हार ही यशाची पहिली पायरी - राजेंद्र लांडे पाटील.
आज श्रीरामपूर सुपर सिक्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल संघाने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा रंगतदार सामन्यांमध्ये ५ धावांनी पराभव करून सहाव्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.अंतिम सामन्याची नाणेफेक श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यू इंग्लिश स्कूल संघाने निर्धारित ६ षटकांमध्ये ५ बाद ४९ धावा केल्या. यामध्ये यश पवार १५ धावा तर राजवीर पवार याने १८ धावांचे योगदान दिले. बेलापूर संघाकडून शार्दुल पुजारीने २ गडी बाद केले.६ षटकात ५० धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेल्या बेलापूर संघाची सुरुवात धडाकेबाज झाली व पहिल्या २ षटकांमध्ये १ गडी बाद २० धावा फटकावल्या. पवारने तिसऱ्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत २ गडी बाद केले.शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडू मध्ये ९ धावांची आवश्यकता असताना प्रेम शिंदेने अप्रतिम गोलंदाजी करत बेलापूरच्या संघाला तीनच धावा दिल्या व श्रीरामपूर संघाने अंतीम सामना ५ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यानंतर लगेचच स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रॅज्युएट चहा व लस्सीचे संचालक श्री राजेंद्र लांडे पाटील,अभिजीत कुलकर्णी,निरज त्रिपाठी, ऋषिकेश लांडे,दिगंबर पिनाटे, सतीश आजगे,दौलतराव पवार, अमोल शिरोळे,अतुल जाधव, प्रशांत पवार, स्पर्धा आयोजक श्री गौरव डेंगळे व नितीन गायधने आदीच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विजेत्या संघाला रुपये ३५००/- व चषक तर उपविजेत्या संघाला रुपये १५००/- व चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्रेम शिंदे तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून यश पवार तर मालिकावीर म्हणून सादुल पुजारी यांची निवड करण्यात आली.