शासकीय नियम धाब्यावर बसून बेलापुरात सर्रासपणे प्लास्टिक कपामधून चहा विक्री
बेलापूर (प्रतिनिधी)-शासनाने हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा देण्यावर बंदी घातलेली असताना बेलापूर गाव व परिसरात सर्व हॉटेलमध्ये सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक कप मध्ये चहा दिला असून हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याची खेळण्याचाच प्रकार असून बेलापूर ग्रामपंचायत ने याबाबत तातडीने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे बेलापूर गाव व परिसरात अनेक हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या नावाने दर्जेदार चहाची विक्री केली जात आहे बेलापूर गावात चहा पिणारे अनेक शौकीन देखील आहेत या चहा शौकिनांची हाऊस पुरवण्याकरता चहा विक्रेत्यांनी वेगवेगळ्या नावाने इतरांपेक्षा आपण कसा दर्जेदार चहा ग्राहकांना देऊ या करता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे परंतु ही विक्री करताना चहा पिण्यासाठी वापरण्यात येणारे कपबशी, काचेचे ग्लास हे धुण्याचा त्रास होऊ नये म्हणून वापरा आणि फेका अशा प्रकारचे प्लास्टिकचे कप वापरले जात होते परंतु हे कप चहा पिणाराच्या आरोग्यास घातक असल्यामुळे शासनाने या प्लास्टिक कप वर बंदी आणलेली आहे असे असतानाही बेलापुरातील सर्व हॉटेल्स वर ग्राहकांना या प्लॅस्टिकच्या कप मधूनच चहा दिला जात असून प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी व हॉटेल व्यवसायिकांना प्लॅस्टिकचे कप वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे