सत्तालालसेपोटी फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण करुन विकासाला खीळ घालणारांना ग्रामस्थच धडा शिकवतील


बेलापूरःबेलापूरात सत्तांतर झाले नसून फक्त सरपंच हस्तांतरण झाले आहे.बहुमत आजही गावकरी मंडळाकडे असून गावकरी मंडळ अभेद्य आहे.काही झारीतल्या शुक्राचा-यांनी स्वार्थासाठी षडयंञ केले असले तरी ग्रामस्थांचा आम्हालाच पाठींबा आहे.सरपंच महेन्द्र साळवी हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले तरी त्यांना आम्ही अनुसुचित जागेचे आरक्षण असताना सरपंचपद दिले.त्यांनी आमच्यावर मी मागासवर्गिय असल्याने मला ञास दिला असा आरोप करणे निराधार आहे .आम्ही अडीच वर्षात एकदिलाने भरीव विकासकामे केली. गाव विकासाच्या वाटेवर असताना विरोधकांनी केवळ सत्तालालसेपायी कुटील डाव खेळून विकासाला खिळ घातली असल्याने ग्रामस्थच विरोधकांचा हिशोब चुकता करतील असा दावा  जि.परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच तथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकाव्दारे केला आहे.                             बेलापूरचे सरपंच महेन्द्र साळवी यांनी विरोधी गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर जि.परिषद सदस्य श्री.शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,गावकरी मंडळाचे ग्रामपंचायत सदस्य सौ.तबसुम बागवान,कु.सविता अमोलिक,सौ.प्रियंका कु-हे ,सौ.मिना साळवी,सौ.उज्वला कुताळ,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे  यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकात नमूद केले की, गावकरी मंडळ निवडून आले तेंव्हा चार सदस्य अनूसुचित जातीचे असल्याने सर्वांना संधी देण्यासाठी प्रत्येकी  पंधरा महिने सरपंचपद असे सर्वानुमते ठरले होते.पण श्री.साळवी यांनी तिस महिने उलटून गेले तरी शब्द पाळला नाही. त्यांकडे वारंवार राजीनाम्याची मागणी केली पण त्यास प्रतिसाद न देता त्यांनी पदालालसेपोटी व आर्थिक तडजोडी करून विरोधकांशी हातमिळवणी केली.आता ते माझ्यावर दबाव असायचा,मला ञास दिला जायचा असे बिनबुडाचे आरोप करुन सारवासारव करीत आहेत.                         गावकरी मंडळाने गेल्या अडीच वर्षात सातत्याने पाठपुरावा करुन १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच साठवण तलावासाठी विनामुल्य साडे आठ एकर जमिन मिळविली.यात महसूलमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोलाचे सहकार्य केले.विरोधकांकडे वीस वर्षे सत्ता होती.राज्यातही काँग्रेसची सत्ता व हे ज्यांना नेते मानतात ते महसूलमंञी होते मग कां पाणी पुरवठा योजना व  साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही.विरोधकांनी त्यांचेकडे सत्ता असताना कोणते भरीव काम केले हे सांगावे.आम्ही विधायक कामाला सहकार्य करु पण चुकीच्या कामाचा माञ विरोध करु.विरोधकांचे समाधान हे अल्पकाळासाठी आहे.लवकरच पुन्हा गावकरी मंडळाचीच सत्ता येईल असा आम्हाला विश्वास आहे.                            गेल्या अडीच वर्षात गावकरी मंडळाने पाणीपुरवठा योजना व साठवण तलावाचे ऐतिहासिक काम मार्गी लावले.भुयारी गटारांची कामे केली.कारभार करताना एजंट निर्माण होवू दिले नाही.स्वच्छ व जनहिताचा कारभार केला.तीस महिने सरपंचपद भोगल्यावर सरपंच म्हणतात माझ्यावर दबाव होता.असा दबाव होता  तर त्याची यापूर्वी वाच्यता कां झाली नाही.संघटनेने राजीनामा मागीतल्यावरच  दबाव कसा आला. आम्ही गावाशी बांधिलकी राखून अहोराञ कामाला वाहून घेतले.जनतेला हे सर्व माहित आहे.त्यामुळे आता जे घडले ते जनतेला मान्य नाही.हा आमचा नाही तर जनमताचा  विश्वासघात आहे.जनतेची गावकरी मंडळाला सहानुभूती आहे.तेव्हा जनताच विरोधकांना धडा शिकवेल. ज्यांनी फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण केले त्यांनी आता गाव विकासाची जबाबदारी घ्यावी असे सदर पञकात नमूद केले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget