राजेंद्र कासोदे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
बेलापूर*(प्रतिनिधी)-वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असणारे राजेंद्र सखाराम कासोदे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे राजेंद्र कासोदे हे मूळचे आगर वाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असून सन 1990 मध्ये ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरती झाले होते सन 1990 ते 1993 त्यांनी पोलीस मुख्यालय येथे सेवा केली त्यानंतर सन 1993 ला एस आय डी मुंबई यांचे मार्फत बॉम्बशोधक पथकात काम केले 1997 ला महामार्ग रस्ता सुरक्षा पथक ट्रॅफिक मध्ये सेवा केली 2000 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यालयामध्ये सेवा केली 2004 ते 2009 ग्रामीण ट्रॅफिक पोलीस म्हणून सेवा केली 2009 ते 2014 छत्रपती संभाजीनगर येथे बॉम्बशोधक पथकात सेवा केली 2014 ते 2021पोलीस स्टेशन विरगाव येथे सेवा केली 2021 ते 2024 त्यांनी पोलीस स्टेशन वैजापूर येथे काम केले त्यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून आपल्या समाजाच्या दृष्टीने ही एक आनंदाची बाब आहे त्यांच्या हातून अशी सेवा घडो सदिच्छा अनेक नियुक्ती केली कासोदे यांना मिळालेल्या बढतीबद्दल अनेकांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे