Latest Post

कोपरगाव (प्रतिनिधी):हिंदी दिनाचे औचित्य साधून सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव येथे दिनांक १४ सप्टेंबर रोजी पद्मभूषण श्री करमसी भाई  सोमैया राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांमध्ये निपुण वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे,त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा व त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे व प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य अवगत व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर स्पर्धेत राज्यातील २६ शाळेतील ५२ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेमध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे कु.श्रुती पिंपरकर आणि कु. तनिष्क निकम या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाने उपस्थित सर्वांची मने जिंकून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून

रोख रक्कम ७०००/ रुपये,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मानकरी ठरले.सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले  डॉ.श्री.नितीन जैन (प्राचार्य राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज कोकमठाण) यांची उपस्थिती लाभली.तसेच

बक्षीस वितरण समारंभासाठी 

डॉ.सौ.सुनिता पारे (प्राचार्या सोमैया विद्यामंदिर,साकरवाडी) यांनी उपस्थिती दर्शवून सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र सांगळे स्पर्धेसाठी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मा.प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते.श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे कुमारी श्रुती पिंपरकर व कुमार तनिष्क निकम तसेच सर्व यशस्वी स्पर्धकांचे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री.सुहास गोडगे व इतर सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

      

*स्पर्धेचा अंतिम निकाल*

*प्रथम पारितोषिक*

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ७,०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

*द्वितीय पारितोषिक*

श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन चे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडियम स्कूल नगर.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ५,०००/ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

*तृतीय पारितोषिक*

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल,अकोले.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ३,०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

*उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

श्रीराम अकॅडमी,श्रीरामपूर

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम १०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

*उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,लोणी खुर्द.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम १०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपुर:-दिनांक 09/09/2023 रोजी दुपारी 12/00 वा. चे सुमारास फिर्यादी राहुल जुम्मन खंडारे, वय 30 वर्षे, रा. गोंधवणी रोड, वार्ड नं. 01, श्रीरामपूर, हे त्यांच्यी मोपेड मोटारसायकल बर्ग मॅन स्ट्रीट, बी. टी. सुझुकी, तिचा नंबर एम.एच.17,सी.यु.2861 असा असलेली, यावर त्यांचे आजारी आईला औषधउपचाराकरीता जोंधळे हॉस्पीटल, वार्ड नं. 01, मदर टेरेसा चौक शेजारी, श्रीरामपूर, येथे घेवुन गेले होते. हॉस्पीटल बाहेर मोटारसायकल लावुन हॉस्पीटल मध्ये औषधउपचाकरीता गेले व थोडयावेळाने बाहेर आले तेव्हा त्यांची मोटारसायकल त्यांना दिसली नाही, त्यांनी आजुबाजुला चौकशी केली असता व शोध घेतला असता ती मिळुन आली नाही तेव्हा त्यांची खात्री झाली की त्यांची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इराद्याने स्वतःताच्या आर्थिक फायदयाकरीता चोरुन नेली आहे वगैरेच्या तक्रारी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 973/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा दाखल होताच मा. पोनि हर्षवर्धन गवळी सो. यांनी तपास पथकास सदर गाडीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे 1) अरबाज आयुब पठाण, वय 20 वर्षे, रा. हुसेननगर, वार्ड नं. 01, श्रीरामपूर 2) आदम युसुफ शहा, वय 27 वर्षे, रा. काझीबाबा रोड, बाबरपुरा चौक, वार्ड न. 02, श्रीरामपूर यांनी दोघांनी मिळुन केल्याचे निष्पण झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदरचे आरोपी हे चोरी केलेले मोटारसायकलवर बसुन कर्मवीर चौक, वार्ड नं. 01, श्रीरामपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक हे तात्काळ कर्मवीर चौकात सापळा लावुन थांबले असता सदरचे आरोपी कर्मवीर चौकात येताचा त्यांना थांबण्यास सांगितले असता ते तसेच वेगात बोरावके कॉलेज रोडने पळुन जावु लागले असता तपास पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यांना नविन प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे पकडले व त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानी वरील प्रमाणे सांगुन सदर गाडीबाबत चौकशी केली असता सदरची गाडी हि जोंधळे हॉस्पीटल, वार्ड नं. 01, मदर टेरेसा चौक शेजारी, श्रीरामपूर, येथुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन सदरची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली व सदरच्या गुन्हात तात्काळ अटक करण्यात आली. अटक कालावधीत त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानी खालील नमुद प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन खालील नमुद वर्णनाच्या चोरी केलेल्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या त्याचे वर्णन खालील प्रमाणे.

1)85,000/- रु. किं. ची. बर्ग मॅन स्ट्रीट, बी.टी.सुझुकी कंपनीची, तिचा नंबर एम.एच.17, सी.यु. 2861 असा, तिचा चेसी नंबर MB8EA11DKN8363835 असा असलेली, श्रीरामपूर शहर. पो.स्टे. गुरनं. 973/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा. किं.अं.

2)80,000/- रु.कि.ची बजाज डिस्कव्हर कंपनीची मोटारसायक तिचा चेसी नं.MD2DSPAZZTWH69804

इंजि. नं. JBMBTH27793 असा असलेली श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. 916/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा. किं. अं.

3)50,000/- रु.कि.ची होडा कंपनीची पांढरे रंगाची मेस्ट्रो मॉडेलची मोपेड गाडी रजि.नं.एम.एच.17.ए.वाय. 1901 तिचा चेसीस नंबर MBLJF32ABDGH13373 व इंजि.नं. JF32AADGH13170 असा असेलेली श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. 683/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा. कि.अं.

4)60,000/- रु.किं.ची.टी.व्ही.एस. स्कुटी पेप मोपेड तिचा नं.एम.एच.17, सी.डब्ल्यु. 3170, इंजि. नं. AK1FN2900278 असा असलेली जु.वा.कि.अं.राहता पो.स्टे. गुरनं. 403/2023 भादंवि 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरी गेलेली. 5)70,000/- रु. किं.ची.सुझुकी मोटारसायकल चेसी.नं. M1101F043896 इंजि.नं.M1101M045184 असा असलेली जु.वा.किं.अं.

3,45,000/- एकुण

वरील वर्णनाच्या व किंमतीच्या मोटारसायकल सदर आरोपीकडुन जप्त करण्यात आल्या आहेत व सदर दोन्ही आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे गावच्या सरपंच पदी सौ सविता शहाजी वडीतके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .                                               श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीचे सरपंच  निखील वडीतके यांनी आपल्या पदाचा राजीनामा रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे यांच्याकडे दिला होता .त्यांनी तो तहसीलदार मिलींद वाघ यांच्याकडे सुपुर्त केला त्यांच्या सुचनेनुसार मांडवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीकरीता बैठक बोलविण्यात आली होती या वेळी सरपंच पदाकरीता सौ सविता शहाजी वडीतके यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधीकारी तथा मंडलाधिकारी बी के मंडलीक यांनी जाहीर केले या वेळी उक्कलगावचे कामगार तलाठी इलीयास ईनामदार मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे ग्रामसेवक ताराचंद गाढे तसेच रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य पुष्पाताई चितळकर कल्पना गेठे सुमन जांभुळकर गोविंद तांबे गोकुळ पवार अशोक विटनोर चेतन वडीतके जालींदर तांबे संपतराव चितळकर शहाजी वडीतके दगडू पावले बापुसाहेब काबुडके बाळासाहेब जांभुळकर अतुल तांबे पत्रकार देविदास देसाई भरत थोरात संदीप शेरमाळे मच्छिंद्र पारखे डाँक्टर उद्धव जोशी कृष्णा दळे बबनराव वाडीतके केशव दळवी भाऊसाहेब चितळकर संतोष चितळकर आशोक झाडगे आदिसह मांडवे तांबेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून बी के मडंलीक यांनी काम पाहीले त्यांना ग्रामविकास अधीकारी ताराचंद गाढे यांनी सहकार्य केले निवडीनंतर फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली  शेवटी शहाजी वडीतके यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापूरः(प्रतिनिधी  )-मागील वीस वर्षाच्या कार्यकाळात ,सगळेच अलबेल होते तर जनतेने तुम्हाला का नाकारले.या कारभाराच्या विरोधात आवाज उठवून जे निवडून आले तेच आता सरपंच पद न मिळाल्याच्या पोटदुखीतून आरोप,व्हिडीओ क्लिप्स टाकून राजकीय स्टंटबाजी करीत असल्याची टिका सामाजिक कार्यकर्ते विजय पोपटराव अमोलिक यांनी केली आहे.                                                                                            प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात.विजय अमोलीक यांनी पुढे म्हटले आहे  की,या महाशयाच्या विजयात आमच्या समाजाचा मोलाचा वाटा आहे.असे असताना हे सदस्य ज्यांचेविरुध्द आरोप करुन गावाकरी मंडळाच्या शिदोरीवर निवडून आले.यांच्या थकीत घरपट्ट्या देखील गावकरी मंडळाने भरल्या अन तुमच्यात  नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून या ज्या विरोधकांविरुध्द निवडून आले  स्वार्थापोटी त्याच विरोधी गटात सामिल झाले आहे.स्वतः वाळू तस्करीत सहभाग असणारे हे महाशय सावपणाचा आव आणून ग्रामपंचायत प्रशासनावर खोटेनाटे आरोप करुन प्रसिध्दीचा खटाटोप करीत आहेत. स्वतः अवैध धंदे करायचे आणि वर नाकाने कांदे सोलून फुशारक्या मारायच्या पण जनता एवढी खूळी नाही.ही हरिहराची नगरी आहे.इथे अनैतिकतेला थारा नसल्याचेही अमोलिक यांनी म्हटले आहे.                  गेल्या वीस वर्षे यांची सत्ता होती. त्यां काळातही पाईप लाईन चोकअपची समस्या अनेकदा आली होती.ही तांत्रिक अडचण असल्याने सर्वांनी समजून घेवून सहकार्य केले होते.आताही पाईपलाईन कोणाच्यातरी खोडसाळपणामुळे चोकअप झालेली आहे.मागेही गोधड्या टाकून पाईपलाईन चोकअपचा खोडसाळपणा विघ्नसंतोषिंनी केला होता.चोकअप सापडले पण आठ चारीला पाणी असल्याने चोकअप काढण्यात अडचण येत आहे.ही अडचण तात्पुरती असून दोन तीन दिवसात चारी बंद होताच चोकअप निघेल असा खुलासा ग्रामपंचायत पदाधिका-यांनी केलेला आहे.अशावेळी सामंजस्य व सहकार्य करणे गरजेचे असताना अडचणीचे भांडवल करुन टिकाटिपणी केली जात आहे.खरे तर बेलापुर गावाला १२६ कोटीची पाणीपुरवठा योजना,साठवण तलावासाठी आठ एकर जमिन मोफत मिळवून गावकरी मंडळाने ऐतिहासिक काम केले आहे,त्याबद्दल अभिनंदन करायचे सोडून केवळ विरोधासाठी विरोध केला जात असल्याचा आरोपही विजय अमोलिक यांनी केला आहे.

बेलापूर:(प्रतिनिधी  )--श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात येणार असलेल्या विकास कामांना आपला विरोध नसून चुकीच्या व हुकूमशाही पद्धतीने होणाऱ्या कारभाराला विरोध आहे व यापुढेही राहील.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विखे गटाच्या सर्व संचालकांच्या साथीने बाजार समितीत शेतकरी, सभासद,व्यापारी,हमाल,मापाडी यांच्या हिताकरीता हे काम यापुढेही सुरूच राहील अशी प्रतिक्रिया श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.

बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी नुकत्याच केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक  खंडागळे म्हणाले की,बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार येथे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था होण्यासाठी कॅन्टीन पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. व्यापारी शेड हॉलची दुरुस्ती देखील आवश्यक आहे.बायपास व नगर रोड येथील गाळ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे तसेच उपबाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालयाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून संस्थेची आर्थिक परिस्थिती नसताना स्वतःच्या फायद्यासाठी मलाईदार कामे हाती घेतली जात आहेत.एकाच मिटिंग मध्ये १६-१७ मलाईदार विषय बहुमताच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता मंजूर करून घेतले जातात याची घाई कशासाठी? असा प्रश्न पडतो. सध्या ही सर्व विकास कामे करण्याची संस्थेची आर्थिक परिस्थिती नाही.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने येणाऱ्या काळात संस्थेचे उत्पन्न कमी होणार आहे.याआधी संस्थेने विकास कामांसाठी शासनाकडून कर्ज घेतलेले आहे ते कर्ज अद्याप फिटलेले नसताना पुन्हा कर्ज काढून विकास कामे केली जाणार आहेत याचा बोजा शेतकरी,सभासद,व्यापारी यांच्यावरच पडणार आहे.मग रीन काढून सन करण्याची ही पद्धत आहे  अशा परिस्थिती हुकूमशाही पद्धतीने होत असलेल्या चुकीच्या कामकाजाला आपला विरोध आहे. बेलापूर येथील व्यापारी संकुलास स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती तसेच काही मंडळींनी माजी सरपंच कै.मुरलीशेठ खटोड यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी संकुलास नाव देण्याचा ठराव याआधीच झाला आहे असे सभापती यांनी गावकऱ्यांना खोटे सांगितले तेव्हा गावची बांधिलकी कुठे गेली होती.सभापती-उपसभापती बेलापूर गावचे आहेत याची उपरती आजच कशी झाली? उपसभापतीला तीन महिने तुटक्या खुर्चीवर बसवले तेव्हा उपसभापती गावातीलच आहे याचे भान राहिले नव्हते का?उपसभापती गावातीलच आहेत तर मग संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जाहिराती मध्ये उपसभापती चे नाव का टाकण्यात येत नाही? केवळ उपसभापती नामदार विखे पाटील गटाचे आहे यामुळेच राजकीय सूडबुद्धीने उपसभापतीला वेगळी वागणूक दिली जात आहे ना? असा सवाल खंडागळे यांनी केला.आहे बेलापूर सोसायटीच्या मागील काळातील कामकाजाची सहकार खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी रिक्षा भरून कागदपत्रे सील करून नेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ग्रामस्थांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची केविलवाणी धडपड सभापती सुधीर नवले यांच्याकडून सुरू आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील,खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्यामुळे बेलापूर-ऐनतपूर गावाला १२६ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली.चार कोटी किमतीची शेती महामंडळाची जागा  साठवण तलावासाठी विनामुल्य मिळाली.असे ऐतिहासिक काम सुरू असताना त्याचे शब्दाने ही कौतुक केले नाही. गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी गावच्या पाणीपुरवठा योजनेला कुठे व कसा विरोध केला, झेंडा चौक सुशोभीकरनाला,हरिहर नगर(रामगड)येथील हनुमान मंदिर कामाला तसेच ऐनतपूर येथील बिरोबा मंदिर कामाला कसा विरोध केला हे योग्यवेळी जनतेपुढे आणू असे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी शेवटी म्हटले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावाला प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती पद उपसभापती पद तसेच सचिव पदही मिळालेले असुन गावात विकास कामे होणे अपेक्षित असताना काही मंडळी विकासकामात खोडा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी केला आहे.            प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सभापती सुधीर नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावातील व्यापारी व शेतकरी बांधवांच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार बाजार समीतीच्या पहील्याच बैठकीत बेलापुर उपबाजार समीतीच्या आवारातील काँक्रीटीकरणाची मंजुरी घेतली तसेच मुख्य बाजार समीती श्रीरामपुर व उपबाजार समीती टाकळीभान येथील कामाचेही प्रस्ताव पणन संचालक यांच्याकडे मंजुरीसाठी तयार केलेले आहेत मात्र बाजार समीतीचे उपसभापती व गावाचे उपसरपंच अभिषेक खंडागळे हे केवळ राजकीय ताकदीचा वापर करुन दबाव तंत्राचा अवलंब करुन विकास कामात खिळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत .त्यांनी अन्य दोन संचालक नानासाहेब पवार व सुनिल शिंदे यांच्या स्वाक्षरी घेवुन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली असुन त्यात या विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देवु नये असे म्हटले आहे . खरे तर गावाच्या विकासात राजकीय जोडे बाजुला ठेवुन एकदिलाने काम करणे अपेक्षित होते .परंतु केवळ मोठमोठी भाषणबाजी करायची लोकांची दिशाभूल करायची ही यांच्या कामाची पद्धत आहे हे साऱ्या गावाला जाँगींग ट्रँकच्या कामातुन माहीत झाले आहे जाँगींग ट्रँकचा फार मोठा गवगवा झाला मोठ्या प्रमाणात निधीही खर्ग झाला अन त्या जाँगींग ट्रँकचा जोकींग ट्रँक झाला आपण बोगस व चुकीची कामे करायची अन दुसऱ्याच्या कामात तंगडी अडवायची ही यांची पद्धत आहे यांच्या ओठात एक अन पोटात एक आहे .केवळ राजकीय कावीळ झाल्याने त्यांच्या असणाऱ्या महाभागाच्या सांगण्यावरुनच विकास कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही नवले यांनी शेवटी म्हटले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget