Latest Post

बेलापुर ( प्रतिनिधी )-स्वातंत्रदिनानिमित्त बेलापुर व परिसरात विविध ठिकाणी मोठ्या उत्सहात ध्वजारोहण संपन्न झाले बेलापुरच्या मुख्य चौकातील ध्वजारोहण सरपंच महेंद्र साळवी व ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले बेलापुर पोलीस स्टेशन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर बेलापुर ग्रामपंचायत येथे सरपंच महेंद्र साळवी यांच्या हस्ते तर बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे मेजर निलेश अमोलिक यांच्या हस्ते करण्यात आले बेलापुर मराठी मुलांची शाळा व मराठी मुलींची शाळा येथील ध्वजारोहण माजी सैनिक शरद देशपांडे व ईस्माईल शेख यांच्या शुभहस्ते तर जिल्हा परिषद उर्दू शाळेचे ध्वजारोहण विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थीनी अलिया सर्फराज सय्यद झिनत शफीक आतार जवेरीया सर्फराज सय्यद अदिबा एजाज आतार  व फातीमा अझरुद्दीन सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले जे टी एस हायस्कूल येथील ध्वजारोहण नंदु खटोड व मुख्याध्यापक दत्तात्रय पुजारी यांच्या शुभहस्ते बेलापुर सिनियर महाविद्यालयाचे ध्वजारोहण शेखर डावरे व राजेश खटोड याच्या हस्ते करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समीती बेलापुर येथील ध्वजारोहण खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड यांच्या हस्ते नगर अर्बन बँकेचे ध्वजारोहण जेष्ठ नागरीक कनजी टाक यांच्या हस्ते तर श्री साई ईंग्लिश मिडीयम स्कूलचे ध्वजारोहण मेजर संतोष निकम यांच्या हस्ते तर ऐनतपुर येथील मराठी शाळा अमोलीक वस्ती येथील ध्वजारोहण मेजर सुजित शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच विविध पतसंस्था अंगणवाडी बँका प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीही ध्वजारोहण संपन्न झाले मुख्य झेंडा चौकातील ध्वजारोहण करण्यापूर्वी उर्दू शाळेतील  मदिहा ईकबाल शेख हीने  ऐ मेरे वतन के लोगो हे गीत म्हटले बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने सैनिक माजी सैनिक  स्वातंत्र्य सैनिकांचा परिवार यांचा सन्मान करण्यात आला या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  ) प्रवरा नदीच्या पुलाजवळ असलेल्या दशक्रिया विधी घाटाजवळ सापडलेले लहान बाळ पोलीस, पत्रकार व संदेश वहन यंत्रणेमुळे काही तासातच आजी आजोबांच्या स्वाधीन करण्यात यश मिळाले बेलापुर येथील दशक्रिया विधीच्या घाटावर असणाऱ्या बाकावर एक लहान बाळ झोपलेले होते एका महीलेने त्या मुलाला तेथे ठेवल्याचे तेथे राहाणाऱ्या लिलाबई सकट ,कावेरी सचिन पुजारी ,लता नंदु पुजारी यांनी पाहीले. ती महीला परत येईल असे त्यांना वाटले. बराच वेळ झाला परंतु ती महीला परत आली नाही.  लिला़बाई सकट ,कावेरी सचिन पुजारी लता नंदु पुजारी यांनी त्या बाळावर लक्ष ठेवले झोपलेले बाळ जागी झाले व ते हालचाल करु लागले. ते बाकड्यावरुन खाली पडेल हे लक्षात येताच या तीघीही त्या बाकड्याकडे पळाल्या व बाकड्यावरुन पडणाऱ्या बालकास अलगद पकडले, मुलाची आई बराच वेळ झाला तरी येत नाही हे पाहुन कावेरी पुजारी यांनी पती सचिन पुजारी यांना फोन करुन सदर घटना सांगितले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांशी संपर्क साधला.दिनेश सकट ,संतोष सकट व पोलीस काँन्स्टेबल नंदु लोखंडे तातडीने दशक्रिया विधीच्या ठिकाणी गेले ,त्या मुलाला ताब्यात घेवुन त्यांनी पत्रकार देविदास देसाई यांनी फोन करुन माहीती दिली देसाई यांनी सर्व व्हाँट्सअप गृपवर बाळाचे फोटोव माहीती टाकली तसेच बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीच्या संदेश वहन यंत्रणेद्वारे संदेश प्रसारीत केला अन काही वेळातच बाळाचे आजोबा त्या ठिकाणी आले आजोबाला पहाताच बाळ त्यांच्या दिशेने झेपावले, बाळाचे आजी आजोबा काही वेळातच मिळाल्यामुळे पोलीसांनाही हायसे वाटले ते बाळ आजोबा मच्छिंद्र कारभारी बडधे ,आजी तुळसाबाई बडधे आई ऋषाली शरद बडधे यांच्या ताब्यात देण्यात आले,व्हाँट्सअप गृप व तातडीच्या संदेश वहन यंत्रणेमुळे काही तासातच बाळ सुखरुप घरी पोहोचले.

बेलापुर (प्रतिनिधी  )- पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेलापुरातील खटकाळी गावठाण पाहुणेनगर येथील शेख यांच्या घरावर लाकडी दांडके कुऱ्हाड धारदार हत्याराने हल्ला चढविला घराच्या काचा दरवाजे तोडून घरासमोर लावलेल्या दुचाकीही पेटवुन दिल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली असुन पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन दोन जणाना ताब्यात घेतले आहे .           पाहुणेनगर खटकाळी गावठाण येथे रुखसाना ईक्बाल शेख या राहात असुन त्यांनी बचत गटामार्फत कर्जे घेतले होते त्यातील काही महीलांनी कर्ज वेळेवर भरले नाही म्हणून रुखसाना यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत त्याच परिसरात राहणारे चव्हाण यांना सांगितले त्याचा राग आल्यामुळे या दोन कुटुंबात वाद झाले होते त्यावेळी मोठा जमाव बेलापुर पोलीस स्टेशनला जमा झाला होता त्या वेळी तक्रार देण्यास कुणीही पुढे आले  नाही याच गोष्टीचा राग मनात धरुन राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण  याने आपल्या चार ते पाच साथीदारा समवेत लाकडी दांडके धारदार हत्यारे कुऱ्हाड घेवुन पहाटे तीनच्या सुमारास रुकसाना शेख यांच्या घरावर हल्ला चढविला घरातील खीडकीच्या काचा फोडण्यात आल्या घराच्या पाठीमागील गेटचा दरवाजा तोडून मागील खीडकीच्या काचाही फोडण्यात आल्या बाथरुमचाही दरवाजा तोडण्यात आला शिलाई मशिन फोडण्याचा प्रयत्न केला तसेच घरासमोर दोन मोटार सायकली लावालेल्या होत्या त्यावर पेट्रोल टाकुन त्या पेटविण्यात आल्या त्यात ज्यूपिटर गाडी नंबर एम एच १७ ९१८३ ही जळून खाक झाली त्या शेजारी उभी असलेल्या स्प्लेंडर मोटार सायकलची मोडतोड करुन ती ही पेटवीण्यात आली होती पोलीसांनी तातडीने ती आग विझवली व दोन्ही वहाने पोलीस स्टेशनला आणली  हा प्रकार चालु असतानाच रुक्साना शेख यांचे समोर राहणारे नातेवाईक सुलताना युसुफ पठाण या मदतीकरीता धावल्या असता त्यांच्यावर धारदार शस्राने वार केला त्यामुळे त्या जखमी झाल्या तेथेच राहणारे फिरोज पठाण याने बेलापुर  पोलीस स्टेशनला फोन केला अगदी काही वेळेतच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हाफसे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, संपत बढे,हरिष पानसंबळ ,भारत तमनर ,नंदु लोखंडे हे घटनास्थळी पोहोचले पोलीसांना पहाताच पप्पू चव्हाण शहारुख शेख व त्यांच्या साथीदारांनी पळ काढला पोलीसानी तातडीने शहारुख सांडू शेख व पप्पू उर्फ राजेंद्र भिमा  चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले ,पोलीसांनी सुलताना युसुफ पठाण यांच्या फिर्यादीवरुन शहारुख सांडू शेख पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण व इतर आरोपी विरोधात भादवि कलम  १४३ ,१४७ ,.१४८ ,१४९ ,३२४,४२७,४३५ ,504,506,3/25 आर्म अँक्ट प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ऐ पी आय जिवन बोरसे हे करत आहेत                           गावात सर्व धर्मिय गुण्या गोविंदाने राहत असुन काही गुंड बाहेर गावातुन येवुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते खपवुन घेणार नाही गावाची शांतता बिघडविणाऱ्या व्यक्तीचा सर्व ग्रामस्थ मीळून बंदोबस्त करु *जि प सदस्य शरद नवले*

वार्ताहर- स्वर्गीय पद्मश्री, श्री.बी.जी शिर्के यांच्या जयंतीनिमित्ताने दि.१९,०७,२०२३ रोजी मध्यरात्री पनवेल पासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यामधील इशाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना झाली अतिशय वाईट घटना घडली ही घटनाच स्वरूप पाहून श्री आर बी सूर्यवंशी (सीनियर सी इ), श्री एन व्ही कुदळे सी .इ.व.पी.एम.सी, पीसी., एमसी पुणे विभाग वरील अधिकारी श्री एन एम कदम,श्री के बी लावंड ,श्री पी एम पवार, श्री वि वाय बादल ,यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप व कर्मचारी यांनी स्वतः यांच्या पगारातून रक्कम जमा केली आणि तीच छोटीशी मदत म्हणून शिर्के ग्रुप कडून इशाळ वाडीच्या पुनर्वससाठी रू २५००० धनादेश देऊन मदत केली खालापूर रायगड जिल्हा, येथील नायब तहसीलदार श्री सुधाकर राठोड यांच्याकडे जमा केलेली रक्कम  दिली यावेळी बी.जी शिर्के कंपनी पी.एम.सी ,पीसीएमसी पुणे विभाग मधील मारुती गाढवे, महादेव कदम, मारुती अडलिंगे ,राम पाखरे, देवेंद्र सोनार, अतुल राऊत, नवी मुंबई विभागाचे निवास मेटे ,प्रशांत काळे ,अनिकेत काळे, किरण कुमार मोरे, अशोक जगदेव, विशाल सोनवणे हे सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई तळोजा विभाग हेड ऑफिस व्हिजिलन्स.विभागाचे,श्री प्रवीण दिनकर शिर्के यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील सामाजिक कार्यकर्ते, बिनधास न्यूजचे कार्यकारी संपादक देविदास देसाई यांचा सपत्नीक सन्मान राज्याचे महसुल , पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला        त्या सत्काराचे निमित्तही तसेच होते सामाजिक कार्य करताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते परंतु बेलापुरात सतत सामाजिक कार्यात तसेच पत्रकारीता क्षेत्रात आघाडीवर राहुनही देविदास देसाई यांनी आपल्या कुटुंबाकडेही तितकेच लक्ष दिले त्यामुळेच त्यांची दोन्ही मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे त्यांचा मोठा मुलगा अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहे तर दुसरा मुलगा अभिषेक देसाई हा जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कार्यरत आहे तिनही मुलांना उच्चशिक्षित करुन दोन मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय सेवेत आहेत त्यामुळेच दोन शासकीय अधिकाऱ्याचे माता- पिता होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या या अवलीयांचा सन्मान राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालेला आहे देविदास देसाई यांनी जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही बऱ्याच वर्ष केलेले होते जिल्ह्यात अंनिसची चळवळ सुरु करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता त्यांनी अनेक बुवाबाजी करणाऱ्या बुवांचा भांडाफोड केलेला होता. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पहात आहे सीमा सुरक्षा दल BSF बाँर्डर सिक्युरीटी फोर्स मध्येही त्यांनी पाच वर्ष देशसेवा केलेली आहे . तसेच बेलापुर व परिसरातील घडणाऱ्या  सर्व घटनां वृत्तपत्र तसेच घडामोडी गृपवर तातडीने पाठविण्याचे  काम ते जागृक पत्रकार म्हणून ते सतत करत असतात.बेलापुर गावातही ते सामाजिक कार्यात नेहमी अघाडीवर असतात. गावात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे म्हणून त्यांची ओळख आहे .बेलापुर गावाला १२६ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली त्या योजनेच्या उद़्घाटन कार्यक्रमात संयोजकांनी देसाई दांम्पत्यांचा सन्मान घडवून आणला .चांगल्या उपक्रमात चांगल्या व्यक्तीचा सन्मान चांगल्या व्यक्ती  नामदार विखे पाटील यांच्या शुभहस्ते केल्याबद्दल संयोजकांनाही बिनधास न्युजच्या वतीने धन्यवाद.

श्रीरामपूर : वैयक्तिक वादांना धार्मिक स्वरूप देऊन सामाजिक सलोखा नष्ट करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध घालण्या यावेत अशी मागणी समाजहित जोपासणाऱ्या जागरुक नागरिकांनी मा. तहसिलदार साहेब यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे कळविले आहे की, महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्षे अत्यंत सलोख्याने राहणारे विविध जाती धर्माचे लोक आपआपसातील ऋणानुबंध टिकवून आहेत, गुण्यागोविंदाने एकमेकांचा आदर करुन रहात आहेत. परंतू अलीकडच्या कालावधीत काही राजाश्रय प्राप्त संघटनांकडून हिंदु-मुस्लिम एकोपा बिघडवून त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

प्रेम ही प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी बाब आहे. १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या व्यक्तीने कुणावर करावे हा त्याचा / तिचा वैयक्तिक अधिकार आहे. यात कधी मुलगी हिंदु व मुलगा मुस्लिम राहु शकतो. तर कधी मुलगी मुस्लिम व मुलगा हिंदु असू शकतो. अशा प्रकरणांना धामिक रंग देऊन एकाच धर्माच्या लोकांवर दोष मढण्याचे षडयंत्र सुरु आहे. विशेषतः प्रेमप्रकरणात मुलगा मुस्लिम असेल तर अस्तित्वात नसलेल्या 'लव जिहाद' वगैरे काल्पनिक नाव देऊन संपूर्ण मुस्लिम समाजाला उघड उघड शिव्याशाप, दुषणे देण्याचे काम सुरु आहे. समाजातील तरुणांची माथी भडकावून त्यांना संपूर्ण मुस्लिम समाजा विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिमां विरुध्द हिंसाचार करणे, त्यांच्या धार्मिकस्थळांचे नुकसान करणे, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे अशी कृत्ये केली जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना भुषणावह नक्कीच नाहीत. सामाजिक सलोखा, सामाजिक सौहार्द टिकणे आणि त्यात वाढ होणे हाच त्यावरील उपाय आहे. वैयक्तिक प्रेमप्रकरणाचे राजकारण करुन विष पेरणाऱ्या लोकांना प्रतिबंध करावा हे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

घटना घडलेल्या ठिकाणी दोन्हीकडील लोकांना विश्वासात घेऊन, गुन्हेगारांवर योग्य कार्यवाही करुन सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याकामी प्रयत्न व्हावेत. दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई होत असतानाच ज्यांचा काही संबंध नाही अशा संपूर्ण अल्पसंख्य समाजाला वेठीस धरण्याचे हेतुपुरस्सर होणारे प्रयत्न हाणून पाडण्यात यावेत या संदर्भात शासनाकडून प्रयत्न व्हावेत असे मा. तहसिलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

निवेदनावर सर्वश्री नजीरभाई शेख, हाजी रफिक पोपटिया, जैनुद्दीन जहागिरदार, तन्वीर गुलाम हुसेन, अन्वरभाई फिटर, वासुदेव सैंदाणे, चाँदखान पठाण, बुऱ्हान जमादार, खलीलभाई मोमीन, समीर शेख, फहिमखान, डॉ. जब्बार पटेल, डॉ. इशान शेख, अश्पाकभाई आदिंच्या सह्या आहेत.


बेलापूर प्रतिनिधी-पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरली आहे‌‍ असे ठणकावून सांगणारे, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बेलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समता स्पोर्ट क्लब, आर एस ग्रुप, ग्रामपंचायत व बेलापुर सेवा संस्था यांच्या वतीने येथील विजयस्तंभ चौकामध्ये ‌‌‍सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी जयंती कृती समिती व आर एस ग्रुपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी सर्व समाज बांधवांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जि प सदस्य शरद नवले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील मुथा, बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, जनता विकास आघाडीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, पत्रकार ज्ञानेश गवले, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार, पो कॉ संपत बडे, पो कॉ भारत तमनर, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुस्तक शेख, मेजर सुजीत शेलार, प्रकाश कुऱ्हे, भास्कर बंगाळ, संजय शेलार, बंटी शेलार, रमेश शेलार, विजय शेलार, तानाजी शेलार, बाबासाहेब शेलार, अक्षय शेलार, रोहित शेलार, डॅनियल शेलार, बाळासाहेब शेलार, निलेश शेलार, राहूल शेलार, अशोक अंबिलवादे, भाऊसाहेब राक्षे, बाबुलाल पठाण,अल्ताफ शेख, संकेत शेलार यांचे सह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता स्पोर्ट क्लब व आर एस ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सर्व वेगवेगळ्या पक्षाची नेतेमंडळी तसेच सर्व कार्यकर्ते गट तट सोडून एकाच व्यासपिठावर आले होते अशाच प्रकारे सर्व जण एकत्र येवुन सण उत्सव साजरे करुन गावाचा सन्मान वाढवावा अशी अपेक्षा अनेक जेष्ठांनी व्यक्त केली आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget