Latest Post


बेलापुर (प्रतिनिधी  )-सत्तेच्या लालसेपोटी या गटातुन त्या गटात कोलांट उड्या मारणाऱ्या  तसेच एका मागासवर्गीय सरपंचाला कारभार पाहु न देणाऱ्या बिनपदाच्या पदाधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी काँग्रेस व जनता विकासअघाडीत जाहीर प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया सरपच महेंद्र साळवी यांनी दिली आहे             या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की पाच वर्षाच्या कार्यकाळात ठेकेदारी मलाच मिळाली पाहीजे या भावनेतुन काम करणाऱ्या जि प सदस्यांनी सर्व सदस्यांना बाजुला ठेवुन केवळ पैसे मिळवीणे हाच उद्देश समोर ठेवुन दादागीरी व दहशत सुरु केली जि प सदस्य मलाच मिळावे या करीता सारा खटाटोप चालला असुन काय चालले हे पक्ष श्रेष्ठीसह एकाही सदस्याला माहीत नाही याच सदस्याने २००७ला मुरकुटे व जनता अघाडी अशी युती करुन सरपंच झाले  सन२००८ ला अशोक सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निमित्त पुढे करुन राजीनामा न देता ससाणे गटाबरोबर युती केली व एकट्यानेच प्रवेश करुन पुन्हा वीस महीने सत्ता बळकावीली व आशोक गवते यांना सरपंचपदापासुन दुर ठेवले याचा आपणास विसर पडला का ?  तसेच २०१० मध्ये कै ससाणे साहेबांचा विश्वासघात करुन ग्रामपंचायतला स्वतंत्र पँनल करुन पराभव झाला. परत २०१२ ला जि प निवडणूकीत पुन्हा मुरकुटे बरोबर युती करुन जी प सदस्यपद मिळवीले त्यानतर २०१४ ला सभापतीपदही मिळवीले २०१७ ला महाविकास अघाडीकडून मुरकुटे व राम शिंदे यांच्या गटाकडून निवडून आले अन त्याच वेळी आमदार राम शिंदे व मुरकुटे यांना टाळून विखेंशी हातमिळवणी केली अन या वेळेस गावकरी मंडळाच्या नेत्यांचाही विश्वासघात केला तसेच मिस्टर शेलार व कै जबाजी अमोलीक यांचाही विश्वासघात कुणी केला हे आठवा  अशा कोलांटउड्या मारणारांनी दुसऱ्याला तत्वज्ञान पाजाळू नये मला सत्तेची लालसा नव्हती म्हणून मीच तीन बैठका घेतल्या त्या वेळी सदस्यांचा कल उपसरपंच पदाच्या बदलाकडे  असल्याचे जाणवले त्यावरुन उपसरपंच खंडागळे याना मी त्यांच्या विरोधात काम करतो असे वाटले १५ १५ महीने असा कार्यकाल ठरला आसताना माझे काम यांच्या सांगण्यानुसार होत होते तो पर्यत यांना माझी कुठलीही आडचण झाली नाही श्रेष्ठींनीही माझा राजीनामा मगीतला नाही पण मी माझ्या कार्यकर्त्याला दोन कामे दिली तर यांच्या पोटात गोळा उठु लागला अन तेथुनच खरी सुरुवात झाली .काही ठिकाणी मी सह्या करण्याचे नाकारलै त्यामुळे तर त्यांचा माथा आणखीनच भडकला आडीच वर्ष तुमच्या मनाप्रमाणे वागलो ते चालले अन आता लगेच अविश्वास ठराव सरपंच बदलाचे वारे का वाहु लागले हे गावालाही समजले पाहीजे अजुन बरेच काही आहे वेळ आली तर  तुम्हाला सर्वासमोर उघडे करण्याचे काम मी  करेल मला संपविण्यासाठी यांनी विरोधकांशी हात मिळवणी केली तर चालते यांनी पुढील जी प व प स निवडणुकीत नवले व खंडागळे यांना सोडून गावकरी मंडळाच्या सदस्यांना उमेदवारी देवुन दाखवावी मी लगेच राजीनामा देतो मला सत्तेची लालसा नव्हती व नाही .श्रेष्ठींनी सांगावे मी कुठे चुकलो  उपसरपंच खंडागळे यांनाही सर्व पदेही मलाच पाहीजे नवले व खंडागळे यांनाच सर्व पदे हवीत श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत सुधीर नवले सभापती झाले ते ही काहींच्या पचनी पडले नाही त्यांना सह्याचे अधीकार मिळू नये यासाठी जीवाचा आटापीटा कोणी केला हे ही तालुक्याला माहीत आहे गावाला पद मिळाले या पेक्षा सुधीर नवलेंना मिळाले यांचे दुःख झाले होते  माझी भावजयी निरक्षर आहे तसेच अमोलीक ताई नोकरी करते त्यामुळे त्यांना नामधारी पदे देवुन आपली पोळी भाजण्याचे षडयंत्र फिसकटले म्हणून यांचा तिळपापड झाला असल्याचेही सरपंच साळवी यांनी शेवटी म्हटले आहे


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गेल्या काही दिवसापासून साई मंदिर बेलापुर येथे बिबट्याचे वास्तव्य असुन अनेकांना त्याचे दर्शन झालेले आहे .त्यामुळे अनुचित घटना घडण्याआगोदर वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे .                                 रात्रीच्या वेळेस हा बिबट्या साई मंदिराकडून रस्ता ओलांडून नाईक पाटील यांच्या शेताकडे जाताना अनेकांनी पाहीला आहे हा रस्ता सतत रहदारीचा असुन पहाटे व सायंकाळी अनेक नागरीक फिरण्यासाठी जात असतात ज्यांना बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी तातडीने उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या बाबत वन परिक्षेत्र अधीकारी कोपरगाव यांना कळविले त्यांनी लेखी अर्ज करणे बाबत सांगितले  यापूर्वी मगणी करताच पिंजरा लावला जात असताना आता अर्ज देण्याचा नियम केव्हापासून झाला यांची विचारणा खंडागळे यांनी उपवन संरक्षक अधीकारी सुवर्णा माने यांच्याशीही चर्चा केली त्यांनी देखील अर्ज द्या शहापुर येथे घडलेल्या घटनेपासुन आम्ही अर्ज घेतल्याशिवाय पिंजरा लावत नाही असे सांगून अर्ज करा लगेच पिंजरा लावला जाईल असेही श्रीमती माने यांनी सांगितले आता पिंजरा केव्हा लागतो याची बेलापुरकरांना प्रतिक्षा आहे मात्र पिंजरा लावाण्याआगोदर काही घटना घडली बिबट्याने कुणावर हल्ला केला तर जबाबदार कोण राहील असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत


बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम धर्मियांचा बकरीईद सण व हिंदु धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरीईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक संपन्न झाली. त्यात सर्व मुस्लीम बांधवांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले असुन त्यांच्या निर्णयाचे हिंदु बांधवांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .                            बेलापुर  येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या आगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की आम्ही सर्व जण कायमच एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे. या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरीईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन  दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला असल्याचे हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख ,अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला असुन या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. बेलापुर गावाने नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम विना पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यानंतर गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा धाडसी निर्णय गावाने घेतला होता. गावाने दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला  तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष बेलापूर गावचे वैभव आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीसाठी ७५ हजार रुपये  देण्याचा देशातील पहीला मान बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी मिळवीला तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मुस्लीम बांधवांनी जागोजागी स्वागत केले आता आषाढी एकादशी व द्वादशी या दोन दिवस कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.  राज्यात नव्हे देशात असा निर्णय घेणारे बेलापुर हे पहीले गाव ठरले आहे. या वेळी जि प सदस्य शरद नवले ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,मोहसीन सय्यद, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, पास्टर अलिशा जोगदंड, एकनाथ नागले, देविदास देसाई, शिवसेनेचे अशोक पवार, विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम नेहमीच या गावाने केले असुन सण उत्सव शांततेत पार पाडा या करीता घेण्यात आलेल्या शांतता समीतीच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श घालुन दिला असल्याचे मत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी व्यक्त केले या वेळी बेलापुरात नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपावरुन शरद नवले अरुण पा नाईक अभिषेक खंडागळे यांनी भाषणात केलेल्या शेरेबाजीमुळे उपस्थितामध्ये हशा पिकला ग्रामपंचायत सदर रविंद्र खटोड, अशोक गवते, मुस्ताक शेख,रमेश आमोलीक ,मिस्टर शेलार ,जिना शेख दादा कुताळ, जाफरभाई आतार, जब्बार आतार, गोपी दाणी रफीक शेख, प्रदीप शेलार, अकीला पटेल, ईस्माईल आतार, सागर ढवळे ,किशोर महापुरे, फतेमोहंमद ईनामदार, हाफीज शेख, कासम शेख सहाय्यक फौजदार सुधीर हापसे ,हवालदार सोमनाथ गाडेकर ,हवालदार शफीक शेख पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ,नंदकिशोर लोखंडे आदिसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांनी आभार मानले.                  *आमच्या शेजारीच हिंदु बांधव राहतात आषाढी एकादशीला ते धार्मिक विधी पुजाअर्चा करुन उपवास करतात.त्याच दिवशी बकरीईद आली असुन त्यांच्या धर्माचा धार्मिक भावनांचा आदर करुन त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे* शफीक आतार                         *या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असुन येथील मंदिर व मस्जिदची एकच भिंत आहे. मुस्लीम बांधवांनी आषाढी एकदशीच्या दिवशीच येणाऱ्या बकरीईदला कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन दोन समाजात सामंजस्य, प्रेम, सदभावना वाढविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे*.*आणखी एक विनंती आहे की* *कुर्बानी देताना गाय किंवा गोवं जनावरांची* *कुर्बानी देवु* *नये* पंडीत महेश व्यास


श्रीरामपूर (गौरव डेंगळे)२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये पतंजली ध्यानपीठ साधक श्री नितीन चित्ते,आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे,
सौ सुरेखा जगदाळे,सुनीता मांडण,रुपाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५५० विध्यार्थीनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात साजरा करण्यात आला.योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून जगभरात २१ जुन  आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.करोगे योग तो राहोगे निरोग हे ब्रीद वाक्याने जगभरात योग दिन साजरा करण्यात आला आहे.यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ.योगेश पुंड तसेच शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.योग दिन यशस्वी करण्याकरीता क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे व श्री नितीन गायधने यांनी अथक परिश्रम घेतले.


बेलापूरःबेलापूरात सत्तांतर झाले नसून फक्त सरपंच हस्तांतरण झाले आहे.बहुमत आजही गावकरी मंडळाकडे असून गावकरी मंडळ अभेद्य आहे.काही झारीतल्या शुक्राचा-यांनी स्वार्थासाठी षडयंञ केले असले तरी ग्रामस्थांचा आम्हालाच पाठींबा आहे.सरपंच महेन्द्र साळवी हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले तरी त्यांना आम्ही अनुसुचित जागेचे आरक्षण असताना सरपंचपद दिले.त्यांनी आमच्यावर मी मागासवर्गिय असल्याने मला ञास दिला असा आरोप करणे निराधार आहे .आम्ही अडीच वर्षात एकदिलाने भरीव विकासकामे केली. गाव विकासाच्या वाटेवर असताना विरोधकांनी केवळ सत्तालालसेपायी कुटील डाव खेळून विकासाला खिळ घातली असल्याने ग्रामस्थच विरोधकांचा हिशोब चुकता करतील असा दावा  जि.परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच तथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकाव्दारे केला आहे.                             बेलापूरचे सरपंच महेन्द्र साळवी यांनी विरोधी गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर जि.परिषद सदस्य श्री.शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,गावकरी मंडळाचे ग्रामपंचायत सदस्य सौ.तबसुम बागवान,कु.सविता अमोलिक,सौ.प्रियंका कु-हे ,सौ.मिना साळवी,सौ.उज्वला कुताळ,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे  यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकात नमूद केले की, गावकरी मंडळ निवडून आले तेंव्हा चार सदस्य अनूसुचित जातीचे असल्याने सर्वांना संधी देण्यासाठी प्रत्येकी  पंधरा महिने सरपंचपद असे सर्वानुमते ठरले होते.पण श्री.साळवी यांनी तिस महिने उलटून गेले तरी शब्द पाळला नाही. त्यांकडे वारंवार राजीनाम्याची मागणी केली पण त्यास प्रतिसाद न देता त्यांनी पदालालसेपोटी व आर्थिक तडजोडी करून विरोधकांशी हातमिळवणी केली.आता ते माझ्यावर दबाव असायचा,मला ञास दिला जायचा असे बिनबुडाचे आरोप करुन सारवासारव करीत आहेत.                         गावकरी मंडळाने गेल्या अडीच वर्षात सातत्याने पाठपुरावा करुन १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच साठवण तलावासाठी विनामुल्य साडे आठ एकर जमिन मिळविली.यात महसूलमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोलाचे सहकार्य केले.विरोधकांकडे वीस वर्षे सत्ता होती.राज्यातही काँग्रेसची सत्ता व हे ज्यांना नेते मानतात ते महसूलमंञी होते मग कां पाणी पुरवठा योजना व  साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही.विरोधकांनी त्यांचेकडे सत्ता असताना कोणते भरीव काम केले हे सांगावे.आम्ही विधायक कामाला सहकार्य करु पण चुकीच्या कामाचा माञ विरोध करु.विरोधकांचे समाधान हे अल्पकाळासाठी आहे.लवकरच पुन्हा गावकरी मंडळाचीच सत्ता येईल असा आम्हाला विश्वास आहे.                            गेल्या अडीच वर्षात गावकरी मंडळाने पाणीपुरवठा योजना व साठवण तलावाचे ऐतिहासिक काम मार्गी लावले.भुयारी गटारांची कामे केली.कारभार करताना एजंट निर्माण होवू दिले नाही.स्वच्छ व जनहिताचा कारभार केला.तीस महिने सरपंचपद भोगल्यावर सरपंच म्हणतात माझ्यावर दबाव होता.असा दबाव होता  तर त्याची यापूर्वी वाच्यता कां झाली नाही.संघटनेने राजीनामा मागीतल्यावरच  दबाव कसा आला. आम्ही गावाशी बांधिलकी राखून अहोराञ कामाला वाहून घेतले.जनतेला हे सर्व माहित आहे.त्यामुळे आता जे घडले ते जनतेला मान्य नाही.हा आमचा नाही तर जनमताचा  विश्वासघात आहे.जनतेची गावकरी मंडळाला सहानुभूती आहे.तेव्हा जनताच विरोधकांना धडा शिकवेल. ज्यांनी फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण केले त्यांनी आता गाव विकासाची जबाबदारी घ्यावी असे सदर पञकात नमूद केले आहे.


श्रीरामपूर- श्रीरामपूरातील टिळकनगर येथील रांजनखोल चौकात रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी आडवुन चाकुचा धाक दाखवुन एका व्यापाऱ्यास लुटणारे सराईत आरोपी जेरबंद करण्यात येथील शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची रईस शेरखान पठाण (वय २८, रा. टिळकनगर), रोहित सोपान रामटेके (वय ३१, रां. रांजणखोल) अशी नावे असून त्यांनी आणखी एका अनोळखी साथीदारसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२ ग्रॅम वजनाची ७० हजाराची सोन्याची साखळी, २० हजार रुपये रोख रक्कम, १० हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकुण १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४, रा. खोसे वस्ती, बेलापूर चौक, कोल्हार रोड) यांनी रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता दुकानात लागणारे मटेरियल घेण्यासाठी २० हजार रुपये खिशात घेतले. त्यानंतर त्यांचा जुना ग्राहक प्रशांत डांगे (रा. राहाता) यांच्याकडुन उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते.

राहाता येथे प्रशांत डांगे हे भेटले नाही, म्हणुन ते पुन्हा राहाता येथुन गणेशनगर, वाकडी मार्गे दत्तनगर येथे आले व नेहमी प्रमाणे टिळकनगर कारखान्याचे पाठीमागुन एकलहरे मार्गे बेलापूरकडे जाण्यास निघाले. तेव्हा टिळकनगर येथील रांजनखोल चौकात दुपारी २ वाजेच्या सुमारास आले व चौकातुन पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे होवुन त्यांना थांबवले. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकु दाखवुन त्यांना धमकावुन त्यांना एकलहरेकडे जाणारे रोडने घेवुन रांजनखोल शिवारात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साळुंखे वस्ती समोर मोटारसायकल बाजुला थांबायला सांगितली.

मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवुन पॅन्टच्या खिशातील २० हजार रुपये तसेच गळ्यातील सोन्याची साखळी व एक विवो कंपनीचा मोबाईल काढुन घेतला. त्यानंतर आणखी पैसे पाहिजे म्हणुन मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांनी आराओरडा केल्याने ते तिघे आरोपी मोटारसायकलवर पळुन गेले.

   याबाबत खोसे यांच्या फिर्यादी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास पथकाने गुप्त बातमीदार व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे चोरटयांचा शोध घेतला असता संशयित इसम रईस शेरखान पठाण, रोहित सोपान रामटेके व त्याचा एक अनोळखी साथिदार यांनी सदरचा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती मिळाल्याने सदर परिसरात सापळा लावुन, शिताफिने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना पकडले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडुन चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

   ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.ना. रामेश्वर ढोकणे, पो.कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. गौतम लगड, पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. संभाजी खरात तसेच पो.ना. सचिन धनाड, पो. कॉ. प्रमोद जाधव व पो.कॉ. आकाश भैरट यांनी केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक देवरे करीत आहेत


बेलापुर (प्रतिनिधी  )-गेल्या तीन महीन्यापासुन बेलापुरात सरपंच बदलाचे वारे वाहु लागले होते अविश्वास ठराव, सरपंच बदल अशी चर्चा सुरु असतानाच सरपंच महेंद्र साळवी यांनी अचानक घुमजाव घेत गावकरी मंडळाला रामराम करुन काँग्रेस ,जनता अघाडी युतीत प्रवेश करुन बेलापुरच्या राजकीय गोटात खळबळ उडवुन दिली आहे                                 या बाबत वृत्त असे की बेलापुर ग्रामपंचायतीत मागील झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला ११ तर काँग्रेस जनता अघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या गावकरी मंडळाच्या हाती सत्ता येताच १५, १५ महीने सरपंच पद देण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार पहीला मान महेंद्र साळवी यांनी देण्यात आला त्या नंतर १५ महीने उलटुनही सरपंच महेंद्र साळवी राजीनामा देत नाही व श्रेष्ठी काहीच बोलत नाही या रागातुन गावकरी मंडळातुन निवडुन आलेले रमेश अमोलीक यांनी गावकरी मंडळाला गुडबाय करुन जनता अघाडी व काँग्रेस गटात जाहीर प्रवेश केला त्यानंतर काही चुकीच्या कामकाजावर आवाज उठविण्याचेही काम अमोलीक यांनी केले सरपंच साळवी यांना ३० महीन्यापेक्षा जास्त कार्यकाळ पुर्ण करुनही राजीनामा देत नसल्यामुळे गावकरी मंडळाकडून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जावु लागला गेल्या तीन महीन्यापासुन सरपंच महेंद्र साळवी हे गावकरी मंडळाच्या विरोधी गटाच्या संपर्कात होते त्यांच्या वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या ,याची कुणकुण गावकरी मंडळाचे नेते शरद नवले यांना लागली होती तरीही त्यांनी शांततेची भुमीका घेतली सरपंच महेंद्र साळवी यांचाही समज पक्का झाला की नेत्याच्या पाठींब्याशिवाय कुणीच अविश्वास आणण्याचे धाडस करु शकत नाही त्यामुळे त्यांनीही बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड भरत साळूंके यांच्याशी संधान साधले त्यांनीही शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या राजकीय उक्तीप्रमाणे साळवी यांना जवळ केले जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सरपंच महेंद्र साळवी यांच्या समवेत बैठक घेतली त्या वेळी साळवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी माझा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे साळवी हे रविंद्र खटोड भरत साळूंके सुधीर नवले यांच्या संपर्कात आल्याचे निश्चित झाल्यामुळे शरद नवले यांनी तुम्हाला तुमचा मार्ग मोळका आहे परंतु आम्ही काहीच कमी केले नव्हते असे सांगुन ते निघुन गेले त्यानंतर बरच काही रात्रीत ठरविण्यात आले अन सकाळी  सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले या वेळी सुधीर नवले , रविंद्र खटोड ,भरत साळूंके अशोक राशिनकर अयाजअली सय्यद राजेश खटोड जाकीर शेख प्रकाश जाजु शेषराव पवार चंदु पा नाईक किशोर बोरुडे शफीक आतार जावेद शेख रमेश अमोलीक संजय शेलार ,विलास मेहेत्रे आदिसह असंख्य कार्यकर्ते होते या वेळी फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली गावकरी मंडळाकडे आता ९ काँग्रेस जनता अघाडीकडे ७ जागा असे सध्यातरी संख्याबळ आहे यातील जनता अघाडीचा एक सदस्य यापुर्वीच अपात्र ठरलेला आहे दोनही गटांनी विरोधी गटातील दोन दोन सदस्य संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे गावकरी मंडळाकडे ९ सदस्य असले तरी त्यातील तीन सदस्य हे मुरकुटे गटाचे आहेत त्यामुळे आणखी काही राजकीय अदलाबदल होते की काय याची कुजबुज गावात सुरु आहे       काँग्रेसच्या गोटात आनंदोत्सव            बाजार समीतीत विखे गटाला धक्का देवुन काँग्रेसचे सुधीर नवले सभापती झाले गणेश कारखाना निवडणूकीतही विखेंना सत्तेपासुन दुर ठेवण्यात काँग्रेस सफल झाली तर बेलापुरातही विखेंचे निकटवर्ती शरद नवले यांच्याकडून काँग्रेसने सत्ता खेचुन एक प्रकारे विखेंना शहच दिलेला असल्याची चर्चा बेलापूर वा परिसरात सुरु आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget