Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री जुने बालाजी मंदिर बेलापुर चे अध्यक्ष श्री हरिप्रसाद जी व्यास यांचे सुपुत्र तसेच राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार पूजनीय स्वामीजी श्री गोविन्द देवगिरिजी महाराज व भागवताचार्य पंडीत महेशजी व्यास यांचे पुतणे डाॅ श्री मुकुंद हरिप्रसाद व्यास यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुर च्या अध्यक्ष (डीन )पदी नियुक्ति झाली असुन त्यांच्या नियुक्तीने बेलापुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे                      मागील वर्षी डाँक्टर मुकुंद व्यास यांनी  प्रोफेसर म्हणून त्यांना पदभार स्विकारला होता आता त्यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुरच्या अध्यक्षपदी (डीन )निवड करण्यात आलेली आहे  त्यांची इतक्या मोठ्या संस्थेवर नियुक्ति मुळे बेलापुरच्या वैभवाता आणखी भर पडली आहे या नियुक्ति बद्दल जि.प सदस्य  शरदराव नवले,जनता आघाडीचे अध्यक्ष रविंन्द्र खटोड, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक, सरपंच महेंद्र साळवे उपसरपंच श्री अभिषेक खंडागळे  बेलापुर कार्यकारी सोसायटीचे चेअरमन  सुधीर नवले,भा जा पा चे प्रफुल्ल डावरे माहेश्वरी समाज चे हरिप्रसाद जी खटोड ,जैन समाजाचे श्री शांतिलाल गांधी,छन्याति समाजाचे श्री रमेशजी दायमा,गोसेवक श्री नंदलाल डागा पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा आदिंनी अभिनंदन केले आहे।।

रमजान मुबारक - २०२३ - रोज़ा २९ शुक्रवार दि. २१-०४ -२०२३ 

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख, 
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

प्रेषित मुहम्मद स्व.सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ;  दिन-दिईन- (धर्म) म्हणजे काय ??.

यावर प्रेषित स्व.सल्लम यांनी  तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की, अद दिईन नु नसीह ! , अद दिईन नु नसीह !! ,  अद दिईन नु नसीह !!!,

   अर्थात:- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) ,  

                 !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ), !!

                   !!  लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) !! आहे...

 !    आज जुम्मातुल विदाह - व लैलतुल जा-य-जा ची अवलोकनाची रात्रं...!!

विदाह - या शब्दाचा अर्थ होतो अंतिम, पुन्हा परत न येण्यासाठी,आपण कालच्या लेखात उल्लेख केला होता अंतिम विदाह - म्हणजेच अखेरच्या पुन्हा परत न येण्याच्या  प्रवासाला तसेच प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या हज्जतुल- विदाह,लग्नाच्या दिवशी मुलीला विदाह करतात त्याला ही विदाह म्हणून संबोधतात,असो.

रमजान महीन्यातील शेवटच्या जुम्माला -जुम्मातुल विदाह म्हणतात,याचं महत्त्व फार आहे, प्रत्येक जुम्माला एक क्षण महत्वपूर्ण असतो,त्यावेळी प्रत्येक दुआ याचना कबुल (पुर्ण) होतात, रमजान विदाह तर अजुनही महत्वाचे असणार त्या मंगलमय क्षणांची संधी साधण्यात मोठेपणा असून आदली रात्र लैलतुल कद्रची हजारों महीन्यांची एकच  कद्र च्या रात्रींचाही फायदा उचलला पाहिजे.

आज जुम्माची येणारी रात्र " लैलतुल जा-य-जा "-  अर्थात  उर्दू शब्द आहे, आपल्या प्रत्येक कामाचं जायजा घेणं ; मराठीत  " अवलोकन "होतो. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्यक्तींच्या महत्वपूर्ण   गुणात एक खास गुण बघायला मिळातो,तो स्वतःच - स्वतः चे  अवलोकन करणं,  काय चुकलं ?  काय साध्य करायचे ? काय बाकी आहेत‌ ?,  छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये चुकीचं झालेत का ?  , मग काय बरोबर केले पाहिजेत ?, याचं अवलोकन करणं.चुका झाल्याशिवाय सुधारणा होत नसते. मग माणुस चुकीतूनच पुढे  शिकत असतो. चुकांची गोळाबेरीज करून पुन्हा पुढे जायचं आहेत; सुधारणा करायची आहे ती आजच्या लैलतुल जा-य-जा  व  लैलतुल कद्र च्याच  रात्रीमध्ये , अल्लाह जवळ क्षमा - दया - याचना करून पुन्हा -पुन्हा  चुकीचे होणार नाहीत हे स्पष्ट शब्दात अल्लाह जवळ सांगणे,

 उदाहरणार्थ:- आपल्या खास जवळच्या मित्राला सर्व खासगी गोष्टी  सांगतो, त्या खाजगी गोष्टी मित्र सोडून कोणालाही सांगत नाहीत अशा आयुष्यातील प्रत्येक लहानाहुन -ही -लहान खाजगी गोष्टी ही अल्लाह जवळ एका मित्रांसारखंच सांगणे, तो अल्लाह आहे व्यक्तिगत म्हणणं पुर्ण (कबुल) करतात, म्हणुनच त्यांना अल्लाह म्हणतात.

 पापं - गुन्हे - चुका अल्लाहला सांगुन रिते होवून जाणे.‌ पुढे चांगले संस्कार मुल्यं शिकण्याची, जोपासण्याची तय्यारी करणे व  आयुष्यातील पुढील पडावासाठी - प्रवासासाठी तयारी सुरू केली पाहिजे  तर  मनुष्य या जगात पण प्रगती करतो व अंतिम प्रवासाचीही म्हणजे मृत्यूनंतरची यशस्वी होण्यासाठीही तय्यारी करतो " अर्थात  दुनिया भी और आखिरत भी बनानी होती है ! "   दोन्ही ठिकाणीचा फायदाच फायदा ..आज लैलतुल जा-य-जा ला फायदा उचलला गेला पाहिजे, भरपूर तिलावत करुन अल्लाह रब्बुल आलमीन ला राजी करून देशाच्या शांततेसाठीही दुआ याचना करून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी दुआ याचना करणे.

                 तसेच हे फक्त रमजान स्पेशल पुरतेच न थांबता बारा ही महिने सबाब -पुण्यं कमवायला हवेत, सेवा कार्य सतत करणं याच   गोष्टींना- " सदका - ए-जारीया " म्हणतात,लोक कल्याणकारी कामे केल्याने सुद्धा सबाबच भेटतं. 

                  प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ,दिन- दिईन- (धर्म) म्हणजे काय ?,

   प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांनी उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य  तोंडातून उच्चारले ," अद  दिईन नु नसीह !,"अद दिईन नु  नसीह !!, "अद दिईन नु नसीह !!!

      अर्थात :- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) !!

                   !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌‌ ) !!,

                    !! लोक कल्याण हाच दिईन ( धर्म )!!!उदाहरणार्थ :- (१) स्वतः साठी जी दुआ याचना मागतो, त्यामधे दुसऱ्या लोकांसाठी निरोगी आयुष्यासाठीही दुवा मागणे, आजारी रुग्णांसाठी ते निरोगी व्हावे म्हणून अल्लाह जवळ दुआ मागणे, इतर गरजेचे वेळी दुआ याचना करणे ,(२) मुलांसाठी  चांगले संस्कार मुल्यं शिक्षण द्यावीत, (३) दुसऱ्यांना चांगले उपयोगी सल्ले द्यावीत ; चुकीचे सल्ला देऊ नयेत,चुकीच्या गोष्टी पासून लोकांना सावधान करावेत,(४) दुसऱ्यासबघून चेहऱ्यावर हास्य यावेत,त्यांचे हासून स्वागत करावे ,(५) कुठल्याही अडचणींसमयी मदतीस धावून जावेत,आपल्या कुवतीप्रमाणे होईल तेवढी मदत करावी, (६) समोरच्याला वेळप्रसंगी काम यावे ,खास वेळे काढून वेळ द्यावा, (७ ) चांगल्या प्रकारे शिक्षण द्यावीत, मुलांना संस्कार -संस्कृती- रितीरिवाज -परंपरा- मुल्य शिक्षण द्यावीत, (८ ) आणिबाणीच्या परिस्थिती त्यांना धीर द्यावा, (९ ) वाईट सवयी लागल्या असतील तर त्यांना वारंवार चांगले संस्कार देऊन ,त्या  वाईट सवयींपासून परावृत (अलिप्त) व्हायला मदत करावी. मोटीवहेशनल शिबीर राबवावित, (१०) प्रत्येकाशी अदबीने व शांत धीम्या आदरयुक्त भावनेतून बोलावे ,हितगुज करावेत, (११)   भांडणे करूच नये,वाद विवाद टाळावेत, किंवा नजर अंदाज करावेत , (१२) प्रत्येकांचा आदर सन्मान करावा, (१३) शेजारी, मित्र ,आप्त परिवाराच्या सुख दुःखात सहभागी होऊन मदत करावी, (१४) ज्या परंपरा रितीरिवाज त्रासदायक आहेत त्यांना हद्दपार करावेत, (१५) शक्यतो मित्रांमध्ये,परीवारात, समाजातील लोकांमध्ये मेलमिलाफ,समेट करावं.घडवावे, (१६) कोणी आपल्या चांगल्या विचारांपासून भटकत असेल तर त्याला चांगल्याप्रकारे समुपदेशन  देऊन सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे.(१७) रस्त्याने चालत असताना रस्त्यावरील लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या वस्तू बाजुला कराव्यात. (१८) उन्हाळ्याच्या दिवसांत पाणपोई सुरू करावीत, (१९) शाळा,मदरसा, कॉलेज, शिक्षण संस्था उभाराव्यात ,(२०) धर्मदाय दावाखाने चालू करावीत, (२१) झाडं लावावीत व निसर्गाचं संवर्धन करावेत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तुची देखभाल करावीत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारची हानी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

          .इ.अनेक गोष्टी या मानवी कल्याणासाठी अल्लाह जवळ " सबाब - ए- जारीया ' मध्ये येतात  . तुम्ही केलेल्या गोष्टी जो पर्यंत या जगात त्यांच्यांमुळे लोकांना फायदा होतो ,तो पर्यंत तुम्हाला सबाब भेटत राहील. यालाच सबाब - ए ,- जारीया म्हणतात. (कायम भेटणारे पुण्यं) अर्थात  तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर ही त्याचं पुण्यं (सबाब) भेटेल. 

अशा पुष्कळशा समाजोपयोगी गोष्टी आहेत ते बारांही महीने केल्याने तुम्हाला सबाबच भेटेल, तिचं एखादी चांगली गोष्ट तुम्हाला  तुमच्या कयामतच्या अंतिम दिवशी तुम्हाला जन्नतुल फिरदौस स्वर्गात जाण्यासाठी जरूर कामी येईल, तर शक्य असेल तेव्हा प्रत्येक समाजातील लोकांची मदत होईल तेवढी करावी...

    विशेष गोष्ट म्हणजे :- अंतिमतः  आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार मानतो, जेवढं आभार मानले तेवढे थोडेच राहतील,महिनाभर ," इस्लाम समजून घेताना" लेख मालिका रोज काळजीपुर्वक वाचुन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवलीत.यासाठी सर्वांचे खुप खुप मनापासून धन्यवाद मानतो. त्यात प्रामुख्याने 

(१) दैनिक राष्ट्र सह्याद्री चे संपादक मा.श्री.करण नवले साहेब,आणि दैनिक राष्ट्र सह्याद्री वृत्तपत्र समुहाचे खुप मनापासून आभार मानतो ,

(२) दैनिक शौर्य स्वाभिमानचे

खंबीर मार्गदर्शक तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक साईसंध्याचे संपादक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, संपादक मा.श्री.उद्धव फंगाळ साहेब, व्यवस्थापकीय संपादिका सौ.किरण वाघ मॅडम आणि संपादक मंडळ तथा दैनिक शौर्य स्वाभिमान वृतपत्र समुह मेहकर जि.बुलढाणा, (३) दैनिक समतादुत चे संपादक इंजि. मोहसीन शौकत शेख आणि संपादक मंडळ,, (४) आंतरराष्ट्रीय वर्ल्ड पार्लमेंट न्यूज बुलेटीन  शाखा श्रीरामपूर चे क्रिकेट अंपायर ,समालोचक तज्ज्ञ श्री. दत्ता विघावे सरांनी २१० देशात मालिका पोहोचवण्याचं मोठं काम केलेत. 

(५) माहिती व कायदा वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल बेलापूर चे अस्लमभाई सय्यद, अमन सय्यद, आणि संपादक मंडळ, (६) दैनिक बिनधास्त न्यूज चे अस्लमभाई बिनसाद, (७) दैनिक धुमाकूळचे इम्रान मुसा पटेल, (८) दैनिक मेमन रिपोर्टर चे अफजलभाई मेमन, (९) शेवगाव ताजी खबरे चे अलीमभाई शेख, (१०) दैनिक कॉमन न्युजचे अलताफभाई शेख, अहमदनगर , पुणे , मुंबई, ठाणे , सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कराड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नासिक, जळगाव,धुळे,नांदुरबार, नागपूर,येथील दैनिकांनी व बहुतांश साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल्स संपादकांनी आपल्या प्रसार माध्यमांतील जागेच्या हिशोबाने सदरील मालिका प्रकाशित केली, आणि वाचक वर्गाने देखील यास भरभरुन साथ दिली.या सर्वांच्या सहकार्यामुळेच लेखन मालिका लिहीण्याची मला संधी प्राप्त झाली.करीता या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे.. असेच प्रेम सदैव माझ्या व माझ्या परीवारावर राहु द्यावेत,भारतात सर्व धर्म समभाव एकता अखंडता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न व दुआ करीत रहावेत ही नम्र विनंती .

सर्व वाचकांना, हितचिंतकांना, पत्रकार,संपादक महोदयांना ईद च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा -ईद मुबारक

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 मोबा: ९२७१६४००१४ 


बेलापुर (प्रतिनिधी  )-श्री साई पावन प्रतिष्ठाण ,श्री साई सेवा समिती, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री साईबाबा मंदिरांच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन जयपुर फुट व कँलीपर क्रचेस व व्हील चेअर यांच्या वतीने गरजु व विकलांग व्यक्तीसाठी आयोजित  शिबीरात १२९ विकलांग व्यक्तींना विविध साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले           श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दिव्यांग व्यक्तीसाठी विविध साहीत्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई पावन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कैलास चायल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच महेंद्र साळवी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे करण ससाणे सचिन गुजर प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे श्रीरामपुर केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष जालींदर भवर ,शरद सोमाणी, संतोष भंडारी, शिवाजी कपाळे, प्रविण लुक्कड, शरद नवले, अरुण पा नाईक, रविंद्र खटोड, गणपत मुथा, पंडीत महेश व्यास, अशोक राशिनकर आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे सचिन गुजर माजी नगरसेवक अशोकनाना कानडे शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सुरेशराव वाबळे शरद सोमाणी सुनिल मुथा आदिंनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांगाकरीता आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे कौतुक करुन चांगला उपक्रम राबविल्याबद्दल कैलास चायल व त्यांच्या सर्व टिमला धन्यवाद दिले  या शिबीरात दिव्यांगाना २५ व्हील चेअर ,२० कुबड्या  ७ वाँकर १० तिन पायांची काठी १० साधी काठी तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या ४४ दिव्यांगाना जयपुर फुटचे वितरण करुन त्यांना डाँक्टर  नारायण व्यास यानी रुग्णाना व्यवस्थीत चालवून स्वतः खात्री करुन घेतली  तसेच  २० पोलीओग्रस्त रुग्णांना कँलिपर बसवुन देण्यात आले डाँक्टर नारायण व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञ समीर बुतकर ,प्रमोद सिंग ,जितेंद्र तोमर ,राजेश देऊगळे राधेशाम संकपाळ लक्ष्मण गायकवाड निलेश जाधव यांनी पाय बसविण्यासाठी तसेच कँलिपर बसविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तीन दिवस चाललेल्या या शिबीरात शेगाव धुळे येवला  लासलगाव साक्री मालेगाव वैजापुर बुलढाणा नाशिक तसेच जिल्ह्यातील संगमनेर शेवगाव राहुरी शिर्डी राहाता श्रीरामपुर येथील दिव्यांगानी सहभाग घेतला होता .विविध भागातुन आलेल्या दिव्यांगाची तीन दिवस राहण्याची चहा नाष्टा व भोजनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते शिबीराचा समारोप सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुंक्कड यांचे उपस्थितीत करण्यात आला या वेळी किराणा मर्चड असोसिएशनचे शांतीलाल हिरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा संजय भोंडगे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा दयानंद शेंडगे ,अनिल पवार ,अमोल गाढे , अनिल मुंडलीक ,राजेंद्र बनभेरु ,भरत बाठीया ,रविशेठ चुग ,राजेंद्र थोरात ,अशोक अंबिलवादे ,दत्तात्रय मुसमाडे आदिसह नागरीक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री साई पावन प्रतिष्ठाणचे सचिव राजेंद्र लखोटीया उपाध्यक्ष दिपक सिकची ,खजिनदार संजय लढ्ढा सहसचिव रामविलास झंवर प्रशांत बिहाणी ,रमेश पवार शशिकांत कापसे ,प्रमोद कर्डीले, दिपक क्षत्रीय,धनंजय पवार, श्वेता मेडीकल आदिंनी विशेष परिश्रम घेतले प्रकाश जाजु मित्र मंडळाच्या  वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक सिकची यांनी केले तर राजेंद्र लखोटीया यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.ज्ञानेश गवले यांनी केले

रमजान मुबारक २०२३*

गुरुवार दि. २०-०४-२०२३- रोजा २८

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर


---------------------------------------------


आपण जन्म - जीवन कसे जगावे व मृत्यू बाबत बघितले होते, आज आपण मृत्यूनंतर दफन- कबर - कयामत - पुनर्जन्म वर चर्चा करू यात‌...

पवित्र कुरआन म्हणतो की,"  कुल्लू नफसून जायकतुल मौत "

 अर्थात :- हर जानदार चीज को मौत का मजा चखना है.." 

आम्ही तुम्हाला याच मातीत मिसळणार आहेत ".

जगात लाखोंच्या संख्येने मोठीं मोठें सम्राट - बादशहा -राजे दार्शनिक - खुप मोठे योद्धे होउन होउन गेलेत ज्यांनी निरंकुश सत्ता हुकूमत प्रस्थापित केले भोगल्यात -आप- आपल्या मस्तित , धुंदीत - मी पणापणे निरंकुश सत्ता हुकूमत चालविल्या परंतु त्या सर्वांना या जगातुन अलविदा होवे लागले. व आज ते कोणत्यातरी गावाच्या - शहरातील एका सामसुम जागी असलेल्या कब्रस्तानात ( स्मशानभूमीत) दफन आहेत व आपल्या अखिरतच्या जन्नतुल फिरदौस च्या यशप्राप्तीसाठी कोणीतरी प्रार्थना -दुआ- याचने ची वाट बघतायेत , मित्रांनों हे अंतिम सत्य कोणत्याही परिस्थितीत चुकलं नाहीच,असं म्हणतात की, अमेरिकनं पॉप स्टार मायकेल जॅक्सन याने १५० वर्ष जगण्यासाठी खुप काही केलं , प्रत्येक गोष्टीत वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून आपलं खाद्यपदार्थ खान ,झोपनं, आपलं व्यक्तिगत सर्व कार्यक्रम हे वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून चांगल्या प्रकारे राबविले जात होता परंतु त्याला मरण फक्त ४७-४८ व्या वर्षीच आले.असो.

एकदा हजरत प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांच्या जवळ एक अन्सारी व्यक्ती येवून प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना विचारले की, " या रसुलूल्लाह स्व सल्लम. सर्वांत हुशार व समजदार व्यक्ती कोण असते? कोण असू शकतात ?,

 त्यावर हजरत मुहम्मद पैगंबर स्व सल्लमांनी उत्तर (जबाब)दिला की ," सर्वात हुशार समजूतदार व्यक्ती तो आहे ,जो दिवसांत जास्त वेळा आपल्या मृत्यूचा विचार करणारा " आपली प्रत्येक कृती मृत्यूला सामोरे ठेवून सदाचाराने करणारे व वागणारे "..

  पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," तुम्ही कायम कब्रस्तानात ( जिथे मृत्यूनंतर दफन केले जाते) -- स्मशानभूमी (= जिथे मृत्यूनंतर जाळण्याचा विधी केला जातो) जात जा !! जावे !!.

तुम्हाला तुमच्या मृत्यूची भिंती दिसून आली पाहिजे, या कब्रस्तानात- स्मशानभूमीत गेल्यानंतर तुम्हाला काही तुमचं केलेल्या चांगल्या किंवा वाईट -चुकीच्या गोष्टी आठवल्या पाहिजे ; जेणेकरून तुम्हाला मृत्यूनंतर या कब्रस्तानातल्या कोणत्या कबरीत आपण दफन केले जाऊ  याची लगेच आठवण आली पाहिजे ;  आठवणी जाग्या झाल्या सारखं होईल .. तुम्ही कोणतेही काम कार्य करताना आपल्याला या जगातुन अलविदा ( अलविदा :- या जगातुन कायमचाच निरोप) , अंतिम निरोप घेऊन जावंच लागणारं आहे म्हणून चांगले काम केले पाहिजेत..

          प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," प्रत्येक चांगला माणूस आपल्या मृत्यूनंतर काय होणार याची काळजी घेत असतो.".

मृत्यूनंतर कब्रस्तानातल्या एका कबरीमधे आपणास दफन केले जाईल ,त्यानंतर तेथील यमदूत कोण ? कोणते प्रश्न विचारला जाईल??  आपल्या शरीराच्या धडाला काय ? काय ? यातना भोगव्या लागतील ,हे फक्त कबरीमधील धडाला माहीत...??     तुमचे तुमच्या मागिल कर्मानुसार -कृतीनुसार, चांगल्या- वाईट कामानुसार तुमच्या शिक्षा ठरलेल्या आहेत; त्या सर्व चांगल्या- वाईट शिक्षा फक्त तुम्हाला स्वतःलाच भोगावे लागतील.. कबरीमधे दुसरा कोणीच येणार नाहीत. तुम्ही केलेल्या बऱ्यावाईट कामांचं फळ तुम्हां फक्त एकट्यालाच भोगावे लागतील...

पुन्हा प्रत्येकाला " कयामत " अर्थात:- आफत, -  तबाही- विनाशकारी दिवस --  प्रलयं- विपत्त्ति-शेवटचा न्याय निवाडयाचा दिवस -किंवा सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस , किंवा सृष्टीचा जलमय होण्याचा दिवस .

तुम्हाला जो अर्थ समजून घेण्यासाठी घ्यायचा तो घ्यावा .

मुस्लिम - ख्रिश्चन - यहुदी (ज्यू) धर्मातील ग्रंथानुसार सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस येणार आहे .

तसेच  श्रीमद्भगवद्गीता च्या अनुसार असं म्हणतात की,दोन कल्पो च्या नंतर सृष्टीचा अंत होत असतो.दोन कल्पोंचा अर्थ दोन हजार चतुर्युग यालाच दुसरा काव्य पुर्ण होणे यानंतर प्रलयंकारी (कयामत अर्थात) सृष्टीचा विनाश होत असते. असो.

           त्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून जेवढे मृत्यू झाले त्या सर्वांना कयामतच्या ( अंतिम न्याय निवाडयाच्या दिवशी) एकत्र करुन प्रत्येकाला आपल्या कामाचा हिशोब जाब द्यावा लागणार आहेत.. प्रत्येक मानवाला त्या दिवशी पुन्हा एकदा पुनर्जन्म मिळणार आहेत.. मग तुमची लाखों करोंडौं वर्ष जरी तुमच्या मरणाला झाली असतील तरी तुम्हाला या मातीतुन पुन्हा जन्माला घातले जाणार आहेत ,हे पवित्र कुरआन म्हणतो...

     मागील लेखात आपण पवित्र कुरआन म्हणतो बघितले होते की ," तुम्हाला याच मातीतून दुसऱ्यांदा पुनर्जन्म कयामत च्या दिवशी देणार आहेत"  तुमच्या हिशोबासाठी व त्यानंतर अनंत काळ तुम्ही तुमच्या कर्तुत्वा- कर्मानुसार नरक ( दोजख ) किंवा जन्नतुल फिरदौस ( स्वर्गात) मधे अनंत काळ ,तेथे कधीच मृत्यू नाहीत.. आशा ठिकाणी कायमच राहणार आहे.

पवित्र कुरआन म्हणतो की," जेव्हा कानांचे पडद्ये फुटतील तेवढा आवाज होईल , सर्व सृष्टीत अंधकारमय होईल,संगळ अस्त व्यस्त होईल ,त्या दिवशी माणूस सैरावैरा पळू लागतील सख्खे भाऊ - बहिण एकमेकांना ओळखणार नाही, आईवडील आपल्या मुलांना ओळखणार नाही, पती पत्नी एकमेकांना ओळखणार नाही,त्या वेळी- दिवशी अशी परिस्थिती राहील की  प्रत्येकालाच प्रत्येकाच स्वतःचच पडेल ..त्या दिवशी प्रत्येक माणसाचं असेच राहीलं ..( सुराह नं.८० ,आ.नं.३३ ते ३७),  जर स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस,) की नरकात (दोजख) राहवयाचे यासाठी जीवनात कायम चांगले काम करणं फार गरजेचे आहे ... त्यासाठी मग..आपले व्यवहार-, वागणुक - आपले आचार - विचार,  चांगले संस्कार मुल्यं, शिक्षण, चारित्र्य निष्कलंक होण्यासाठी सतत कार्यरत रहा व सतत आपल्या अंतिम दिवसांची काळजी काळजीपुर्वक घेत राहणे गरजेचे आहे. हेच फक्त आपल्या हातात आहे... अंतिम सत्य कोणी ही नाकारु शकत नाहीत..हेच सत्य आहे...

(लेख वाचून आवडल्यास नक्कीच आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा व आपल्या परिवारास मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवावेत...)

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपुर

मोबा: 92716 40014

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम बांधवाच्या पवित्र उपवास ( रोजा )महीन्यात अल्लातालाकडे ज्या मागण्या विनवण्या केल्या असतील त्या सर्व पूर्ण होवुन हींदु मुस्लिम बांधवाचा आपापसातील स्नेह असाच वृद्धींगत होवो अशी अपेक्षा श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व काँग्रेसचे कार्याध्यक्ष  सचिन गुजर यांनी व्यक्त केली                            बेलापुर येथील जामा मस्जिद येथे बेलापुर काँग्रेस कमीटी व सुधीर नवले मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी गुजर बोलत होते या प्रसंगी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक प्रगत बागायतदार संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक आदिंनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या या वेळी जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके शिवाजी पा वाबळे  ,बेलापुर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड भास्करराव बंगाळ ,सेवा संस्थेचे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले माजी चेअरमन राजेंद्र सातभाई देविदास देसाई अतिश देसर्डा प्रदिप शेलार ,अंतोन आमोलीक ,विश्वनाथ गवते ,अयाजभाई सय्यद जाकीर शेख प्रकाश कुऱ्हे  जावेद शेख दत्ता कुमावत मोहसीन सय्यद जाफरभाई आतार वैभव कुऱ्हे रमेश अमोलीक अनिल पवार विक्रम नाईक आदिसह मुस्लिम बांधव उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम बांधवांचा पवित्र उपवासाचा महीना सुरु असुन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या  सण निमित्त ईश्वरा कडे हेच मागणे मागतो की गावातील हिंदु मुस्लिम बांधवाचे प्रेम असेच वाढत राहो असे उद्ःगार मा.जि प सदस्य शरद नवले यांनी काढले  गावकरी मंडळाच्या वतीने बेलापुर येथील जामा मस्जिद येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी मा .जि प सदस्य शरद नवले बोलत होते या वेळी  सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यानी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान यांनी रमजान महिन्याचे उपवास केल्याबद्दल त्यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,मौलाना शकील अहमद,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,देविदास देसाई, खरमाळे,सुभाष अमोलीक, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अँड.अरविंद साळवी  दिलीप दायमा,अन्वर सय्यद,भाऊसाहेब तेलोरे, संजय बाठीया,मोहसीन सय्यद,जिना शेख,बाबुलाल पठाण,रावसाहेब अमोलिक,अमोलिक,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,राजेंद्र वारे,भैय्या शेख,प्रशांत मुंडलिक,मास्तर हुडे,सद्दाम आतार,टिंकू राकेचा,दादासाहेब कुताळ,मुन्ना बागवान, रफिक बागवान, जाकीर मिस्तरी,बाळासाहेब शेलार, अजित शेलार,जब्बार आतार,विनायक जगताप,जब्बार पठाण,रिजवान आतार,अली सय्यद,बाबा सय्यद, रियाज शेख, इरफान जहागीरदार,कैफ काजी, अँड. आयाज सय्यद, अल्तामश तांबटकर, वासीम जहागीरदार, सलमान तांबोळी, युसूफ पिंजारी आदी उपस्थित होते.

नेवासा प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे हॉटेल दीपक असून नेवासा तालुक्यातील नगर औरंगाबाद महामार्गावर, मौजे प्रवरासंगम येथे गट  न. 146/1 न  तेथे बोगस बांधकाम परवानगीच्या आधारे परमिट रूम लायसन्स मंजूर केले आहे.वस्तुस्थिती अशी की, नगर रचना विभाग अहमदनगर यांच्याद्वारे सदर जागेवर 115 मीटर अंतर सोडून बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आली होती. पण सदर परवानगीच्या विपरीत, हॉटेलचे बांधकाम महामार्ग लगत अगदी 15 मीटर वर करण्यात आले आणि सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्या पोटी कागदोपत्री परमिट रूम लायसन्स, महामार्गापासून 115 मीटर लांब दाखवून मंजूर केले. जागेवरील हकीगत अशी की, महामार्गापासून 115 मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नाही. महामार्ग लगत 15 मीटरवर अवैध बांधकाम करून तेथे परमिट रूम लायसन्स चालविण्यात येत असून अवैध दारू विक्री होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निकषानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत स्थित असलेले अनुज्ञप्ती मंजूर करताना किमान 75 मीटर अंतर सोडणे अनिवार्य आहे पण हॉटेल दीपक येथे अवैधरित्या परमिट रूम लायसन्स मंजूर करून चालविण्यात येत आहे. सदर हॉटेल हे नगररचना विभागाच्या मंजूर नकाशाच्या "ओपन स्पेस" जागेत असून अवैध रित्या बांधलेले आहे. या वर आत काही कारवाई केली जाईल का ? या कडे तालुका व जिल्ह्यातील नागरिक कांचे लक्ष लागुन आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget