Latest Post

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): कोपरगांवमध्ये भारत माता की जय,वंदे मातरम, सायकल रॅलीने शहर दुमदुमले.घरोघरी तिरंगा फडकवण्याच्या मोहिमेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सायकल रॅली काढली.

७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उत्साही सायकलपटूंनी त्यांच्या डॅशबोर्डवर तिरंगा फडकवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री शारदा स्कूल पर्यंत तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये शाळेतील १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाला प्रोत्साहन दिले.सायकल रॅलीमुळे आज कोपरगाव नगरी हे तिरंगामै झालेली दिसून आली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल विकास योजना ४. ० प्रायोजित स्किल हब इन कॉलेजेस या योजनेअंतर्गत सीनियर ब्युटी थेरपिस्ट या कोर्स अंतर्गत प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आयोजीत फॅशन व मॉडेलिंग शो स्पर्धेत एम. कॉम. ची विद्यार्थिनी कू. आयुर्षा ज्ञानेश्वर गवले ही सर्वप्रथम येऊन तिला मिस् सीडीजे २०२४-२५ हा किताब देऊन गौरविण्यात आले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररुप डाकले महाविद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यात विजेत्या ठरलेल्या कु. आयुर्षा  गवले हिला प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या हस्ते मानाचा मुकुट ट्रॉफी, आणि किताब प्रदान करुन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ब्युटी एक्सपर्ट सौ. शिल्पा बोरावके, सौ. रत्नमाला धनवटे व सौ. पुनम दराडे यांनी काम पाहिले. तिला कोर्सचे समन्वयक प्रा. अर्शद शेख यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांची ती कन्या आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्सचे समन्वयक प्रा. अर्शद शेख, उपप्राचार्य  डॉ. सादिक सय्यद, प्रा.सुभाष देशमुख, डॉ. संतोष घंगाळे, प्रा. विजय नागपुरे व  प्रा. सचिन कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सुयशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

श्रीरामपूर:-दिनांक ०४-०८-२०२४रवीवार रोजी श्रीरामपूर विधानसभाचे आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांनी फातिमा हौसिंग सोसायटी वार्ड नं ०१ ईदगाह संजय रोड मधील रहिवाशाशी संवाद यात्रेच्या निमित्ताने येथील रहिवाशांशी संवाद साधुन नुकतीच  श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर - समाजसेवक - व - 🌲 झाडे लावा -  झाडे जगवा- पर्यावरणाचा समतोल राखा 🌲 या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन चळवळीचे श्रीरामपूर शहरातील प्रणेते -पुरस्कर्ते व तसेच रमजान महिन्यातील  " इस्लाम समजून घेताना" या जागतीक प्रसिद्ध मालिका लेखनाचे लेखक व विविध स्थरातील सामाजिक चळवळीमध्ये सतत भाग घेणारं व्यक्तीमत्व डॉ .सलीम सिकंदर शेख,  बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर यांची निकतीच महाराष्ट्र राज्यातील " विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक चळवळी "चे  श्रीरामपूर तालुका  अध्यक्ष पदी निवड झाली म्हणून आमदार श्री लहुजी कानडे साहेबांनी स्वतः हुन बोलावून  सत्कार व  सन्मान करण्यात आला.. त्यावेळी आपल्या खास भाषणात विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक चळवळीच्या बाबतीत दहा मिनिटे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बाबतीत गौरव उदगार काढून प्रशंसा केली. यावेळी  विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नुकतीच  उप- अध्यक्ष म्हणून निवड झालेले व प्रसिद्ध कवी रज्जाक शेख सर यांनी कार्यक्रमाचे आपल्या कवी मनाच्या शैलीत सूत्रसंचालन व प्रास्तावीक केलेत. 

यावेळी नगरसेवक राजेशजी आलघ, समाजसेवक रज्जाकभाई पठाण, मुख्याध्यापक हाजी जाकीर शहा सर , हाजी अल्ताफ शहा सर ,  सेंट्रल रेल्वे चे  नईमखान पठाण ,  नदीम मेमन सोडावाला , राजु पठाण,व  फातिमा हौसिंग सोसायटीतील रजा - ए- इलाही या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रजा शकूर शेख व त्यांचे विविध पदाधिकारी शोएब तांबोळी,सलमान शेख, जावेद शेख,परवेज शेख,आदिल शेख,सलमान पठाण व फातिमा हौसिंग सोसायटीतील विविध प्रतिष्ठित उपस्थितांनी ही आपल्या हस्ते ही डॉ सलीम शेख यांचा सत्कार सन्मान व कौतुक केले..

श्रीतमपूर प्रतिनिधी:-काझी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष शफीसाहेब काझी यांचें बंधु आणि मौलाना सय्यद अकबर अली (शहर काझी) यांचें मित्र समिर साहेब काझींची नियुक्ती महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या चेअरमन पदी झाल्या बद्दल सहर्ष स्वागत व अभिनंदन करतांना शहर काझी अकबर अली, सोलापूर चे शहर काझी अमजद अली,बिड चे अध्यक्ष शफीसाहेब काझी

कोपरगांव (गौरव डेंगळे):वयाच्या ५५ व्या वर्षी सोमैय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम डियम स्कूलचे मराठी विभाग प्रमुख बी के तुरकणे कळसुबाई शिखर सर केले.

कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेत राज्यातील सर्वात उंच शिखर असून, समुद्रसपाटीपासून त्याची उंची १६४६ मी. इतकी आहे. शिखरावर चढाई करण्यास कठीण वाट आहे.अशा खडतर मार्गाने तुरकणे या ५५ वर्षाच्या ज्येष्ठ शिक्षकाने २ तास ४२ मिनिटांत कळसुबाई शिखर सर केले.याआधीही त्यांनी ब्रह्मगिरी, शिवनेरी, देवगिरी किल्ले सर केले असून, लहान वयात ट्रेकिंगची त्यांना आवड असून, जिद्दीने शिखर चढाई करतात. त्यांना योगाची ही आवड आहे.रोज सकाळी ते नियमित २१ सूर्यनमस्कार देखील करतात. त्यांच्या या यशस्वी कळसुबाई शिखर चढाई बद्दल त्यांचे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे,सौ नथलीन फर्नांडिस तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

गौरव डेंगळे (२९/७) :भारतीय नेमबाज मनू भाकरनं इतिहास रचला आहे. मनूनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं.भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज आहे. मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. तिनं शेवटच्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केलं होतं, परंतु १० मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिचं पिस्तूल खराब झालं. यामुळे तिला मागच्या वेळी पदक जिंकता आलं नव्हतं.मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २२१.७ गुणांसह कांस्यपदक जिंकलं. अंतिम फेरीत मनूनं सुरुवातीपासून तिसरं स्थान कायम राखलं. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदकं दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली. ओ ये जिननं २४३.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकलं तर किम येजीनं २४१.३ गुणांसह रौप्य पदक जिंकलं.मनू भाकरनं पात्रता फेरीतही तिसरं स्थान पटकावले होतं. नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. यासह तिनं नेमबाजीत भारताचा १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपवला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदकं जिंकली होती.

२२ वर्षीय मनू भाकरनं पॅरिस २०२४ ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला आहे.२१ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी इतक्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.२०२३ आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात पाचव्या स्थानावर राहून मनूनं भारतासाठी पॅरिस २०२४ ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मनू भाकर ही सर्वात तरुण भारतीय आहे. गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे.

हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरनं शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय तिनं ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेतला, ज्यातं तीनं राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. बॉक्सिंगदरम्यान मनूच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला. पण मनूला खेळाची वेगळी आवड होती, त्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली.रिओ ऑलिम्पिक २०१६ नुकतंच संपलं असताना मनूनं वयाच्या १४ व्या वर्षी नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आठवडाभरात तिनं वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं. यानंतर वडील राम किशन भाकर यांनी तिला बंदूक विकत घेऊन दिली. याच निर्णयानं मनू भाकरला ऑलिम्पियन बनवलं.

सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा अन्यथा काम बंद अंदोलन छेडणार - देसाई

मागण्या वरीष्ठांना कळविल्या, सर्व्हअर तातडीने सुरळीत होईल - मिलींदकुमार वाघ भोकर(वार्ताहर) - सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानच्या ई पॉझ मशीनचे सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा, धान्य वितरणास मुदत वाढ द्या, गेल्या चार महिण्यांपासूनचे थकीत कमीशन द्या अन्यथा कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या महिण्यापासून मोफत धान्य लाभार्थी रेशनकार्ड धारकांच्या प्रत्येक सदस्याचे याच ई पॉझ मशीनवर ई के वाय सी करण्याचे आदेश आले त्याप्रमाणे कामकाजास सुरूवात झाली अन् ई पॉझ मशीन बाबतच्या तक्रारी सुरू झाल्या. ई के वाय सी करताना अनेकदा मशीन रिस्टार्ट होत आहे. अनेकदा सवर्हअर डावून होत आहे. लाभार्थीचा थम्स आला नाही तर प्रत्येक थम्सच्या वेळी आधार क्रमांक टाकावा लागत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपुर्वी आलेल्या नवीन व्हर्जन मध्ये प्रत्येक वेळी पासवर्ड टाकावा लागत आहे, प्रत्यक्षात जेथे दुकानदारांचा व लाभार्थींचा थम्स असतो तेथे पासवर्ड ची गरज नसताना केवळ मानसिक त्रास देण्यासाठी हा पासवर्ड टाकल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

गेल्या महिण्यातील सर्व्हअरच्या तक्रारीरींच्या तुलनेत या महिण्यात सर्व्हअरच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने धान्य वितरणास हि मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात गेल्या चार दिवसांपासून सर्व्हअर डावून मुळे हि यंत्रणाच कोलमडली आहे. दररोज दुकानदार दुकान उघडून बसत आहेत पण या सर्व्हअरच्या अडचणीमुळे लाभार्थी धान्यासाठी व ई के वाय सी करीता दुकानात चकरा मारत आहेत. पर्यायाने दुकानदार अन् लाभार्थीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहेत. या ई के वाय सी व धान्यासाठी अनेक लाभार्थींना आपल्या रोजंदारीला मुकावे लागत आहेत. पर्यायाने दुकानदार व लाभार्थीमध्ये हा वादाचा मुद्दा ठरत आहे.

या सर्व अडचणी सोडविण्यासाठी श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दि. 3 जुलै रोजी यात दुरूस्ती करण्याची मागणीचे निवेदन दिलेले असताना या सर्व्हअरच्या अडचणी वाढल्याने संतप्त दुकानदारांनी आता या सर्व्हअरमध्ये तातडीने दुरूस्ती न झाल्यास कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. त्याच बरोबर सर्व्हअर अडचणीमुळे अनेक दुकानदारांचे धान्य वितरण शिल्लक असल्याने हे धान्य वितरणास ऑगष्ट पर्यंत मुदतवाढ द्यावी व गेल्या चार महिण्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांना कमीशन मिळालेले नाही ते त्वरीत दुकानदारांना अदा करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, शहराधयक्ष प्रकाश गदीया, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड, चंद्रकांत गायकवाड, धनु झिरंगे, राजेंद्र वाघ आदिंसह तालुक्यातील दुकानदारांच्या सह्या आहेत.

ई पॉझ चे सर्व्हअर लवकरच सुरळीत होईल - तहसिलदार वाघ

सर्व्हअरच्या अडचणींसह दुकानदारांच्या सर्व अडचणी वरीष्ठांना कळविण्यात आल्या असून तातडीने सर्व्हअर दुरूस्तीच्या सुचना संबधीतांना देण्यात आल्या असून उर्वरीत अडचणी ही तातडीने सोडविण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांनी दिले.

सर्व्हअर तातडीने दुरूस्ती न झाल्यास ई पॉझ मशीन शासनाकडे जमा करणार - देसाई, पठाण

प्रत्यक्षात अनेकदा रेशनकार्डधारक कुटूंबातील सर्व सदस्यांसह रेशन दुकानात ई के वाय सी करण्यासाठी व धान्य घेण्यासाठी येतात त्यावेळी सर्व्हअर डावून असल्याने दुकानदार व कार्डधारकांत चांगलेच वाद होतात अशा वेळी कार्डधारक दुकानदारांना विनाकारण शिव्याशाप देत असल्याने दुकानदार ही या प्रकारे त्रस्त झालेला असल्याने आमच्या अडचणी तातडीने न सुटल्यास व तातडीने सर्व्हअर दुरूस्ती होवून वितरण सुरळीत न झाल्यास लवकरच जिल्ह्यातील सर्व दुकानदार हे ई पॉझ मशीन शसनाकडे जमा करणार असल्याचे इशारा जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई व जिल्हा सचीव रज्जाक पठाण यांनी दिला आहे.

सर्व्हअर अडचणी सोबत इतर अडचणींचे निवेदन तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई समवेत चंद्रकांत झुरंगे, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड आदिंसह दुकानदार दिसत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget