बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर ईदच्या तयारीला वेग आला. रात्री उशिरापर्यंत चौका चौकात व शहरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी मुस्लिम बंधू-भगिनींची झुंबड उडाली होती. सर्वच मशिदीमधून रात्री लैलतुल जायजा ची विशेष प्रार्थना करण्यात आली.
काल सकाळी नऊ वाजता जामा मशीद मध्ये ईद ची नमाज अदा करण्यात आली. प्रमुख धर्मगुरू मौलाना मोहम्मद इमदाद अली यांचे धार्मिक प्रवचन झाले. मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी ईदच्या नमाज ची इमामत केली.
ईदगामध्ये दहा वाजता ईद ची नमाज संपन्न झाली.मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांचे धार्मिक प्रवचन झाले. शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली यांनी नमाजची इमामत केली.
याशिवाय शहरातील मक्का मस्जिद, मदिना मस्जिद,गौसिया मस्जीद, मदरसा रहमते आलम, मुसा मस्जिद, गरीब नवाज मस्जिद, जैनब मस्जिद सह अनेक मशीदींमधून ईद ची नमाज अदा करण्यात आली .
जामा मस्जिद व ईदगामध्ये मुस्लिम बांधवांना ईद मुबारक च्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी नगराध्यक्ष संजय फंड,माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, शिवसेना नेते संजय छल्लारे,अशोक थोरे मामा,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, हेमंत ओगले, अशोक उपाध्ये, जयंत चौधरी,माऊली मुरकुटे, अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, महेंद्र त्रिभुवन, अशोक बागुल, डॉक्टर रवींद्र कुटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लकी सेठी, दिलीप नागरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, डॉक्टर दिलीप शिरसाट,नितीन गवारे, रवी भांबरे, कैलास बोर्डे, प्रसन्ना शेटे, अविनाश पोहेकर, संजय फरगडे, संदीप चोरगे, तेजस बोरावके,विजय खाजेकर, सुभाष त्रिभुवन, मिलिंदकुमार साळवे,अशोक भोसले, डॉक्टर संजय साळवे, सत्यनाथ शेळके,नितीन गवारे,अरुण मंडलिक, गोरख कंदलकर, दीपक कदम, प्रवीण जमदाडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अर्चना पानसरे,सोनल मुथा आदिसह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
ईदगामध्ये आमदार लहुजी कानडे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली तर एडवोकेट जयंत चौधरी यांनी ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक अविनाश आदिक व अनुराधा आदिक यांनी मुस्लिम समाजासाठी केलेले काम मुस्लिम समाजाला ज्ञात आहे असे सांगितले.
जामा मशीद मध्ये नगरसेवक मुख्तार शहा, डॉक्टर राज शेख, रज्जाक पठाण, जावेद शेख, मोहसीन बागवान, तनवीर रजा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर इदगाह मध्ये कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख,जिकर मेमन, गफार पोपटिया, याकुब बागवान, अश्फाक शेख व इतर मान्यवरांनी स्वागत केले.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने देशाचे भले करणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी याप्रसंगी केले.ईदच्या नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.तहसीलदार वाघ तसेच पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांच्यासह पोलिस विभागाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.शांततेत ईद संपन्न झाली.
राज्यातील विविध वर्तमानपत्रातून रमजान लेखमालेचे लेखन करून समाज जागृती केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मस्जिद मध्ये आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post a Comment