आज २० विसावा रोजा चालला आहे अर्थात पहिला अशहरा ( विभाग) " रहमत,( 'दये)चे संपलेंत , आज २० रोजा पुर्ण " मगफीरत '( माफी दैवून कृपादृष्टी )चे (१०- ते २० ) संपूं राहिलेत , आज संध्याकाळी तिसऱ्या विभाग ( अशहारा ) हा " नरकाग्नितल्या ( जहान्नुम) च्या आगीच्या होणाऱ्या इंधनापसून संरक्षण " वाचण्यासाठी पुढील दहा दिवस आहे , वेळ दिवस खुप लवकर संपत चाललेली ..आज संध्याकाळीच "लैलतुल -कद्र " च्या पवित्र रात्रीं ( ज्यांचे पुण्य हे एका रात्रीचं एक हाजार महीन्यांच्यां रात्रीं पेक्षाही अधिक असतं) बरोबरच" एहतेकाफ "संध्याकाळ पासूनच सुरू होणार , आज ही अल्लाहच्या कृपेपासून विमुक्त आहोत . याचं महत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे . दुआ याचना करण्याच्या पर्वाचा प्रवास सुरू झाला आहे.
एक ते वीस दिवसांत तुम्हाला तुमच्या व्यस्तते ,हालगर्जीपणामुळे , त्याचं महत्त्व न समजल्यामुळे अल्लाहा ( ईश्वरा) च्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या संधीचा फायदा उचलला नाहीत ,तर तुम्ही दरीद्रीच समजा. " मगफिरत "या पर्वात वर्षांनु वर्षे क्षणा क्षणाला ,कळत नकळत केलेल्या पापांची , चुकांची दुरुस्ती , चुकांची माफी मागणं व अल्लाह ला पुन्हा पुन्हा या चुकीचं होणार नाहीत यासाठी कृपादृष्टी व्हावीत . याला म्हणतात "मगफिरत ' होणं. संपूर्ण आयुष्यभर श्रद्धांवान बांधव याच आशेवर जगत असतात की परमेश्वर( अल्लाह) ने आमची मगफीरत करावी..हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे.
आपण कळत नकळत चुका होतच असतात . एखाद्या शुल्लक चुका ; त्याला साधी लहान चुक समजतो , परंतु ती कोणां दुसऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानिची ठरु शकते हे कधीच आपल्या लक्षात येत नसते , आशा चुक ही आपल्यासाठी नरकातील इंधनासाठी पुरेशी ठरु शकते.
पवित्र कुरआन सांगितले की, " त्या ( कयामत) दिवशी तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल , त्या दिवशी स्वतः चे आई-बाबा मुलांना ओळख देणार नाही , बहीण- भावाला , पती -पत्नी ला ,मुलं- आई-बाबांना ओळख देणार नाहीत . ज्याला त्याला स्वतःचं पडेल. "
आयुष्यभर केलेल्या चांगल्या -वाईट कर्मांचां हिशोब द्यावाच लागणार आहे . मग त्यासाठी आजच तय्यारीला लागा .
तिसऱ्या टप्प्या ( अशराह )ला २१ ते ३० ला सुरूवाती बरोबरच रमजानुल मुबारक मधील पवित्र लैलतुल -कद्र च्यां रात्रीं रोजा२१ , रोजा २३ ,रोजा २५ , रोजा २७- रोजा २९- रोजा ३० वी, या विषम संख्यात्मक " लैलतुल-कद्र " च्या रात्रीं असतात , या एक रात्र ही एक हजार महीण्यांच्या रात्रींच्यां पेक्षा ही जास्त पुण्यंचीं फक्त एक लैलतुल कद्रची रात्रींचं पुण्यं - सबाब भेटतं.
दिव्य कुरआन मधे सांगितले , " आम्ही या( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरले आहे .(१), आणि , तुम्हाला काय माहित ,की, " कद्र " ची रात्र काय आहेत ? म्हणून, (२), कद्र ची रात्र ही हजार महीण्यांपेक्षा ही अधिक उत्तम आहेत (३),ईशदूत ( फरिशते) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यारात्री आपल्या पालनकर्तांच्या आज्ञेनुसार प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४), ती रात्र म्हणजे पुर्णतः " शांती" आहेत व उष: काळा पर्यंत...(५) ..( दिव्य कुराण ,सुरहा नं. ९७ .अल- कद्र आ.नं. १ ते ५).
त्याच बरोबरच आज २० व्या रोजा च्यां दिवसांपासून ते थेट ३० व्या रोजा पर्यंत १० दिवस सलग अल्लाहच्या याचने नतमस्तक होउन याचना करण्यासाठी बांधंव २४ तास १० दिवस बसतात त्यालाच " एहतेकाफ " ला बसणं.
जगात प्रत्येक मस्जिद मधे या शेवटच्या दहा दिवसांत एक तरी रोजेदार बांधंव बसणं गरजेचे आहे.दहा दिवस अल्लाह च्या भक्तीत बाहेरील जगाशी संपर्क तोडून - जग विसरून, स्वतःच्या प्रंपाचाला बाजूला ठेवून , फक्त अल्लाहाला संपूर्णतः समर्पण करून- देह भान विसरून अल्लाहचच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणं ..बस..
या रात्रीच्या आलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उचलून अल्लाहा जवळ सर्वस्वी अर्पण- लिन - तल्लीन होऊन छाती बदडून , रडून -डोळ्यात पाणी आणून , आयुष्य भर केलेल्या चुकांची जाणीव करून उदा. जाणते व अजाणतेपणी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता व खात्री देउन गरीबांचे ,मजुरांचे , भिकारी, बहीण,भाउ , आई-बाबा , आजी-आजोबा, मित्र मंडळ , गिऱ्हाईक या सर्वांबरोबर कधीतरी उच्च निच झाले असतील , एखाद्याला वेडेवाकडे अपशब्द वापरले गेले असतील , अपमानास्पद भाषेचा वापर झाला असेल, संशयास्पद वागणूक दिली गेली असेल, कधी घमेंडी आली असेल , " मी " ही जागा झाला असेल, कधी" अहंकार" आला असेल ,
"अहंकार""रावर :- प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम . म्हणतात की, " ज्या व्यक्तींच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल ,तो स्वर्गात जाणार नाहीत, "
त्यावर त्यांच्या एका मित्र( सहाबी) ने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचां वापर करणं, हे देखील अहंकारासारखंच आहे का?
त्यावर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी उत्तर दिले," अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते, अहंकार हा आहे की तो सत्याला नाकारतो आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ समजणे " ( हादिस ईब्न मस- उद , मुस्लिम.). कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नयेत. आपल्यातल्या " मी "पणा , अहंकार माणसाच्या आयुष्यात खूप गडबड करत असतो तर त्या मी व अहंकाराला बाजूला काढून टाकण्यासाठी अल्लाहच्या दरबारात येउन बाजूला काढण्याचं प्रयत्न करा .
" , आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ , जितकं वेळ मिळाला तेवढं का होईना वेळ काढून , एकांतात ,एका शांत जागी , निवांत बसून, अल्लाहा जवळ पुर्ण पणे लीन -शरण - समर्पित होउन - अगदी तल्लीन होऊन , निर्विकार पणे , अंतर्मनात दडलेल्या प्रत्येक प्रत्यक्ष गुन्हेची , दुष्कृत्ये ची , काही घटना फक्त आपल्यालाच माहीत असतात , आशा केलेल्या गुन्हे ची माफी मागणं , आगदी मनापासून- मनमोकळेपणाने अल्लाहा (परमेश्वरा) बरोबर संवाद साधणं ..जसं एका खास मित्राला मनमोकळेपणाने गप्पा मारतो तशा पध्दतीने अल्लाहा (परमेश्वरा) समोर मनापासून मनमोकळे करणं .याला रिते होणं , फक्त रिते होणे , आत्मक्लेश करणे , आत्मचिंतन करणं , पुन्हा पुन्हा अल्लाहा( परमेश्वर )ला सांगणं पुढे कधीच कोणत्याही परिस्थितीत अशा चुकीचं होणार नाही याची ग्वाही - खात्री देणं . म्हणजेचं मोकळे ,रिते होउन अल्लाहा ( ईश्वराला) ला राजी करणं .
आशा गोष्टींमुळे जेव्हा आपण केलेल्या पापांची - गुन्ह्याची कबुली कुठे तरी देत असतो ; निश्चितपणे माणुष्यात सकारात्मक बदल घडत असतात . निगेटिव्ह विचार -आचार हळूहळू जावून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येतात . प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक च होत जाते . हे फक्त स्वतः ठरवलं तर अशक्य काहीच नसतं . " मी "फार धोकादायक ठरतो ,तो मी च आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो . तो " मी' मनापासून गायब झाला तर अहंकार ही नष्ट होऊन मनाची अंतर्मुख होऊन आत्मशुद्धी होते व आत्मविश्वास वाढला जातो .मणुष्य स्वतः च स्वतः ला कित्येक वर्षे ओळखत नसलेला या दहा दिवसात ओळखू लागतो याच साठी अंतरात्माला आत्मक्लेश आत्मसमर्पण आत्मसमर्पित करणं गरजेचे असते.
नंतर निर्विकार -शांत - नितळ अंतरमन होउन आत्मिक शुध्दी होउन व्यक्तीचा उत्सव वाढतो , चेहऱ्यावर तेज , आनंद ,झळकतो . आपल्या जीवनात एक अल्हाददायक , आनंदी पहाटचं ..
अल्लाह राजी हुआ समझो...
( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)
लेखक डॉ सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा हॉस्पिटल ,
श्रीरामपूर ९२७१६४००१४.