात. पालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना आम्ही प्रसार माध्यमे म्हणून योग्य ती प्रसिद्धी देऊ असे सांगितले. 

पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी नगरपालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाला वारंवार सूचना कराव्या लागतात हे बरोबर नाही.या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडावी असे सांगून शहराचा विस्तार वाढत असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन ते चार अभ्यासिका असाव्यात. त्यामधून गोरगरिबांची मुले अभ्यास करून यशस्वी होतील.या बाबीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे असे आवाहन केले.

जयेश सावंत यांनी पत्रकार भवनाचे काम पूर्ण करून ते ताब्यात मिळावे तसेच वसंतरावजी देशमुख यांच्या नावाची व्याख्यानमाला व पुरस्कार पुन्हा सुरू करावेअसे सांगितले. याप्रसंगी पत्रकार अनिल पांडे,रवी भागवत,महेश माळवे,नवनाथ कुताळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित सर्व पत्रकारांचा पालिकेतर्फे मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सर्व पत्रकारांची बीपी,शुगर टेस्ट करण्यात आली. इतर तपासण्या आज पालिकेच्या सरकारी दवाखान्यात करण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे तसेच डॉ.सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्याधिकारी घोलप यांनी पुढाकार घेऊन पत्रकार दिन साजरा करण्याची खंडित झालेली परंपरा पूर्ववत सुरू केल्याबद्दल दोन्ही पत्रकार संघाचे वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

कोपरगाव (गौरव डेंगळे)दि ६ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल,संवत्सर येथे ५२ वे कोपरगाव तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या तालुक्यास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये कोपरगाव तालुक्यातून ३०० ते ३५० शाळांनी सहभाग नोंदवला होता. गणित व विज्ञान मिळून सुमारे ६०० च्या वर प्रयोग प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांने तयार केले होते. या प्रदर्शनामध्ये सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनी कु निकम स्वरा रवींद्र हिने गणित विषयात लहान गटात 

दुसरा क्रमांक पटकावला तर विज्ञान विषयात मोठ्या गटात (इयत्ता नववी ते बारावी) शेटे अनुराग संतोष याने तृतीय क्रमांक पटकावला.या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे, सौ नैथलीन फर्नांडिस व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना गणित विषयाचे शिक्षक अर्चना गायकवाड,रुपाली चांदोरे,रणजित खळे, सुनंदा कदम,प्रसाद भास्कर,वैशाली शिंदे,शितल मलिक,झेबा शेख तसेच विज्ञान विषयाचे नारायण गाडेकर, स्वरूपा वडांगळे,वंदना जगझाप,पल्लवी ससाणे,माधुरी भस्मे,सायली डोखे आदींचे मार्गदर्शन लाभले.

बेलापूर (प्रतिनिधी)-बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक मंचच्या वतीने मारुती मंदिर बेलापूर खुर्द येथे भाविकांना बसण्यासाठी दोन बाक त्याचबरोबर बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीकरिता दोन बाक व  एक तिरडी तसेच शिकळी प्रदान करण्यात आली.               बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक  मंच नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते गावात होणारे निधन व त्यानंतर नातेवाईकांची होणारे धावपळ हे लक्षात घेऊन सहयोग सामाजिक मंचने बेलापूर खुर्द येथील ग्रामपंचायतीला एक तिरडी व शीकळी प्रदान केली तसेच बेलापूर खुर्द येथील मारूती  मंदिरात दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांसाठी बसण्याकरता दोन बाक व बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीसाठी दोन बाक भेट देण्यात आले. यावेळी सहयोग सामाजिक मंचचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ बोर्डे ज्ञानदेव महाडिक बाबुराव फुंदे भाऊसाहेब म्हसे जगन्नाथ महाडिक पुंजाहरी सुपेकर गुरुजी नंदकुमार कुर्हे अशोक सुळ अशोक क्षीरसागर सहयोग पुरुष बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत बडदे उपसरपंच दीपक बारहाते ग्रामपंचायत सदस्य नयनाताई बडदे राणीताई पुजारी ग्राम विकास अधिकारी तुकाराम जाधव निलेश बडदे जगन्नाथ बडदे विलास भालेराव अर्जुन गोरे सुनील बाराते जगन्नाथ बडदे आधीच ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक सामाजिक सहयोग मंचावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले

रयत शिक्षण संस्था, साताराच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय, कोल्हार बुद्रुक येथील तांत्रिक विभागाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी समर्थ धनंजय शिरसाठ याने तयार केलेला डायनॅमिक सायकलचा प्रोजेक्ट अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्याला तांत्रिक विभागाचे शिक्षक शुभम पवार, ऋषिकेश जाधव, राजेंद्र चव्हाणके, मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खडे पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, स्थानिक स्कूल सदस्य बी. के. खर्डे, अजीत मोरे, अशोक आसावा, रविंद्र देवकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी, श्री. तोरणे यांसह सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

बेलापूर (वार्ताहर)श्रीरामपूर तालुका सहकारी फेडरेशनच्या वतीने  पहिल्या गटात गावकरी सहकारी पतसंस्थेला श्रीरामपूर  तालुक्यातील सर्वोत्तम कार्यक्षम पतसंस्था म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व तालुका फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे , अनिरुद्ध महाले, याकुबभाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथील गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ.राजश्री पाटील आणि श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाझे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक चेअरमन साहेबराव वाबळे यांच्यासह संचालक मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सर्वश्री संचालक व्हा.चेअरमन रामेश्वर सोमाणी,जालिंदर पा. कु-हे, शशिकांत उंडे, जनार्दन ओहोळ, रावसाहेब अमोलीक,अजीज शेख, कुलकर्णी यांच्यासह व्यवस्थापक व सेवकवृंद उपस्थीत होते. या सुयशाबद्दल सभासद, खातेदार आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget