Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी:- येसगाव तालुका खुलताबाद तेथील  सामाजिक कार्यकर्ते व विहीर ठेकेदार अली मुंशी शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्य पदावर निवड करण्यात आली असून राजनीति समाचार वेब चॅनलच्या खुलताबाद प्रतिनिधी पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे

पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात अली मुंशी शेख यांना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करून निवड केली अली शेख यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, युवक प्रदेशाध्यक्ष संदीप पवार, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज महंमद के. शेख, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट विलासराव पठाडे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, मराठवाडा प्रदेश महासचिव मीर अली सय्यद, महाराष्ट्र प्रदेश महासचिव उस्मान शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज महंमद आर. शेख, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजलखान, पुणे शहर अध्यक्ष हनीफ भाई तांबोळी, धुळे जिल्हाध्यक्ष रईस हिंदुस्तानी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, महाड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल, नासिक जिल्हाध्यक्ष सुखदेव केदारे, यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर - मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईद-उल-फितर अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात शहर व परिसरात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील ईदगा व जामा मशीद सह शहरातील सर्वच मशीदींमध्ये ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले .

बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर ईदच्या तयारीला वेग आला. रात्री उशिरापर्यंत चौका चौकात व शहरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी मुस्लिम बंधू-भगिनींची झुंबड उडाली होती. सर्वच मशिदीमधून रात्री लैलतुल जायजा ची विशेष प्रार्थना करण्यात आली.


काल सकाळी नऊ वाजता जामा मशीद मध्ये ईद ची नमाज अदा करण्यात आली. प्रमुख धर्मगुरू मौलाना मोहम्मद इमदाद अली यांचे धार्मिक प्रवचन झाले. मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी ईदच्या नमाज ची इमामत केली.

ईदगामध्ये दहा वाजता ईद ची नमाज संपन्न झाली.मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांचे धार्मिक प्रवचन झाले. शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली यांनी नमाजची इमामत केली.

याशिवाय शहरातील मक्का मस्जिद, मदिना मस्जिद,गौसिया मस्जीद, मदरसा रहमते आलम, मुसा मस्जिद, गरीब नवाज मस्जिद, जैनब मस्जिद सह अनेक मशीदींमधून ईद ची नमाज अदा करण्यात आली .

जामा मस्जिद व ईदगामध्ये मुस्लिम बांधवांना ईद मुबारक च्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी नगराध्यक्ष संजय फंड,माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, शिवसेना नेते संजय छल्लारे,अशोक थोरे मामा,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, हेमंत ओगले, अशोक उपाध्ये, जयंत चौधरी,माऊली मुरकुटे, अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, महेंद्र त्रिभुवन, अशोक बागुल, डॉक्टर रवींद्र कुटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लकी सेठी, दिलीप नागरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, डॉक्टर दिलीप शिरसाट,नितीन गवारे, रवी भांबरे, कैलास बोर्डे, प्रसन्ना शेटे, अविनाश पोहेकर, संजय फरगडे, संदीप चोरगे, तेजस बोरावके,विजय खाजेकर, सुभाष त्रिभुवन, मिलिंदकुमार साळवे,अशोक भोसले, डॉक्टर संजय साळवे, सत्यनाथ शेळके,नितीन गवारे,अरुण मंडलिक, गोरख कंदलकर, दीपक कदम, प्रवीण जमदाडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अर्चना पानसरे,सोनल मुथा आदिसह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

ईदगामध्ये आमदार लहुजी कानडे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली तर एडवोकेट जयंत चौधरी यांनी ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक अविनाश आदिक व अनुराधा आदिक यांनी मुस्लिम समाजासाठी केलेले काम मुस्लिम समाजाला ज्ञात आहे असे सांगितले.

जामा मशीद मध्ये नगरसेवक मुख्तार शहा, डॉक्टर राज शेख, रज्जाक पठाण, जावेद शेख, मोहसीन बागवान, तनवीर रजा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर इदगाह मध्ये कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख,जिकर मेमन, गफार पोपटिया, याकुब बागवान, अश्फाक शेख व इतर मान्यवरांनी स्वागत केले.

येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने देशाचे भले करणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी याप्रसंगी केले.ईदच्या नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.तहसीलदार वाघ तसेच पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांच्यासह पोलिस विभागाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.शांततेत ईद संपन्न झाली.

राज्यातील विविध वर्तमानपत्रातून रमजान लेखमालेचे लेखन करून समाज जागृती केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मस्जिद मध्ये आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुरात ईदगाह मैदानावर नमाज पठण करुन मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी केली या वेळी हिंदु बांधवांनी देखील रमजान ईदच्या  शुभेच्छा दिल्या . महीनाभर उपवास (रोजा) केल्यानंतर काल चंद्रदर्शन झाले अन मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्सहात ईद साजरी केली .ईदगाह मैदानावर सकाळी सर्व मुस्लीम बांधव ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी  जमा झाले होते. या वेळी मौलाना  मुफ्ती मुर्शिदा रजा यांनी नमाज पठण करुन सर्वांना सुख शांती लाभू दे ,पाऊस वेळेवर व भरपुर पडू दे, रोगराई कमी येवु दे अशी प्रार्थना अल्लातालाकडे केली. या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,उपसरपंच मुस्ताक शेख,माजी सरपंच भरत साळूंके , प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, पत्रकार देविदास देसाई ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,प्रभात कुऱ्हे,गावकरी पटसंस्थेचे संचालक महेश कुऱ्हे,यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या वेळी मोहसीन सय्यद यांनी मस्जिद बांधकामासाठी मदतीने अवाहन केले त्यास मुस्लीम बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रभात कुर्हे  पत्रकार हाजी शफीक बागवान आदिसह जवळपास दोन ते आडीच हजार मुस्लीम बांधवा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे सलग पाचव्या वर्षी पूर्ण महिन्याचे रोजे उपवास करून येथील लताबाई पोपटराव वाघचौरे(औटी मॅडम) यांनी धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.सौ.लताबाई वाघचौरे या नगरपालिका शाळेच्या सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत.आज त्यांचे वय 60 वर्षे आहे. कोरोना काळात 2020 पासून दरवर्षी त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे महिनाभराचे पूर्ण रोजे करण्यास सुरुवात केली आणि यावर्षी सलग पाचव्या वर्षी हे रोजे पूर्ण केले आहेत.याबाबत बोलताना सौ. वाघचौरे यांनी सांगितले कि रमजान महिन्यात रोजी धरण्याची परंपरा आमच्या कुटुंबात फार पूर्वीपासून आहे.माझी आजी सासू तसेच सासूबाई या सुद्धा रमजानचे रोजे घरीच होत्या सोनगाव येथील जी मशिद आहे तेथे माझे सासरे व सासू यांनी नवस केला होता त्यानंतर त्यांना पाच मुले झाली.त्यानंतर माझ्या सासूबाईंनी हे व्रत चालू ठेवले.त्यांना पाहून मी सुद्धा मला मुलगा झाला तर मी रोजे ठेवीन असा नवस केला.1992 साली मला पुत्रप्राप्ती झाली त्यानंतर मी 1994 पासून रोजी धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीची 28 वर्षे मी दोन ते दहा पर्यंत रोजी दरवर्षी करीत होते परंतु कोरोना काळात सन 2020 पासून मी पूर्ण महिन्याचे रोजे करण्यास सुरुवात केली आणि आता यावर्षी सलग पाचव्या वर्षी मी रमजान चे पूर्ण महिन्याभराचे रोजे पूर्ण केले आहेत.रोजे पूर्ण केल्याने शरीर शुद्ध होते तसेच वर्षभर प्रसन्न वाटते.मला अस्थम्याचा त्रास होता परंतु रोजचे धरणामुळे तो त्रास सुद्धा गेला.मला चैतन्य वाटते शिवाय देवावर असलेल्या आढळ श्रद्धेमुळे आज वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा कडक उन्हाळ्यातही मला कसलाही त्रास झाला नाही.अल्लाह च्या कृपेने दरवर्षी माझी मनोकामना पूर्ण होते. यावर्षी माझ्या सुनबाई डॉक्टर झाल्या तसेच माझ्या मुलाला व मुलीलाही मुलगा झाला.मी खूप आनंदी आहे अल्लाहने सर्वांना आनंदी ठेवावे हीच माझी प्रार्थना आहे.माझ्या या संकल्पपूर्तीमध्ये माझे पती पोपटराव वाकचौरे मुलगा डॉक्टर गणेश सून डॉक्टर रचना यांचे खूप सहकार्य लाभले त्यांनी रोजी धरण्यासाठी मला प्रोत्साहन दिले.या कामे माझे बंधू सलीमखान पठाण यांचे सुद्धा मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले असेही त्यांनी सांगितले.सौ लताबाई वाघचौरे यांनी रमजानचे रोजे पूर्ण करून हिंदू मुस्लिम तालुक्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर घालून दिले आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

दिनांक ०६/०४/२०२४ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून नांदूर शिवार ता. राहाता येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर चे निरीक्षक श्री अनुपकुमार देशमाने यांनी दिली.

सदर कारवाई मध्ये एकूण ०१ गुन्हा नोंद करण्यात आला असून ४१८० ली.कच्चे रसायन व ३०० ली . हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु.२,०४,८००/- इतकी आहे सदर कारवाईत एकूण ०१ आरोपी वर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद कारण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर श्री. प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर, श्री जी. एन. नायकोडी दुय्यम निरीक्षक, श्री एस. एस. पवार दुय्यम निरीक्षक, श्री के. के. शेख सहा. दुय्यम निरीक्षक, श्री एस.डी.साठे सहा. दुय्यम निरीक्षक, श्री. तौसीफ शेख जवान, व महिला जवान श्रीमती एस. आर. फटांगरे, श्री एन.एम. शेख जवान नि वाहन चालक यांनी सहभाग घेतला आहे. अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर यांनी दिली.

asten

 रमजानुल मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर:-  ३० 

बुधवार दिनांक १०-०४-२०२४ 



!!  रोजा ३० : आत्मचिंतन - अवलोकनातुन ;-   सकारात्मक भविष्यासाठी स्वयंप्रेरणा ..!!


आज लैलतुल जायजा .. अर्थात" जायजा " म्हणजे अवलोकन " आज महीनाभर ठेवलेल्या रोजे( उपवास) चं आपण केलेल्या खडतर प्रवासाचं (अवलोकन) जायजा करणं . खरोखरच इमानेइतबारे केले असेल तर अल्लाह जवळ त्याचं बक्षीसाची मागणी करणं .अपण केलेल्या महिन्याभराच्या कष्टाचं परिक्षण करुन फळ देणं हे त्यांच्या हातात.

       कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेणे यासाठी आवश्यक आहे की, त्यात पारंगत व्हावे आणि त्याअनुषंगाने कामे सोपे व्हावीत. आपण मुख्यत्वेकरून पाहतो, शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, मिलिट्री, खाजगी संस्थांमध्ये आपल्या कर्मचार्‍यांच्या व्यक्तीमत्वात, कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून सदरच्या उमेदवाराची कार्यक्षमता तपासली जाते, त्याच्यात प्रशिक्षणातून होणार्‍या बदलाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जाता आणि त्यावरून त्याच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. 

असेच सर्वांगीण प्रशिक्षण वर्षाकाठी एक महिना ईश्‍वराने श्रद्धावंतांंसाठी रमजानुल मुबारक मध्ये ठेवले आहे. मित्रानों! रमजानमध्ये महिनाभर आम्ही रोजे ठेवले, कुरआन पठण केले, सर्व वाईट गोष्टीं- सवयी- व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले.  शक्य तितक्या उच्चकोटीच्या नैतिकतेला प्राधान्य दिले.  मित्रानों,हे काम अजून संपलेले नाही व नसतात देखील व हेच कार्य आम्हाला पुढील 11 अकरा महिने अमंलात आणायचे आहे.  इमान, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामच्या मुलभूत पाच तत्वांपैकी आम्ही चार तत्वांना रमजामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याचा कसोशीने प्रयत्न केला . आपल्याला सत्यावर चालणारे आणि वाईटांपासून इतरांनाही दूर करणारे शिलेदार बनायचे आहे.   कुरआनमध्ये ईमानधारकांबद्दल असे सांगितले आहे की, “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.”  (सुरह नंबर ३ आ.नं. ११०)

मित्रानों, या आयातीवरून समजते की, श्रद्धावंतांना संपूर्ण मानवकल्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहेत , 

 रमजानच्या काळातील प्रखर प्रशिक्षणानंतर समजून येते की, आम्हाला ज्या अर्थी उन्हाचे चटके सहन करीत, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची कडक तंबी दिली गेली. काही काळापुरते वैध गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले गेले. उच्चकोटीचा संयम, धैर्य अंगी बाळगण्याचे मनोबल रमजानमध्ये मिळाले. मित्रानों, हे कठीण प्रशिक्षण ठराविक कालावधीत अर्थात संपूर्ण रमजान महिनाभर संपूर्ण जगात दिले गेले. यानंतर या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्याला सर्व मानवकल्याणाच्या हिताचे कार्य करायचे आहे. 

                दिव्य कुरआनच्या पुढे काय सांगते  ”हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे  आमंत्रित करा  मुत्सद्देगिरीने व  उत्तम उपदेशासहित ,  आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.”  ( सुरह नं १६ अल - नहल आ.न. १२५ ).

तुम्ही जर तुमच्या अल्लाहाने सांगितले प्रमाणे या पृथ्वीतलावर मनापासून फक्त अल्लाहच्या इच्छेसाठीच काम करीत राहिले तर नक्कीच त्यांचे चांगले बळ मिळते..पुढे दिव्य कुर आन म्हणते की , ” आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.  (सुरह नंबर ४१ अल - सजजदाह आ.नं.३४ ). 

तुम्ही केलेल्या महीनाभरातील खडतर प्रशिक्षणाचा उपयोग तुम्हाला सर्व समाजातील लोकांना फायदा करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे.. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी, त्यांना वाईट सवयी पासून दुर करण्यासाठी  ,  त्यांना आपल्या प्रपंच चागले चालावा व आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी तत्पर राहावेत यासाठी, तुम्हाला तुमच्या सभोवताली असलेल्या सामाजिक समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हक्कासाठी, प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून भांडणे होतात ते होणार नाही म्हणून प्रयत्न करण्यासाठी , समता बंधुता अखंडता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे.

     "बदलते वातावरण आणि आपली भूमिका "

मित्रानों! देशाचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ केले जात आहे. धर्माच्या नावावर आपआपसांत लोकांना भडकाविले जात आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे. धर्माबाबात कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. 

    दिव्य कुरआन ही हेच फरमावितो, ”तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.” ( पारा नं ३० सुरह नं. १०९ ,अल- काफीरून आ.नं.१०९)  

   पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, ”धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे.”  ( सुरह नं. २ अल - बकराहा आ.नं. २२३ )

 सदरील कुरआनच्या आयातीवरून आम्हाला बोध मिळतो की, धर्मासंबंधी कुठलाही अतिरेक करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये, संवादाने एकमेकांची भूमिका समजून घ्यावी. शक्य तेवढे एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते,  वाद विकोपाला जाणार नाहीत याची सतत काळजी घ्यावी. आप आपसात विसंवाद निर्माण होता कामा नयेत , आपल्या बुद्धीच्या क्षमतेने विचार करून मार्गस्थ व्हावे. समेट घडवून आणला पाहिजे.

                        राजकारण करायचेच असेल तर खरोखरच समाज कारण व लोककल्याणासाठी केेले पाहिजे. परंतु, त्या ऐवजी समाजात विषाची बिजे पेरली जात आहेत. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आजचे समाजकारण राजकारण गेलेले आहेत,तर त्याला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे  व जे चुकीचे चालले आहे ते रोखायची जबाबदारी सर्व समाजातील श्रद्धावंत आणि समाजधुरीणांकडे आहे.  त्यांनी खरोखरच यासाठी कसोशीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.. अल्लाहा म्हणतात प्रयत्न करणं तुमचे काम नंतर त्याचं फळ देणं हे माझं काम मी सर्वांचं मन परिवर्तन करणारा जरूर आहे.. प्रयत्न तर करून तर बघा, आजचं राजकीय पक्ष फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी समाजात विष पसरविण्याचे काम करीत असतात,

विष हे कोणासाठीच अमृत ठरत नाही. मग ते स्लो पॉईजन असो की कडक. आज नाही तर उद्या ते आपला गुण दाखविण्यास सुरूवात करते. 

                   दिव्य कुरआनमध्ये सांगितले आहे की,  

”आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.  (पारा नं. १३ ,सुरह नं. १४ अल - इब्राहीम  आ.नं. ४२ ). 

             पृथ्वीतलावर सुधारणा करण्यासाठी कुर आन म्हणते‌ की,   ”जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ”आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!” ( सुरह नं. २ अल- बकराह आ.नं.११. ) व हो  ”सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही. ( सुरह नं.२ अल- बकराह आ. नं. १२ )."

मित्रानों, या कुरआनच्या आयाती ज्या उपद्रव माजविणार्‍यांविरूद्ध आहेत. कोणीही कुठल्याही समाजघटकाचे का असेनात दंगे, उपद्रव माजवू नका आणि जे माजवित आहेत त्यांना रोखा,  आशा उपद्रवी संघटनेत सामील होवू नका.  ईश्‍वराने प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिली आहे, त्याचा उत्तम फायदा जनकल्याणासाठी करावा.

पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, “  ज्याने कोणा एकाला ही जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.”  (सुरह नं. ५ अल- माईदा आ.नं.32).

या आयातीवरून बोध मिळतो की आपल्या हातून कधीच नाहक व्यक्तीचा खूनच काय, त्याचा हक्क ही मारला जावू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. 

            कुरआनमध्ये फरमाविले, “काळाची शपथ आहे, मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.  ( सुरह १०३ सुरह अल - हश्र आ.नं.१ते ३ ) " .

सर्व श्रध्दावान बंधुंना  विनंती आहे की, त्यांनी दैनंदिन जीवनात दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचं मार्गदर्शन आत्मसात करून समाजात नैतिक बदलासाठी पुढाकार घेऊन सत्कर्माचे काम हाती घ्यावे. लोकांना वाईटापासून रोखावे, जे समाजात उपद्रव माजवत आहेत,  विनाकारण सामान्य माणसांना त्रास देत आहेत, मानवकल्याणाच्या विरूद्ध जाऊन वागत आहेत अशांचा शोध घेऊन संवैधानिक मार्गाने त्याविरूद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करावा आणि लोकांमध्ये ईश्‍वरीय मार्गदर्शन पोहोचवावे. हाच रमजाननंतरच्या प्रशिक्षणाचा संदेश.

मित्रानों, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाने जीवन कसे जगावे, जगण्याची नियमावली कशी असावी,  त्याची आचार-विचार करण्याची पद्धती कशी असावी? कोणाशी कसा संवाद साधावा, त्याचे अध्यात्मिक जीवन कसे असावे, त्याने पारलौकिक जीवनाची तयारी कशी करावी, ऐहिक जीवनात प्रगती करताना कोणती नैतिक मुल्य अंगी बाळगावीत अशा एक ना अनेक मनुष्याच्या जीवनासंबंधी  मार्गदर्शन आपल्या परीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे...

तरच या संपूर्ण रमजानुल मुबारक खडतर प्रवासाचा व प्रशिक्षणाचं फलीत राहीलं...

अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देवो हिच अल्लाहच्या जवळ दुआ याचना करतो 

  "  उद्या ईद उल फिजत्र चा दिवस सर्वांना सुखरूप जावो हिच अल्लाह जवळ दुआ याचना करतो "

    ईद मुबारक २०२४ ..



( .मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर कळवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. प्रतिक्षेत )

 रमजान मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर २९ वा .

मंगळवार दिनांक ०९-०४-२०२४ 



लेखन,:-  डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,मिल्लतनगर ,

     श्रीरामपूर 

९२७१६४००१४ 


इस्लाम:-!!  बुरखा - पडदा - हिजाब - समजून घेत -  काळा प्रमाणे वापरणं गरजेचं....!!


                 #  दिव्य कुर आन सांगितले की, " पैगंबर ! आपल्या पत्नींनां , व मुलींना आणि श्रध्दावंत स्त्रियांनाही सांगां , ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) की, त्यांनी बाह्य वस्राचा ( Outer Garments,चादर ) भाग आपल्या अंगाभोवती ( अगांवर ) स्वतः वर ( म्हणजे डोक्यावर , अंगावर) टाकून घ्यावा . आशा पेहरावामुळे त्या ( शालीन स्त्रियां म्हणून )ओळखल्या  जातील ,  आणि ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) त्यांना काही त्रास होणार नाही.. आणि अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे . ( पारा नंबर २२ वा सुरह  नं . ३३ अल-अहजाब आ.नं. ५९ वी ).


 # तसा महिलांबाबत, निकाह ( विवाह) , तलाक ( घटस्फोट), विधवा, खुला , बुरखा- पडदा - हिजाब  व लग्नानंतर वारसा हक्क व सार्वजनिक ठिकाणी वापर असे बरेच विषय कायमस्वरूपी चर्चेत असतात परंतु इस्लामी मुस्लिम समाजातील काही विषय हे शोशल मेडीयावर  जास्तच चर्चेचे असतात. सर्व विषयांवर खूप काही लिखाण करण्याची गरज असताना परंतु  एका लेखात पुर्ण होवू शकत नाहीत... सविस्तर लिखाण करणे गरजेचे आहे..असो.

       कोणत्या महीलेने काय वस्र परिधान करायचं हे प्रत्येक बघिनींना स्वातंत्र्य दिले आहे व तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.. परंतु इस्लाम मधे प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या काळापासून महीलांनी आपल्या कपड्यांच्या वर एक वस्त्र परिधान करावयास सांगितले आहे त्याला बुरखा - हिजाब - चादर- पडदा -  म्हणतात, असे चादर ओढण्याची सांगितले आहे..त्यात डोक्यावर दुपट्टा ओढनी व संपूर्ण अंगाला चादर ओढणी किंवा शिवन घेतलेल्या बुरखा हिजाब पांघरूण घेणे ...हे दिव्य कुर आन मधील पारा नं. २२ मधील अल - अजहाब सुराह मधे स्पष्ट शब्दांत आलेलं आहे.

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना वावरताना घालण्याचं सांगितले आहे..१५०० वर्षापुर्वी चा काळ अज्ञानाचा काळ होता त्यावेळी स्त्रिया फक्त भोग विलासी साठी व च अश्लिल कृत्यं व नाच गाणं मनोरंजनाचं साधनं येवढ्या पुरत्याच  मर्यादित जीवन स्त्रियांचं होते.. स्त्रियांकडे वाईट नजरेतुनच बघितले जायचं, आजची परिस्थिती ही शोशल मेडीया व नेटवर्किंग च्या जमाण्यातील आहे .. परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे..शोशल मेडीयामुळे लहान लहान मुलांना ही अश्लिल चाळे करताना दिसत आहेत.. बाकीचे सांगणं कठीण आहे.

हे सर्व टाळण्यासाठी  त्या काळातच प्रेषितांच्या मार्फतच अल्लाहा( ईश्वर) नेच बघिंनी महीलांसाठी संरक्षण कवच म्हणून चादर -ओढनी- बुरखा- हिजाब चं संकल्पना सक्तीची सांगितली ..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या विविध पत्नी होत्या .. विशेष म्हणजे प्रेषितांनी  बेसहारा -विधवा -पिडीत असलेल्या महीलांबरोबरच लग्न केलीत , ( हा  स्वतंत्र लेखाचा विषय आहे) त्यांना हजरत जैनब , हजरत रूककयया ,हजरत उम्मे कुलसूम , हजरत फातिमा रजी या चार मुली ही होत्यां .तर त्यांनी आपल्या परीवारांसह सर्व सहकारी मित्रांना ही सक्तीचं केले .

            ##   विशेष गोष्ट म्हणजे पुरुषां साठी ही आचारसंहिता लागू  केली होती , अल्लाह दिव्य कुर'आन मधे सांगतात व सक्तीची मनाई केलेली आहे , ते बघू या, प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या द्वारे सांगतात की, " हे  पैगंबर (स्व.) श्रद्धावान ( बंधुंना) पुरुषांना सांगा ,की त्यांनी आपली दृष्टीं ( नजरां) ची जपनूक करावी   ( नजरा खाली ठेवाव्यात ), आणि आपल्या लज्जा स्थांनांचे रक्षण करावेत . असे करणे त्यांच्या साठी शुध्द चारीत्र्याचे  द्योतक ठरेल  , ते ( पुरुष)जे  काही करतात अल्लाहाला त्यांचीं  पुर्ण जाणीव(खबर)आहे." 

 खरं तर या आदेशाचा अर्थ सदैव खाली पाहणं न होता पुरुषांनी स्त्रियां कडे चुकीच्या दृष्टीकोनातून न पाहणे . स्त्रियांच्या गुप्त अंगावर दृष्टी न टाकणं..

म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. सांगतात की # चालता फिरताना आपली दृष्टी खाली ठेवून व आपल्या शरिराचे अंग प्रदर्शन पर स्त्रियांना ही होणार नाही याची काळजी पुरुषांना ही घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.  फक्त स्त्रियांसाठी सक्ती केली नव्हती तर तोच कायदा रुल हा पुरुषांना ही सक्ती चा केला होता.

                  #  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. " महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटात वावरावे , नटून थटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करून फिरू नयेत , घराबाहेर जाताना डोक्याव चादर घेउन , जो दागिने घातलेली आहे त्या दागिन्यांचां मधुर नाद( खुळ खुळ) आवाज होत असेल तर तो काढुन ठेवावेत .".

         # "घरातील पती, वडील ,भाउ, मुलगा, भाचा , पुतण्या ( यांच्या शी विवाह होत नाही)सोडून ;   ईतर सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगावी . साज शृंगार नटने सजने फक्त पतींसाठीच ..घरातील अपत्यजनांसमोर समोर जाताना वावरताना सुध्दा आपल्या वक्षस्थांवर ओढनी-  दुपट्टा पांघरूण अपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्र धारण करावेत " 

# पुरुषांना खास आदेश देण्यात आले आहेत की , " त्यांनी आपल्या आया बहीणींच्यां खोलींत जाताना परवानगी घ्यावी जेणेकरून अचानक तुमच्या घरात प्रवेशाने बेसावध बसलेल्या महीला,बहीणींवर खजिल होण्याची पाळी येणार नाहीत."

 # या सर्वाला परदा बुरखा पध्दत म्हणतात यावर अधिक खुलासा करताना प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनीं सांगितले की, " स्त्रियांनों ,( महिलांनों ) आपल्या सख्ख्या भावा व वडीलांसमोर जाताना सुध्दा चेहरा हाताचा पंजा ,व घोट्याच्या पर्यंत पाया व्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्राने अच्छादित करूनच जावे , पारदर्शक, शरिर प्रदर्शन घडेल  असे कपडे टाळावेत .., तसेच आपल्या घरातील आप्त जनां ( मेहरम) सोडून इतर कोणत्याही नात्याच्या पुरुषासमोर एकांतात बसू नये ' .#

# पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध अत्तर वगैरे लावून घराबाहेर जाण्याबाबत मनाई केली आहेत , मस्जिदीत महीलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. एकाच रांगेत स्त्रियांना व पुरुषांना नमाज अदा करण्यास नाकारण्यात आले होते  . त्याकाळात सुध्दा महिलांची संपुर्ण नमाज अदा झाल्यानंतर सर्व महीला मस्जिदी मधून निघून जाई पर्यंत स्वतः प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे पुरुष मित्र आपल्या बसल्या जागेवरून हालत नव्हते.

इस्लाम ने महीलांना संपूर्ण सवलत व सुट देण्यात आल्या आहेत... प्रत्येक गोष्ट ही महीलांसाठी सोयीची व कामाचीच करून ठेवली आहे... महीलांना प्रत्येक क्षेत्रात वाव देण्यासाठी प्रयत्न केले आहे परंतु त्यांच्या चौकटीत राहून.. याला बंदिस्त नाही म्हणू शकत.. (हा मोठा विषय आहे) मतमत्तांततरे कैक पटीने असू शकतात . अगोदर इस्लाम समजून घेत ,त्याचा अभ्यास केला पाहिजे.. असो.

सध्या शोशल मेडीयाच्या जमाण्यात यू ट्यूब व असंख्य बेब सिनेमा व असंख्य सिरीयलस चालू आहेत त्या प्रत्यक्षात त्यामध्ये अजनाते पणे किंवा जाणते पणे अपण नक्कीच काही सांगू शकत नाहीत परंतु एख तरी दृश्य हे अश्लिल असतेच आशा फार थोड्या सिरीयल असू शकतात की त्यामधे अश्लील दृश्य नाहीत.. परंतु बहुतेक सिनेमा मधे , सिरीयलस मधे जाहीराती मधे महिलांचां वापर करून कमी कपड्यात  अंग  प्रदर्शन  केले जात  आहे.. कमी व फिट्ट व पारदर्शक कपड्यात स्त्रियांना दाखवले जातात त्यामुळे लहान लहान मुलां वर परीणाम होउन लहान मुले ही अश्लील दृश्यांची बळी पडून नको ते कृत्य करुन राहीलेत . त्यांच्या बालमनावर  मानसिक परिणाम होउन चुकीचे कृत्य करू राहिले त त्यामुळे  नकळत पणे नराधमांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. यासाठी ओढणी पडदा- बुरखा -हिजाब ही काळाची गरज बनत चालली आहेत.

       .हा प्रश्न फक्त एका  समाजापुरताच मर्यादित  राहिला नाही, तर हा प्रश्न सर्वसामान्य समाजातील लोकांना भेडसावत आहेत..मुली  सर्वांना असतात , सर्वांच्या मुली  लाडक्याच असतात..आपल्या मुलीं या सुरक्षित राहावेत असे प्रत्येक पालकांची मनोमन इच्छा असते ,   यासाठी सुरक्षित पध्दत  हिजाब -बुरखा - पडदा  किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काही ही नावे द्यावीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे...शोशल मेडीयाच्या जमाण्यात मुलींच्या शिक्षण व संरक्षण होणं गरजेचं आहे..ती स्वतःच्या पायावर उभी राहणं गरजेचं आहे.

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचे कथन आहे की ,' अगर घरातील एक महीला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षीत होतं "  


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)

लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल मिल्लतनगर 

श्रीरामपूर 🎉 🎉 

🎉  9271640014🎉

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget