Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : ३९ वी ऑल इंडिया रोलर रिले चॅम्पियनशिप दिनांक १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान पणजी, गोवा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रोलर रिले महाराष्ट्रचे सचिव श्री भिकान अंबे यांनी दिली.ऑल इंडिया रोलर रिले चॅम्पियनशिप साठी अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी शुक्रवार दि २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.या निवड चाचणीसाठी वय वर्ष १०,१२,१४,१६,१८,२० व खुल्या गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. या स्पीड स्केटिंग स्पर्धेसाठी १०० मीटर,२०० मीटर,३०० मीटर व रिले स्पर्धेमध्ये खेळाडू सहभागी होऊ शकतात. निवड झालेल्या खेळाडूना स्केटिंग स्किन सूट दिला जाईल.निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी श्री नितीन गायधने,नितीन बलराज,दिपक रणपिसे,श्री प्रसाद लबडे आदींशी संपर्क साधावा.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): टाकळीभान,श्रीरामपूर येथील यश पवन काथेड मडगाव गोवा येथे २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित राष्ट्रीय टी-ट्वेंटी गोवा गोल्ड कप साठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यश श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण  घेत आहे.इयत्ता ६ वी पासून यशने लेदर क्रिकेट खेळायला सुरुवात केली.ऑफ स्प्रिंग गोलंदाजी व मधल्या फळीतील संयमी फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे.निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल यशचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला प्रशिक्षक नितीन बलराज, नितीन गायधने आदींचे मार्गदर्शन लाभले.

बेलापूर ( वार्ताहर ) श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असुन वाकण वस्ती वरील ग्रामस्थांनी परिसरात विकासाकामे न झाल्याच्या निषेधार्थ निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असुन या बाबतचे निवेदन तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे    ग्रा.प च्या व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येणाऱ्या सर्वच निवडणूकीवर उक्कलगाव (ता.श्रीरामपूर )येथील वाकण वस्ती वरील समस्त गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे .कोणतेही विकास काम न झाल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी श्रीरामपूरचे प्रांतधिकारी किरण सांवत यांना ग्रामस्थांनी दिले आहे.त्या निवेदनात ग्रामस्थांनी  म्हटले आहे की,इजिमा २१ ते वाकण वस्ती रोडचे रस्त्याचे साधारणता २० वर्षापूर्वी खडीकरणाचे काम झाले.त्यानंतर अनेक वर्ष उलटले तरी अद्यापही ग्रा.प व जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या माध्यमातून रस्त्याचा विकास झाला नाही.त्यामुळे रस्त्याचे काम न झाल्यामुळे  ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.या रस्त्यावरून शाळकरी मुलांबरोबर शेतकऱ्यांना ये जा करावी लागते पावसाळ्यात तर चालाणेही अवघड होवुन जाते या रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडलेले आहेत परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे  वैद्यकीय सेवाही वेळेवर मिळत नाही. ग्रामपंचायत,आमदार, खासदारांना निवेदन देवून देखील कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.विकास कामांपासून वंचित राहिल्याने वाकणवस्ती रोडवरील ग्रामस्थांनी ग्रा.प निवडणूकीवर बहिष्कार टाकला.यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांच्या सह्या केल्या आहे. 

  कोणतीही विकासाची गंगा वाकणवस्ती येथे आणली.फक्त एकच उदाहरण द्या,यापुढे येणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार असल्याचे या निर्णयावर ठाम राहणार आहे.असे ग्रामस्थांनी  सांगितले.   

 वाकण वस्ती ते दिपक किसन थोरात यांच्या वस्तीपर्यंत तसेच गोरख बाबुराव थोरात यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची पाईप लाईन झाल्या आहे.मात्र एकदाही पाणी मिळेल नाही.आम्हीही गांवकरी आहे बरं का? असा प्रश्न ग्रामस्थांनी या वेळी उपस्थित केला.या निवेदनावर संजय थोरात गोरख थोरात दिपक थोरात आदिंच्या सह्या आहेत

.

.......

प्रतिनिधी: ठाणे ग्रामीण मधील पडघा पो.स्टे च्या हद्दीमध्ये दि.13/10/2023 रोजी रात्री 09:30 सुमारास मैदे गावाजवळ ता.भिवंडी येथे आरोपी नामे सुरज देवराम ढोकरे याने फिर्यादी अजिम अस्लम सय्यद  आणि त्याचा आतेभाऊ फिरोज रफिक शेख यांच्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने अजिम यांच्यावर 6 आणि फिरोज यांच्यावर 2 गोळ्या सरकारी ग्लॉक 19 Made in USA या पिस्तूलातुन झाडल्या. त्याबाबत पडघा पो.स्टे गुर.नं 533/23 भारतीय दंड संहिता 307, भारतीय हत्यार कायदा 3/25  गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दि. 15/10 /2023 रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी हा अहमदनगरकडून नाशिकच्या दिशेने जात असल्याबद्दल माहिती पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांना मिळाली. त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेण्याकरिता  तीन पथके तयार करून कोल्हार येथे नाकाबंदी लावण्यात आली आणि आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या ग्लॉक 19 पिस्तलसह कोल्हार बस स्टँडवरून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले .सदर आरोपी हा मुंबई पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालय QRT मध्ये आर्मरर या पदावर कार्यरत आहे. आरोपीस पुढील तपास कामी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

*सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , API युवराज आठरे, PSI योगेश शिंदे,ASI बाबासाहेब लबडे,HC दिनेश चव्हाण,HC सुरेश पवार, HC एकनाथ सांगळे,HC भाऊसाहेब आव्हाड,PN रवींद्र मेढे,PN निलेश धाधवड ,PN अशोक शिंदे,PN श्याम जाधव,PC दिनेश कांबळे,PC अमोल फटांगरे चालक HC वर्पे व चालक PC ज्ञानेश्वर गांगुर्डे, होम हारदे, होम अभिजित साळवे, होम विशाल राऊत, होम गणेश साळुंके यांनी केली आहे.*

संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर येथे आज मोठ्या थाटामाटात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती संघटना ही सदैव सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मूलभूत हक्काचे प्रश्न घेऊन शासन दरबारी प्रश्न मांडणारी संस्था असून या संस्थेमध्ये नव्याने रुजू झालेले सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा श्री राजेश कोटकर (उत्तर महाराष्ट्र सह-संपर्क प्रमुख) यांच्या हस्ते नवीन ओळखपत्र व सभासत्व तसेच ट्रॅकसुट यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले हा कार्यक्रम सौभाग्य मंगल कार्यालय जवळ कार्यक्रमाच्या उपस्थिती वेळेस युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे संगमनेर तालुक्यातील श्री राजेश कोटकर उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख तसेच कैलास नवले उपाध्यक्ष नवनाथ तळपे तुषार नवले हंबीरराव लांडगे संगमनेर कार्याध्यक्ष श्री रोहिदास गुंजाळ (महाराज) तसेच अहमदनगर जिल्हा महिला कार्याध्यक्ष वैशाली फटांगरे संगमनेर महिला अध्यक्ष स्वीटी विदुर ,ज्योती कोरडे व अन्य  सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष ज्योती टाके बाबासाहेब वाघ महिला आघाडीच्या आरती महाडिक राहता तालुक्यातील पदाधिकारी राहता तालुका उपाध्यक्ष सचिन चोळके सदस्य हे यावेळेस उपस्थित होते यावेळी जनतेच्या मूलभूत हक्क व प्रश्नांसाठी युवा क्रांतीस फाउंडेशन नेहमी पाठीशी राहील अशा आश्वासन  उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश कोटकर यांनी दिले आहे

कोपरगाव(गौरव डेंगळे):शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच रोजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात काही उसंतीचे क्षण मिळावेत  व आपल्या अंगी असलेले कलागुण सादर करता यावे या उदात्त हेतूने सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव मध्ये पूज्य पद्मभूषण श्री करमसी भाई सोमैया भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.शारदीय नवरात्रोत्सवाच्या आयोजनाचे हे दुसरे पुष्प असून ही स्पर्धा दिनांक १६ व १७ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.सदर स्पर्धा ही शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आलेली आहे. शालेय गटामध्ये शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे संघ सहभागी होऊ शकतात.सदर स्पर्धा दिनांक १६ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये आहे.बालकलाकारांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी 

*प्रथम बक्षीस-७०००/-*

*द्वितीय बक्षीस-५०००/-*

*तृतीय बक्षीस-३०००/-*

*प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस-१०००/-*

*द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस-१०००/-* अशाप्रकारे बक्षीसांचे स्वरूप ठेवण्यात आलेले आहे.

खुला गटातील स्पर्धा दिनांक १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी घेण्यात येणार असून या गटात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये आहे. या गटासाठी आयोजकांच्या वतीने भरघोस रकमेच्या बक्षिसांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर गटासाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील.

*प्रथम बक्षीस-२५,०००/-*

*द्वितीय बक्षीस-१५,०००/-*

*तृतीय बक्षीस-१०,०००/-*

*प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस-५०००/-*

*द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस-५०००/-*

आपणा सर्व रसिक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न..तरी आपण सर्वांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देऊन आपली नाव नोंदणी दिनांक *१२ ऑक्टोंबर २०२३* पर्यंत पूर्ण करावी.

*स्पर्धेसाठी नियम व अटी*

१)सहभागी संघामध्ये कमीत कमी १६ स्पर्धक असावे.

२) प्रत्येक संघाला आपले नृत्य सादर करण्यासाठी 'आठ ते दहा' मिनिटांचा अवधी देण्यात येईल.

३)सदर स्पर्धा ही दांडिया स्पर्धा असल्याकारणाने गुणांकनासाठी दांडिया नृत्यालाच प्राधान्य देण्यात येईल.

४)आयोजकांनी दिलेल्या नियोजित वेळेतच आपला प्रवेश निश्चित करावा.

५) सर्व स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी सायंकाळी ठीक ५.३० वाजता उपस्थित राहावे, स्पर्धा वेळेवर चालू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

६)सदर स्पर्धा श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.प्रवेश निश्चितीसाठी संपर्क सौ.शुभांगी अमृतकर(9423038831) यांच्याशी संपर्क साधावा.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय,श्रीरामपूर क्रीडा समिती व कै रघुनाथ कृष्णाजी पाटील अवताडे महाविद्यालय माळेवाडी

येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या.१४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.

या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील जे टी येस, बेलापूर  तर अंतिम सामन्यात श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल. विजयी संघाचे खेळाडू श्रुती कारले (कर्णधार), शर्वरी बोर्डे, श्रावणी कहार, आर्या कळसाईत, गीतांजली बडाख, गायत्री गायके, पूर्वा बांद्रे, नव्यानी पंडित, अतिथी देहाडे, कार्तिकी गायके, साक्षी बावस्कर, शिफा शेख, अनुष्का देहाडे, समृद्धी कदम.विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर ज्योती,शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला श्रीरामपूरचे क्रीडारत्न नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget