रमजान मुबारक मालिका २०२४ इस्लाम समजून घेताना रोजा नंबर २९ वा . मंगळवार दिनांक ०९-०४-२०२४

 रमजान मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर २९ वा .

मंगळवार दिनांक ०९-०४-२०२४ 



लेखन,:-  डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,मिल्लतनगर ,

     श्रीरामपूर 

९२७१६४००१४ 


इस्लाम:-!!  बुरखा - पडदा - हिजाब - समजून घेत -  काळा प्रमाणे वापरणं गरजेचं....!!


                 #  दिव्य कुर आन सांगितले की, " पैगंबर ! आपल्या पत्नींनां , व मुलींना आणि श्रध्दावंत स्त्रियांनाही सांगां , ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) की, त्यांनी बाह्य वस्राचा ( Outer Garments,चादर ) भाग आपल्या अंगाभोवती ( अगांवर ) स्वतः वर ( म्हणजे डोक्यावर , अंगावर) टाकून घ्यावा . आशा पेहरावामुळे त्या ( शालीन स्त्रियां म्हणून )ओळखल्या  जातील ,  आणि ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) त्यांना काही त्रास होणार नाही.. आणि अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे . ( पारा नंबर २२ वा सुरह  नं . ३३ अल-अहजाब आ.नं. ५९ वी ).


 # तसा महिलांबाबत, निकाह ( विवाह) , तलाक ( घटस्फोट), विधवा, खुला , बुरखा- पडदा - हिजाब  व लग्नानंतर वारसा हक्क व सार्वजनिक ठिकाणी वापर असे बरेच विषय कायमस्वरूपी चर्चेत असतात परंतु इस्लामी मुस्लिम समाजातील काही विषय हे शोशल मेडीयावर  जास्तच चर्चेचे असतात. सर्व विषयांवर खूप काही लिखाण करण्याची गरज असताना परंतु  एका लेखात पुर्ण होवू शकत नाहीत... सविस्तर लिखाण करणे गरजेचे आहे..असो.

       कोणत्या महीलेने काय वस्र परिधान करायचं हे प्रत्येक बघिनींना स्वातंत्र्य दिले आहे व तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.. परंतु इस्लाम मधे प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या काळापासून महीलांनी आपल्या कपड्यांच्या वर एक वस्त्र परिधान करावयास सांगितले आहे त्याला बुरखा - हिजाब - चादर- पडदा -  म्हणतात, असे चादर ओढण्याची सांगितले आहे..त्यात डोक्यावर दुपट्टा ओढनी व संपूर्ण अंगाला चादर ओढणी किंवा शिवन घेतलेल्या बुरखा हिजाब पांघरूण घेणे ...हे दिव्य कुर आन मधील पारा नं. २२ मधील अल - अजहाब सुराह मधे स्पष्ट शब्दांत आलेलं आहे.

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना वावरताना घालण्याचं सांगितले आहे..१५०० वर्षापुर्वी चा काळ अज्ञानाचा काळ होता त्यावेळी स्त्रिया फक्त भोग विलासी साठी व च अश्लिल कृत्यं व नाच गाणं मनोरंजनाचं साधनं येवढ्या पुरत्याच  मर्यादित जीवन स्त्रियांचं होते.. स्त्रियांकडे वाईट नजरेतुनच बघितले जायचं, आजची परिस्थिती ही शोशल मेडीया व नेटवर्किंग च्या जमाण्यातील आहे .. परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे..शोशल मेडीयामुळे लहान लहान मुलांना ही अश्लिल चाळे करताना दिसत आहेत.. बाकीचे सांगणं कठीण आहे.

हे सर्व टाळण्यासाठी  त्या काळातच प्रेषितांच्या मार्फतच अल्लाहा( ईश्वर) नेच बघिंनी महीलांसाठी संरक्षण कवच म्हणून चादर -ओढनी- बुरखा- हिजाब चं संकल्पना सक्तीची सांगितली ..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या विविध पत्नी होत्या .. विशेष म्हणजे प्रेषितांनी  बेसहारा -विधवा -पिडीत असलेल्या महीलांबरोबरच लग्न केलीत , ( हा  स्वतंत्र लेखाचा विषय आहे) त्यांना हजरत जैनब , हजरत रूककयया ,हजरत उम्मे कुलसूम , हजरत फातिमा रजी या चार मुली ही होत्यां .तर त्यांनी आपल्या परीवारांसह सर्व सहकारी मित्रांना ही सक्तीचं केले .

            ##   विशेष गोष्ट म्हणजे पुरुषां साठी ही आचारसंहिता लागू  केली होती , अल्लाह दिव्य कुर'आन मधे सांगतात व सक्तीची मनाई केलेली आहे , ते बघू या, प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या द्वारे सांगतात की, " हे  पैगंबर (स्व.) श्रद्धावान ( बंधुंना) पुरुषांना सांगा ,की त्यांनी आपली दृष्टीं ( नजरां) ची जपनूक करावी   ( नजरा खाली ठेवाव्यात ), आणि आपल्या लज्जा स्थांनांचे रक्षण करावेत . असे करणे त्यांच्या साठी शुध्द चारीत्र्याचे  द्योतक ठरेल  , ते ( पुरुष)जे  काही करतात अल्लाहाला त्यांचीं  पुर्ण जाणीव(खबर)आहे." 

 खरं तर या आदेशाचा अर्थ सदैव खाली पाहणं न होता पुरुषांनी स्त्रियां कडे चुकीच्या दृष्टीकोनातून न पाहणे . स्त्रियांच्या गुप्त अंगावर दृष्टी न टाकणं..

म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. सांगतात की # चालता फिरताना आपली दृष्टी खाली ठेवून व आपल्या शरिराचे अंग प्रदर्शन पर स्त्रियांना ही होणार नाही याची काळजी पुरुषांना ही घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.  फक्त स्त्रियांसाठी सक्ती केली नव्हती तर तोच कायदा रुल हा पुरुषांना ही सक्ती चा केला होता.

                  #  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. " महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटात वावरावे , नटून थटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करून फिरू नयेत , घराबाहेर जाताना डोक्याव चादर घेउन , जो दागिने घातलेली आहे त्या दागिन्यांचां मधुर नाद( खुळ खुळ) आवाज होत असेल तर तो काढुन ठेवावेत .".

         # "घरातील पती, वडील ,भाउ, मुलगा, भाचा , पुतण्या ( यांच्या शी विवाह होत नाही)सोडून ;   ईतर सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगावी . साज शृंगार नटने सजने फक्त पतींसाठीच ..घरातील अपत्यजनांसमोर समोर जाताना वावरताना सुध्दा आपल्या वक्षस्थांवर ओढनी-  दुपट्टा पांघरूण अपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्र धारण करावेत " 

# पुरुषांना खास आदेश देण्यात आले आहेत की , " त्यांनी आपल्या आया बहीणींच्यां खोलींत जाताना परवानगी घ्यावी जेणेकरून अचानक तुमच्या घरात प्रवेशाने बेसावध बसलेल्या महीला,बहीणींवर खजिल होण्याची पाळी येणार नाहीत."

 # या सर्वाला परदा बुरखा पध्दत म्हणतात यावर अधिक खुलासा करताना प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनीं सांगितले की, " स्त्रियांनों ,( महिलांनों ) आपल्या सख्ख्या भावा व वडीलांसमोर जाताना सुध्दा चेहरा हाताचा पंजा ,व घोट्याच्या पर्यंत पाया व्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्राने अच्छादित करूनच जावे , पारदर्शक, शरिर प्रदर्शन घडेल  असे कपडे टाळावेत .., तसेच आपल्या घरातील आप्त जनां ( मेहरम) सोडून इतर कोणत्याही नात्याच्या पुरुषासमोर एकांतात बसू नये ' .#

# पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध अत्तर वगैरे लावून घराबाहेर जाण्याबाबत मनाई केली आहेत , मस्जिदीत महीलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. एकाच रांगेत स्त्रियांना व पुरुषांना नमाज अदा करण्यास नाकारण्यात आले होते  . त्याकाळात सुध्दा महिलांची संपुर्ण नमाज अदा झाल्यानंतर सर्व महीला मस्जिदी मधून निघून जाई पर्यंत स्वतः प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे पुरुष मित्र आपल्या बसल्या जागेवरून हालत नव्हते.

इस्लाम ने महीलांना संपूर्ण सवलत व सुट देण्यात आल्या आहेत... प्रत्येक गोष्ट ही महीलांसाठी सोयीची व कामाचीच करून ठेवली आहे... महीलांना प्रत्येक क्षेत्रात वाव देण्यासाठी प्रयत्न केले आहे परंतु त्यांच्या चौकटीत राहून.. याला बंदिस्त नाही म्हणू शकत.. (हा मोठा विषय आहे) मतमत्तांततरे कैक पटीने असू शकतात . अगोदर इस्लाम समजून घेत ,त्याचा अभ्यास केला पाहिजे.. असो.

सध्या शोशल मेडीयाच्या जमाण्यात यू ट्यूब व असंख्य बेब सिनेमा व असंख्य सिरीयलस चालू आहेत त्या प्रत्यक्षात त्यामध्ये अजनाते पणे किंवा जाणते पणे अपण नक्कीच काही सांगू शकत नाहीत परंतु एख तरी दृश्य हे अश्लिल असतेच आशा फार थोड्या सिरीयल असू शकतात की त्यामधे अश्लील दृश्य नाहीत.. परंतु बहुतेक सिनेमा मधे , सिरीयलस मधे जाहीराती मधे महिलांचां वापर करून कमी कपड्यात  अंग  प्रदर्शन  केले जात  आहे.. कमी व फिट्ट व पारदर्शक कपड्यात स्त्रियांना दाखवले जातात त्यामुळे लहान लहान मुलां वर परीणाम होउन लहान मुले ही अश्लील दृश्यांची बळी पडून नको ते कृत्य करुन राहीलेत . त्यांच्या बालमनावर  मानसिक परिणाम होउन चुकीचे कृत्य करू राहिले त त्यामुळे  नकळत पणे नराधमांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. यासाठी ओढणी पडदा- बुरखा -हिजाब ही काळाची गरज बनत चालली आहेत.

       .हा प्रश्न फक्त एका  समाजापुरताच मर्यादित  राहिला नाही, तर हा प्रश्न सर्वसामान्य समाजातील लोकांना भेडसावत आहेत..मुली  सर्वांना असतात , सर्वांच्या मुली  लाडक्याच असतात..आपल्या मुलीं या सुरक्षित राहावेत असे प्रत्येक पालकांची मनोमन इच्छा असते ,   यासाठी सुरक्षित पध्दत  हिजाब -बुरखा - पडदा  किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काही ही नावे द्यावीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे...शोशल मेडीयाच्या जमाण्यात मुलींच्या शिक्षण व संरक्षण होणं गरजेचं आहे..ती स्वतःच्या पायावर उभी राहणं गरजेचं आहे.

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचे कथन आहे की ,' अगर घरातील एक महीला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षीत होतं "  


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)

लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल मिल्लतनगर 

श्रीरामपूर 🎉 🎉 

🎉  9271640014🎉

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget