Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी )-महीनाभर पांडूरंग श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यासाठी जनसेवा पतसंस्थेने परतीच्या प्रवासासाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे वारकऱ्यांना परतीचा प्रवासही सुखकर झाला आहे .                                              येथील जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुक्कड नेहमीच पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.गावातील स्मशानभूमी असो वा दशक्रियाविधीचा घाट असो किंवा गावातील मंदिरे असो या सर्व कामात सुवालाल लुक्कड हे जनसेवा पतसंस्थेच्या माध्यमातून कार्य करत असतात जेष्ठ नागरीकांच्या सहलीचेही ते आयोजन करत असतात वारकरी महीनाभर चालत पायी वारी करत असतात .विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात.त्यामुळे त्यांचे होणारे हाल लक्षात घेवुन जनसेवा पतसंस्थेने या वर्षी वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाची मोफत व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या सत्कार्यास सर्व संचालक मंडळाने होकार दिला ,अन पंढरपुरहुन परत फिरणाऱ्या वारकऱ्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली मोफत प्रवासा बरोबरच प्रवासाच पतसंस्थेच्या वतीने जेवणही  देण्यात आले या कामी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड पवन चौधरी गणेश अग्रवाल  नंदकुमार गोरे रविंद्र कोळपकर आदिंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले जनसेवा पतसंस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुक्कड चेअरमन प्रविण लुक्कड व्हा चेअरमन प्रकाश कोठारी संचालक अमीत लुक्कड दिपक वैष्णव विक्रम हरकुट योगेश कोठारी सुनिल शेजुळ सौ नंदा खंडागळे सौ सुवर्णा मुंडलीक मनोज कांबळे  सुरेश बाठीया व बँकेचे व्यवस्थापक राहुल दायमा आदिंचे वारकऱ्यांनी आभार मानले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्मती फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उन्मती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सोहेल शेख,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जन्मजय टेकावडे,शाहानवाज शेख,पत्रकार नितीन चित्ते,प्राचार्य डॉ योगेश पुंड यांच्या उपस्थितीत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीरामपूर तालुक्यातील नामवंत शाळांमध्ये ३० वर्षे  शिक्षक म्हणून सेवा केली.जिथे गेले तिथे समरस झाले.नवनवीन उपक्रम राबविले.सध्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. श्रीरामपूरचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये श्री सोलंकी यांचं खूप मोठे योगदान आहे.त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,पोलिस, शासकीय अधिकारी,शिक्षक व इतर ठिकाणी देश व सामाजिक सेवेत अग्रेसर आहेत.

दिनांक 28 जून 2023 रोजी भीम आर्मी चीफ तथा आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक,संघर्षयोद्धा अँड.भाई चंद्रशेखर आजाद हे कार्यक्रम आटोपून घरी जात असताना देवबंद सहारणपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांकडून चार राउंड फायरिंग करण्यात आली.या घटनेमध्ये भाई चंद्रशेखर आजाद कमरेला गोळी घासून गेली.ते जखमी असल्यामुळे तेथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. आता त्यांची तब्येत आता ठीक आहे.दरम्यान देशभर ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.अहमदनगर जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे, प्रशासनाच्या अटी आणि शर्टीं सह मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनास परवानगी मिळाली. म्हणून आज भीम आर्मी भारत एकता मिशन चे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपकजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व आजाद समाज पार्टी युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास "एक पेन,एक वही ची मानवानंदन देऊन " निषेध आंदोलन करण्यात आले.या वेळी जोरदार घोषणाबाजी करत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,जिल्हा अहमदनगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपकजी भालेराव, आजाद समाज पार्टी युवा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पँथर ऋषी पोळ,जिल्हा सचिव साजिद भाई शेख,जिल्हा कार्याध्यक्ष तथा राहाता तालुकाध्यक्ष शब्बीर भाई कुरेशी,कविताताई पोळ, यशवंत पोळ,ममदापुर अध्यक्ष साजिद सय्यद,प्रवक्ते प्रतिनिधी गौरव भालेराव,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रेम शेलार,भीम आर्मी च्या मुन्नाताई चावरे, अनिताताई म्हस्के,सुनीता म्हस्के,शिवाजी मुसमाडे,आकाश गायकवाड,समाधान पगारे,सनी वाघमारे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावचे ग्रामदैवत भगवान श्री हरिहर केशव गोविंद यांच्या मंदिर रंग कामासाठी बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुंक्कड यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला .                         गावातील सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड यांनी गावात अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले त्यात स्मशानभुमी तसेच दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण यांचा समावेश आहे तसेच गावातील पुरातन  महादेव मंदिराचाही जिर्णोद्धार त्यांनी केला आता केशव गोविंद भगवान मंदिराचीही देखभाल सुरु केलेली आहे त्यांच्या या योगदानात आपलाही खारीचा वाटा हवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन  संचालक मंडळाच्या बैठकीत श्री केशव गोविंद भगवान मंदिराच्या रंगकामाकरीता ५१ हजार रुपये देण्याची सुचना बाजार समीतीचे सभापती व बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले यांनी मांडली त्यास सर्व संचालकांनी मान्यता दिली त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड यांच्याकडे रुपये ५१ हजारचा धनादेश सुपूर्त करण्यात आला या वेळी बाजारा समीतीचे सभापती व बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले संचालाक शेषराव पवार ,शिवाजी पाटील वाबळे राजेंद्र सातभाई ,नंदकिशोर नवले ,कनजी टाक ,ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक ,पत्रकार देविदास देसाई, कलेश सातभाई ,बंटी शेलार ,गोरक्षनाथ कुऱ्हे , संजय रासकर ,संजय शेलार सचिव विजय खंडागळे मँनेजर दायमा आदि उपस्थित होते.

प्रेषीत हज. इब्राहिम अलै.ना अल्लाह ने स्वप्नात  आज्ञा झाली तुझा सर्वात जास्त प्रिय असेल ते कुरबान कर. हज.इब्राहिमांच्यां   डोळ्यांसमोर विज कपकपावीगत झालं. हज. इस्माईल अलै.डोळ्यासमोर दिसत होते.  उतारवयात, म्हातारपणी ( ८०) आंनशीव्या वर्षात जन्म झालेला एकुलता  हज. ईस्माईल अलै. मुलगा , अल्लाहाला कित्येकदा दुआ मागुण झालेल्या मुलाला अल्लाहा त्याची कुरबानी  मागतात .आपल्या अंगावर काटा शहारै आणणारी गोष्टं. अल्लाहा आग्नि परीक्षाच घेऊ पाहत राहिले.क्षणाचाही विचार न येता प्रेषित इब्राहिम अलै.नीं हा संदेश  पत्नी हज.सारा अलै. व कोवळ्या मुलाला इस्माईल अलै .नां अल्लाहा (ईश्रवर)ची ईच्छा सांगतात .लागलिचच   आज्ञाधारक मुलगा हज.इस्माईल अलै. वडिलांच्या आज्ञेला  यत्किंचितही विचार न करता अल्लाहा(ईश्रवरा)चीच ईच्छाच असेल तर , तात्काळ होकार देतात. 

तारीख जिलहिजजा(अरबी) १०दहा असते . मिना(मकका  च्या ७ किलोमीटर दक्षिण- पुर्वेला ) नावाने प्रसिद्ध असलेल्या डोंगर व ओसाड भयंकर वाळवंट  मैदानात, पवित्र हाज करण्यासाठी जाणारे हाजी आपला अधिक काळ जिल-हिजजा चे ८.१०.११.१२.तारीखेचे चार दिवस याच ठिकाणी व्यतीत करतात.,( आज लाखोंच्या संख्येने वातानुकुलित टेंट ची गिनीज बुक्स मधे नोंद आढळते)वयोवृद्ध वडील उतारवयातील काठी ज्याला म्हणतात अशा आपल्या काळजाच्या तुकड्यांला घेवून कुरबानी साठी सजवून तयार करून नेतात. मन, डोकं स्तब्ध, सुन्न करणारी वेळ..काळीज लट-लट  करणारी घटना.हा विचार करून. म्हतारी आई-बाबांची कसोटी पहाणारा प्रसंग. तरीसुद्दा

अल्लाहाच्या परीक्षा साठी

प्रेषित इब्राहिम पुत्र प्रेमापोटी डोळ्याला पट्टी बांधून कुरबानी साठी  मुलांवर धारदार शस्त्र चालवतात तर त्या क्षणार्धात अल्लाहानेच  डोळ्यांची पापणीलवण्या आधीच चमत्कारिक घटना घडवून तेथे विशेष ईशदुत जिब्राईल अलै.द्वारे  दुमंबा (,मेंढा) पाठवून दुमंब्याची कुरबानी (बळी)दिली. प्रेषित इब्राहिमांना वाटले की मी अल्लाहाच्या ईच्छेखातर आपल्या सर्वांत प्रिय अशा पुत्राला कुर्बान केले.परंतु डोळ्याचीपट्टी काढून बघतात तर आश्चर्यचकीत होतात,?? हे काय आश्चर्य??? हे सर्व लिला बघून प्रेषित इब्राहिम  अल्लाहची कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतात .

अल्लाहाने प्रेषित इब्राहिम अलै.व हज. इस्माईल अलै यांची सत्व परीक्षा बघून .. समस्त मानवजातीसाठी धडाच  दिला.

परमेश्वर, ईश्वर, अल्लाहला कोणत्याही प्रकारची नरबळी ची अपेक्षित नव्हते च मुळात.. ज्या ठिकाणी " अल्लाह मानवाला सत्तर आई पेक्षा ही जास्त पट अधिक प्रेम, करुणा, ममता करतात " त्या ठिकाणी थोडे ते मुलाचा बळी घेऊ शकतील.. थोडे विचार करण्या सारखी गोष्ट आहे.

  तदनंतर हाजारोंवर्षांपासून  त्याचे प्रतिक म्हणुन जगात अनुयायीं  ऐपतीप्रमाणे कुरबानी करतात.

    धनिक वर्ग ज्यांची पवित्र- हज यात्रा करण्यासाठी ऐपत असणाऱ्या व्यक्ती पवित्र- मक्का येथे हाजला जाउन, हाजची एक महत्त्वाचे कार्य (फर्ज)कुर्बानी करण्यात येते. 

  ऊर्द महिन्याचा शेवटीचा १२वा महिना "जिल-हिजजा " ला हाजी. लोकं  ता. ८ जिलहिजला मक्का च्या काबागृहामध्ये अंगावर पांढराशुभ्र- कपडा लपेटून पुरुष अडीच- तीन मीटर लांब कपडाअंगास गुंडाळून व स्त्रिया पांढराशुभ्र ड्रेस, कपडा परिधान करतात त्यांस "ऐहराम " संबोधतात. 

      असे ऐहराम पांघरूण लाखोंच्या संख्येने हाजी लोकं मक्का येथील पवित्र  पवित्र खान -ए -काबा च्या प्रदक्षिणा करतात त्या दरम्यान व हाजमय वातावरणांत चालता- चालता

 "  आल्लाहा मी हजर आहे  ", "आल्लाहा मी हजर आहे ", "आल्लाहा  मी हजर आहे  "...आशा मंजुळ स्वरांचा गजर निनाद  दुमदुमत रात्रंदिवस  मक्केच्या हाजमय वातावरणात  व तेथुनच मीना नावाच्या दक्षिण-पुर्वेस सात किलोमीटर अंतरावर असलेल्या"  आराफात  " च्या पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात .९ नऊ जिलहिज हे  हाज  चा प्रमुख मुख्य दिवस असतो .आपल्या पापांची क्षमा ,करुणा ,मागतात ,मुला-बाळांसंबंधी, जवळीलनातेवाईकासंबंधी, आपल्या देशासंबंधी त्या पवित्र ठिकाणी दुआ, याचना करतात . 

जगात एकमेव पवित्र स्थळ असेल की जगाच्या पाठीवर एकही देश असा नसेल की  त्या ठिकाणचा माणुष्य नसेल.  जगातील ३५६४ बोलीभाषा  बोलल्या जातात , जगाच्या  कित्येक ठिकाणाहून आलेले हाजी  एकाच आराफात च्या पवित्र मैदानामध्ये एकत्र जमून  कोणीही उच्च निच नाही,कोणी काळा -गोरा नाही ,सर्व लेकरे आल्लाहाची  सारखीच  ५०-६० लाखोंच्या संख्येने लोक एकाच रांगेत- छताखाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, एकाच अरबी भाषेच्या दिव्य कुरआन मजीदने सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात. रडून- व्याकुळ होऊन,ऊर बडवून अल्लाहा जवळ स्वत: केलेल्या कळत-नकळत पापांची माफी मागतात . पाप मुक्तीची प्रार्थना करतात. 

        याच पवित्र "आराफात " मैदानावर  दिनांक 3 मार्च  ६३२ या दिवशी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद सल्ल.नी मक्का विजयानंतर ," जीवनाच्या अंतिम हाज "-यात्रेला लाखोंच्या अनुयायी ,लाखों लोकां समोर -" जगातील संपूर्ण सृष्टी व मानवी कल्याणासाठीच "  जगप्रसिध्द ऐतिहासिक अशी नोंद आहे असे  " अतिंम प्रबोधन, प्रवचन, भाषण, खुतबा " - दिले  होते. असो. 

येथुनच हाज यात्रेकरू जे प्रेषित इब्राहिम अलै.यांना कुरबानी पासून वारंवार मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या अशा तीनही सैतानाच्या प्रतिकृतीला दगडी, कंकरी फेकून मारतात. 

 परतीत पवित्र खाना -ए- काबाला परिक्रमा करुन कुर्बानी विधी ,डोक्यावरील केसांची टक्कल करुन हज चा विधीपूर्ण करण्यासाठी जातात. 

  फक्त कुरबानी करण्याचा उददे्शच  प्रत्येक धर्माच्या दारिद्र्य रेषेखालील वंचित ,गरीबांच्या घरापर्यंत मदत पोहचवली जाईल येवढी काळजी घेण्याचे . ईदच्या निमित्ताने का होईना त्यांची मुलं खातिल व ईदचा आनंद घेतील. सर्व समाजातील गोरगरीब जनतेला ईद व सण हे उत्सव असतात..

खरोखरच हेच अंतिम सत्य असतं..

यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी एकादशी व ईदुल अजहा हा योगायोग जुळून अल्लाह परमेश्वर ईश्वराने एकत्र आणून समभाव एकतेचा प्रतिक होउन सर्व जगाला प्रेम अर्पावे....

ईद साजरी करण्याचा उद्देश हाच असतो सर्व जग निरोगी व  शांत राहणं ..... सर्व धर्मांच्या लोकांना समजून घ्यावे...हिच माणुसकीचा धर्म....




शब्दांकन:- डॉ सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

९२७१६४०००१४...

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायत सत्तांतर नाट्याबाबत स्वाती आमोलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे व बालिशपणाचे असल्याचा खुलासा ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केला आहे                                       बेलापूर ग्रामपंचायत मधील मागील आठवड्यात सरपंच महेंद्र साळवी यांनी गावकरी  मंडळातून काँग्रेस   जनता विकास आघाडीत जो प्रवेश केला होता त्याबाबत चर्चा होत आहे त्यामुळे हा खुलासा देणे गरजेचे आहे मी स्वतः गावकरी मंडळातून निवडून आलो होतो . ठरल्याप्रमाणे पंधरा,पंधरा,महिने प्रत्येकी 4 सरपंच देण्याचे ठरले होते  पण दोन वर्ष होऊनही काहीच हालचाली झाल्या नाही सर्व गावकरी नेत्यांना भेटुनही उत्तर मिळायचे जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर सरपंच बदल करू असे मला सांगण्यात आले होते राजकीय पोळी भाजण्यासाठी जि प. निवडणूक व ठेकेदारी करण्यासाठी कोणी राजीनामा घेतला नाही हे सर्वांना माहिती आहे म्हणून मी एक वर्षांपूर्वी  गावकरी मंडळातून बाहेर पडलो सरपंचाच्या दावेदार स्वाती अमोलिक  यांचे वं कुटुंबियांचे गेल्या 3ते 4 महिन्या पासून गावकरी मंडळाच्या नेत्यांच्या मागे राजीनीमा घेण्यासाठी दबाव वाढत होता  परंतु काही होत नाही म्हणून कोणा मार्फत हा राजीनामा घ्यावा हा प्रश्न गावकरीच्या नेत्यांना पडला होता गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांच्या  मध्यस्थीने जनता विकास आघाडी चे नेते सुधीर नवले, भरत साळुंके, रवींद्र खटोड, यांना बरोबर घेऊन,सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर  अविश्वास ठराव आणण्यासाठी कोणाच्या सांगण्या वरून महिना भर विनवण्या करत होते.  मागील आठवड्यात 11 सदस्यांच्या सह्या घेऊन महेंद्र साळवी यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी तयारी झाल्याचे सरपंच यांना कळाले त्यामुळे सरपंच साळवी यांनी सभापती सुधीर नवले, व रवींद्र खटोड, भरत साळुंके,यांना भेटले मी कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही परंतु माझ्याकडून नेते मंडळींनी बरीचशी कामे चुकीचे करून घेतलेली आहे. त्याचे पुरावे त्यांचे कडे आहे त्यामुळे माझ्यावर मी एक दलित समाजाचा कार्यकर्ता असल्याने मला यातून आपणच मार्ग काढू शकता अशी विनवणी केली होती  मी आपल्याबरोबर काम करण्यास तयार आहे म्हणून सरपंच महेंद्र साळवी यांनी अघाडीत येण्याचा निर्णय घेतला होता साळवी यांनाही आमच्या नेत्यांनी विश्वास दिला कि आमच्या सहा सदस्यांचा पाठिंबा आम्ही आपणास देऊ आपण तीन सदस्य आणा व कारभार तुम्हीच पहा असे ठरले होते  आमच्या नेत्यांना वं मला स्वतः कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती  ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनिमित्तता झालेली आहे  हे पाप वं केलेली खटाटोप झाकण्यासाठी शरद नवले अभिषेक खंडागळे यांनी गटविकास अधिकार्यकडून एक पत्र आणून त्यात 12 मुद्दे भ्रष्टाचाराचे टाकून तुम्हाला 8 दिवसाच्या आत सरपंच पद काढून घेऊ  व कामाला लावू असे दबावतंत्र सरपंचांवर राबविण्यात  आले

नामदार विखे साहेब यांची दिशाभूल करून  सरपंचवर दबाव आणुन माघार घ्यावयास  भाग पाडले आहे

राहिली समाजाची बदनामची महेद्र साळवी सुशिक्षित सरपंच असून त्यांचे वर अविश्वास आणताना समाजाची बदनामी झाली नाही का ?त्यावेळेस आपण  व आपले कुटुंब त्यात सर्वात पुढे होते हे विसरले का दुसऱ्याने लिहुन दिलेल्या कागदावर सह्या करून व्हाट्सअप वर बदनामी करण्यात आली हे कटकारस्थान थांबवावेत अन्यथा आपल्या मंडळाच्या नेत्यांची महिंद्र साळवी यांच्या बाबतची मोबाईल रेकॉर्डिंग आमच्याकडे असून ती व्हायरल करू मग कोण किती खरं आणि किती खोटं हे जनतेला समजेल असेही शेवटी रमेश अमोलीक यांनी म्हटले आहे


बेलापूरः(प्रतिनिधी )-गेले अडीच वर्षे गावकरी मंडळाने विकासाभिमुख कारभार केला असे असताना नवले व साळुंके यांनी सरपंच महेंद्र साळवी यांची दिशाभूल करुन ग्रामपंचायतचा कारभार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तसेच समाजाचीही बदनामी केली.तथापी साळवी यांनी हा कावा वेळीच ओळखून गावकरी मंडळात परतण्याचा योग्य निर्णय घेवून कावेबाजांना तोंडघशी पाडल्याची प्रतिक्रिया गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलिक यांनी दिली आहे .                            बेलापूर ग्रामपंचायतीतील नुकत्याच झालेल्या राजकीय नाट्याबाबत बोलताना अमोलिक म्हणाल्या की,ग्रामस्थांनी विरोधकांना डावलून गावकरी मंडळाला बहुमत दिले.गावकरी मंडळानेही जि.परिषद सदस्य शरद नवले तसेच बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे, सरपंच महेंद्र साळवी यांचे नेतृत्वाखाली जनहिताचा व विकासाभिमुख कारभार केला.पण सत्तेविना तडफडणा-यांना हे देखवले नाही.त्यांनी सरपंच महेन्द्र साळवी यांची दिशाभूल करुन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यात प्रामुख्याने कुणाचा सहभाग होता.हे जगजाहीर झालेले आहे .हे करत असतानाच विरोधकांनी जातीयतेचा घाणेरडा आधारही घेतला.यामुळे मागासवर्गिय समाजाची बदनामी झाल्याचा आरोप अमोलिक यांनी केला.राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घातले आणि सरपंच साळवी यांच्या  वस्तुस्थिती  लक्षात आणून दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळवी यांनी स्वगृही गावकरी मंडळात परतण्याचा निर्णय घेतला.यामुळे कावेबाज व कट कारस्थान करणाऱ्याचा  डाव उधळला गेला.टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला.ग्रामस्थांनी गावकरी मंडळाला बहुमत दिले आहे.तेव्हा विरोधकांनी जनमताचा सन्मान राखावा.स्वार्थासाठी कुटील कारस्थान करुन अस्थिरता आणून गावच्या विकासाला खिळ घालू नये अन्यथा जनमताचा अनादर केल्यास ग्रामस्थ विरोधकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहित असा इशारा अमोलिक यांनी दिला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget