Latest Post

बेलापूरःआज माणूस भौतिक  सुखाच्या मोहजालात अडकल्याने त्याचे जिवन कष्टमय बनले आहे.यातून बाहेर पडून जगणे सकारात्मक करणे हाच जिवन आनंदी  करण्याचा मंञ असल्याचे प्रतिपादन बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केले.                               साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आर.बी.एन.बी काॕलेज व स्वामी सहजानंद भारती काॕलेज आॕफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित शिबिरात "जिवन जगण्याची कला"या विषयावर श्री.खंडागळे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.यावेळी प्रा.डाॕबाबासाहेब तोंडे,प्रा.डाॕ.भागवत शिंदे,प्रा.डाॕ जलाल पटेल,प्रा.डाॕ.किरण थोरात,प्र.किर्ती अमोलिक ,प्रा.वैशाली वाघ,प्रा.डाॕ.मेघराज औटी उपस्थित होते.                                                                  श्री.खंडागळे म्हणाले की,आधुनिक भौतिक साधनांनी मानवी जिवन बदलून टाकले आहे.या साधनांनी मानवी भौतिक सुखी झाला असला तरी तो मानसिक सुखाला पारखा झाला आहे.माणसातील संवाद हरपला असून जगण्यात कृञिमपणा आला आहे.आज पैशाला नको इतके महत्त्व प्राप्त झाल्याने पैशासाठी जिवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे.या स्पर्धेत ख-या जगण्याची घुसमट होत आहे.                                                                                      जिवन हे अतिशय सुंदर आहे आणि ते आनंदाने कसे जगावे हे आपल्या हाती आहे.आजकाल माणसे चिंता विकत घेतात घेतात.यामुळे तो दुःखी होतो.जगण्यातला विनोदही हरवत चालला आहे.खरे तर विनोद हे अत्यंत चांगले औषध असून विनोदामुळे जगणे सुसह्य होते.विनादामुळे व हसत खेळत राहिल्याने नकारात्मक विचारांना तिलांजली मिळते.कोणतीही हाव न धरता आणि भौतिक साधनांच्या मागे न पळता सकारात्मकतेने जगणे हा आनंदी जीवनाचा मंञ आहे असे श्री.खंडागळे यांनी अनेक मजेदार किस्से सांगून विशद केले त्यास विद्यार्थ्यांनी मनमुराद दाद दिली.                                                                                       प्रा.डाॕ.भागवत शिंदे यांनी अतिथी परिचय करुन दिला , देविदास गावित याने सूञसंचलन केले तर प्रा.डाॕ.किरण थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अध्यापकांसह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आदी उपस्थित होते.आज गुरुवार (ता.९)रोजी सकाळी १० वा.शिबिराचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - समाजाची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करीत असतात हे काम करीत असताना त्यांच्याकडून चुका देखील होऊ शकतात त्यावर अंकुश ठेवून योग्य पद्धतीने कामकाज होण्यासाठी पत्रकारांचे मोलाचे सहकार्य पोलिसांना मिळत असते.कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये पत्रकारांचे देखील मोलाचे योगदान आहे.काही प्रकरणांमध्ये कोकणीचा बाळगणे आवश्यक असल्याने पत्रकारांना विनंती केल्यानंतर ते सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला देखील काम करताना पत्रकारांची साथ महत्त्वाची असते असे प्रतिपादन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्ताने शहर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संपादक बाळासाहेब आगे होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मगरे व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके जेष्ठ पत्रकार प्रमाण मुद्दा संपादक करण नवले सुभाष नन्नवरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्री देशमुख पुढे म्हणाले की शहरात कायदा सुव्यवस्था राखताना पत्रकारांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे आणि गोष्टींकडे ते आमचे लक्ष वेधत असतात काही बाबी आमच्या लक्षात आणून देतात चुकीचा असेल तर त्यावर टीका देखील करतात परंतु सुदृढ प्रशासनासाठी या बाबी आवश्यक आहेत श्रीरामपूरचे पत्रकारांचे पोलीस खात्याला नेहमी सहकार्य आहे ते पुढे मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी सध्या शहरांमध्ये अनेक प्रश्न आहेत त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच्या काळी असणारी कामकाजाची पद्धत आता बदलली आहे त्यामुळे पत्रकार आणि पोलीस यांनी एकमेकाला सहकार्य करणे आवश्यक आहे असे सांगितले.

मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी शहरातील कायद्यावर सुव्यवस्थेकडे लक्ष वेधताना गेल्या वर्षभरामध्ये शहरामध्ये अनेक स्फोटक प्रसंग आले मात्र पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांच्या सर्व टीमने अतिशय कुशलतेने परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले सन आणि उत्सवाच्या प्रसंगी झेंडे लावणे गैर नाही मात्र त्याला काल मर्यादा असावी शिवाजी चौक सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौकामध्ये लावलेले झेंडे काढून घेणे आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी सूचना केली.

संपादक करण नवले यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सायबर सेलची आवश्यकता भासत आहे कारण सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या संदर्भात नवीन तंत्रज्ञान व पोलीस तपासासाठी पत्रकार व पोलिसांची एखादी कार्यशाळा आयोजित करावी अशी सूचना केली.

जय सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध आहेत आम्हाला पोलिसांचे सहकार्य मिळते तसेच आमच्या सूचना देखील विचारात घेतल्या जातात फक्त एक दिवस कौतुक न करता वर्षभर असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब आगे यांनी श्रीरामपूरची परिस्थिती आता बदलली आहे राखीव मतदार संघ असल्याने पूर्वीसारख्या संघर्ष येथे नसला तरी मागील काही काळामध्ये शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु पोलिसांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळल्याने शहर शांत राहिले आगामी काळात नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने पोलिसांनी प्रत्येक भागामध्ये शांतता कशी राहील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली.

याप्रसंगी उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव गाडेकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे जेष्ठ पत्रकार रमण मुथा करण नवले प्रदीप आहेर सलीमखान पठाण महेश माळवे अनिल पांडे मधुकर माळवे गौरव साळुंके सचिन उघडे राजेंद्र बोरसे मामा विशाल वर्धावे स्वप्निल सोनार स्वामीराज कुलथे   जयेश सावंत असलम दिवसात शफिक पठाण विजया बारसे व इतर उपस्थित पत्रकाराचा पोलीस निरीक्षक देशमुख उपनिरीक्षक मगरे सोळुंके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी मानले.

बेलापूर*(प्रतिनिधी)-वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असणारे राजेंद्र सखाराम कासोदे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे राजेंद्र कासोदे  हे मूळचे आगर वाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असून सन 1990 मध्ये ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरती झाले होते सन 1990 ते 1993 त्यांनी पोलीस मुख्यालय येथे सेवा केली त्यानंतर सन 1993 ला एस आय डी मुंबई यांचे मार्फत बॉम्बशोधक पथकात काम केले 1997 ला महामार्ग रस्ता सुरक्षा पथक ट्रॅफिक मध्ये सेवा केली 2000 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यालयामध्ये सेवा केली 2004 ते 2009 ग्रामीण ट्रॅफिक पोलीस म्हणून सेवा केली 2009 ते 2014 छत्रपती संभाजीनगर येथे बॉम्बशोधक पथकात सेवा केली 2014 ते 2021पोलीस स्टेशन विरगाव येथे सेवा केली 2021 ते 2024 त्यांनी पोलीस स्टेशन वैजापूर येथे काम केले त्यांना  नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून आपल्या समाजाच्या दृष्टीने ही एक आनंदाची बाब आहे त्यांच्या हातून अशी सेवा घडो सदिच्छा अनेक नियुक्ती केली कासोदे यांना मिळालेल्या बढतीबद्दल अनेकांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे

बेलापूर (प्रतिनिधी)-शासनाने हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा देण्यावर बंदी घातलेली असताना बेलापूर गाव व परिसरात सर्व हॉटेलमध्ये सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक कप मध्ये चहा दिला असून हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याची खेळण्याचाच प्रकार असून बेलापूर ग्रामपंचायत ने याबाबत तातडीने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे    बेलापूर गाव व परिसरात अनेक हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या नावाने दर्जेदार चहाची विक्री केली जात आहे बेलापूर गावात चहा पिणारे अनेक शौकीन देखील आहेत या चहा शौकिनांची हाऊस पुरवण्याकरता चहा विक्रेत्यांनी वेगवेगळ्या नावाने इतरांपेक्षा आपण कसा दर्जेदार चहा ग्राहकांना देऊ या करता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे परंतु ही विक्री करताना चहा पिण्यासाठी वापरण्यात येणारे कपबशी, काचेचे ग्लास हे धुण्याचा त्रास होऊ नये म्हणून वापरा आणि फेका अशा प्रकारचे प्लास्टिकचे कप वापरले जात होते परंतु हे कप चहा पिणाराच्या आरोग्यास घातक असल्यामुळे शासनाने या प्लास्टिक कप वर बंदी आणलेली आहे असे असतानाही बेलापुरातील सर्व हॉटेल्स वर ग्राहकांना या प्लॅस्टिकच्या कप मधूनच चहा दिला जात असून प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी व हॉटेल व्यवसायिकांना प्लॅस्टिकचे कप वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

बेलापूर प्रतिनिधी: अंधश्रद्धेमुळे समाजाचे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत असल्यामुळे सर्वांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे, श्रद्धा ठेवा, परंतु अंधश्रद्धा, अंधविश्वास ठेवू नका असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देविदास देसाई यांनी केले.              

बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज ,श्रीरामपूर आणि स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संस्कार शिबिर सन 2024- 25 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरार्थी समोर मार्गदर्शन करताना ते  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना देविदास देसाई पुढे म्हणाले की श्रद्धा असावी‌. पण ती डोळस असावी. आज समाजात देवाधर्माच्या नावाखाली खुलेआम फसवणूक केली जात आहे. अंगात येणे हा एक मानसिक आजार असून अशा आजारी व्यक्तींना त्वरित मानसोपचार तज्ञाकडे नेणे आवश्यक आहे. भूत, भानामती, करणी करण्याच्या नावाखाली आज मोठ्या प्रमाणात आर्थिक  फसवणूक केली जात आहे. यातून समाजाची फार मोठी हानी होते. कुणालाही जादूटोणा तंत्र मंत्र करता येत नाही. असे जर  असते तर आपण आपल्या देशाच्या सीमेवरील सैन्य हटवून हे तंत्र मंत्र करणारे बुवा बाबा यांनाच सीमेवर बसवून मंत्र मारून समोरील शत्रूसैनिक मारण्यास सांगितले असते. परंतु तसे काही होत नाही. त्यामुळे कुणीही तंत्र मंत्र विद्या वशीकरण यास घाबरून जाऊ नये. आपल्या साधूसंतांनी देखील अंधश्रद्धेवर कडाडून टीका केलेली आहे. सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी नवसे करणे कन्यारत्न होती, तरी का करणे लागे पती असे सांगितलेले असतानाही आजही मुलं होण्याकरता नवस केले जातात हे दुर्दैव आहे. आज गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळी दिल्याच्याही घटना घडत आहेत. माणूस  मंगळ ग्रहावर वस्ती करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुप्तधनाच्या लालसे पोटी लहान बालकांचे बळी दिले जात आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. माता पित्याची जिवंतपणीच सेवा करा. भविष्य हे थोतांड असून त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या मनगटावर विश्वास ठेवून काम करा यश आपोआपच मिळेल. भविष्य म्हणजे ठराविक ठोकताळे  असतात असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना पकडलेल्या भोंदू बाबाचे अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनीही त्यास टाळ्याच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. जलाल पटेल  यांनी करून दिला. अध्यक्षिय मनोगत डॉ. योगिता रांधवणे यांनी व्यक्त केले. त्यातून त्यांनी अंधश्रद्धेच्या विचारापासून सर्वांना दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबासाहेब तोंडे, प्रा. डॉ. किरण थोरात, प्रा. कीर्ती अमोलिक, डॉ. चेतना जाधव, प्रा. वैशाली वाघ, प्रा. समीना शेख, प्रा. प्रतिभा गाडे आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. शेवटी प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले

खंडाळा (गौरव डेंगळे) : खंडाळा येथील चित्तरंजन येथे गट नंबर ५३,५४,५५  शॉर्टसर्किटमुळे रविवार (दि.५ जानेवारी) लागलेल्या आगीत ८ ते १० एकर ऊस खाक झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

खंडाळा येथे रविवारी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी नवनाथ गंगाधर ढोकचौळे, रावसाहेब रंगनाथ ढोकचौळे, बबन किसन ढोकचौळे, सागर शंकर सदाफळ या शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस व ठिबक सिंचन जळून गेला.या सर्वांची शेती एकमेकाला लागून असून,या सर्वच ८ ते १० एकरामधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत उसाला आग लागली. यावेळी प्रवारा कारखान्याचा अग्निशमन बंब बोलावला गेला होता. पण आटोक्यात काय आग आली नाही.गावातील १०० ते २०० युवकांनी देखील आज आग विजवायचा प्रयत्न केला. यावेळी कामगार तलाठी पवार भाऊसाहेब व त्यांचे सहकारी दिलीप रंधे यांनी घटनास्थळी येऊन जळीताचा पंचनामा केला.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): नुकत्याच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५० वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये आझाद क्रीडा मंडळचा खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे.

उत्तराखंड येथे होणार अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने

५० वी कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जयंत काळे महाराष्ट्र संघामध्ये आपल्या खेळाची चमक दाखवणार आहे.सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गेली २ ते ३ वर्षापासून तो टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डीचा सराव करत आहे. जयंत हा वाकडी येथील प्रगतशील शेतकरी श्री हरिभाऊ विठ्ठल काळे यांचा नातू व बाळासाहेब हरिभाऊ काळे यांचा चिरंजीव आहे.कबड्डी खेळाचे तज्ञ प्रशिक्षक रवींद्र गाढे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.निवड झाल्याबद्दल त्याचे व्यवस्थापक अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व टाकळीभान येथील पदाधिकारी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget