मंडलाधिकारी मंडलिक यांचे करिता दहा हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मदतनीस वडीतके विरुद्ध गुन्हा दाखल
बेलापूर प्रतिनिधी-- गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर न घेण्याकरता मंडळ अधिकारी यांचे सहाय्यक यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली याबाबतची तक्रार अहिल्यानगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलापूर प्रभारी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे सहाय्यक मदतनीस शहाजी वडीतके धंदा खाजगी मदतनीस मंडलाधिकारी यांनी गळलिंब येथील तक्रारदार यांनी खरेदी केलेली खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर न घेण्याकरता अर्ज दाखल केला सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलाधिकारी श्रीरामपूर अतिरिक्त कार्यभार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे सुरू होती या तक्रार अर्जाचा तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी मंडलाधिकारी कार्यालय येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी वडीतके यांनी मंडलाधिकारी मंडलिक यांचे करिता रुपये दहा हजार लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 18 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांचेकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी शहाजी वडीतके खाजगी मदतनीस मंडळ अधिकारी बेलापूर याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हरकत अर्ज प्रकारचे निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे करिता रुपये दहा हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी शहाजी वडीतके यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट पोलिस अमलदार सचिन सुद्रुक पोलीस अंमलदार गजानन गायकवाड पोलीस अंमलदार उमेश मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल हारुण शेख यांनी केली