रोजा :-!!! " कब्रस्तानात - स्मशानभूमीत जावुन आपला मृत्यू आठवावा .."..!!!*

रमजान मुबारक २०२३*

गुरुवार दि. २०-०४-२०२३- रोजा २८

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर


---------------------------------------------


आपण जन्म - जीवन कसे जगावे व मृत्यू बाबत बघितले होते, आज आपण मृत्यूनंतर दफन- कबर - कयामत - पुनर्जन्म वर चर्चा करू यात‌...

पवित्र कुरआन म्हणतो की,"  कुल्लू नफसून जायकतुल मौत "

 अर्थात :- हर जानदार चीज को मौत का मजा चखना है.." 

आम्ही तुम्हाला याच मातीत मिसळणार आहेत ".

जगात लाखोंच्या संख्येने मोठीं मोठें सम्राट - बादशहा -राजे दार्शनिक - खुप मोठे योद्धे होउन होउन गेलेत ज्यांनी निरंकुश सत्ता हुकूमत प्रस्थापित केले भोगल्यात -आप- आपल्या मस्तित , धुंदीत - मी पणापणे निरंकुश सत्ता हुकूमत चालविल्या परंतु त्या सर्वांना या जगातुन अलविदा होवे लागले. व आज ते कोणत्यातरी गावाच्या - शहरातील एका सामसुम जागी असलेल्या कब्रस्तानात ( स्मशानभूमीत) दफन आहेत व आपल्या अखिरतच्या जन्नतुल फिरदौस च्या यशप्राप्तीसाठी कोणीतरी प्रार्थना -दुआ- याचने ची वाट बघतायेत , मित्रांनों हे अंतिम सत्य कोणत्याही परिस्थितीत चुकलं नाहीच,असं म्हणतात की, अमेरिकनं पॉप स्टार मायकेल जॅक्सन याने १५० वर्ष जगण्यासाठी खुप काही केलं , प्रत्येक गोष्टीत वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून आपलं खाद्यपदार्थ खान ,झोपनं, आपलं व्यक्तिगत सर्व कार्यक्रम हे वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून चांगल्या प्रकारे राबविले जात होता परंतु त्याला मरण फक्त ४७-४८ व्या वर्षीच आले.असो.

एकदा हजरत प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांच्या जवळ एक अन्सारी व्यक्ती येवून प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना विचारले की, " या रसुलूल्लाह स्व सल्लम. सर्वांत हुशार व समजदार व्यक्ती कोण असते? कोण असू शकतात ?,

 त्यावर हजरत मुहम्मद पैगंबर स्व सल्लमांनी उत्तर (जबाब)दिला की ," सर्वात हुशार समजूतदार व्यक्ती तो आहे ,जो दिवसांत जास्त वेळा आपल्या मृत्यूचा विचार करणारा " आपली प्रत्येक कृती मृत्यूला सामोरे ठेवून सदाचाराने करणारे व वागणारे "..

  पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," तुम्ही कायम कब्रस्तानात ( जिथे मृत्यूनंतर दफन केले जाते) -- स्मशानभूमी (= जिथे मृत्यूनंतर जाळण्याचा विधी केला जातो) जात जा !! जावे !!.

तुम्हाला तुमच्या मृत्यूची भिंती दिसून आली पाहिजे, या कब्रस्तानात- स्मशानभूमीत गेल्यानंतर तुम्हाला काही तुमचं केलेल्या चांगल्या किंवा वाईट -चुकीच्या गोष्टी आठवल्या पाहिजे ; जेणेकरून तुम्हाला मृत्यूनंतर या कब्रस्तानातल्या कोणत्या कबरीत आपण दफन केले जाऊ  याची लगेच आठवण आली पाहिजे ;  आठवणी जाग्या झाल्या सारखं होईल .. तुम्ही कोणतेही काम कार्य करताना आपल्याला या जगातुन अलविदा ( अलविदा :- या जगातुन कायमचाच निरोप) , अंतिम निरोप घेऊन जावंच लागणारं आहे म्हणून चांगले काम केले पाहिजेत..

          प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," प्रत्येक चांगला माणूस आपल्या मृत्यूनंतर काय होणार याची काळजी घेत असतो.".

मृत्यूनंतर कब्रस्तानातल्या एका कबरीमधे आपणास दफन केले जाईल ,त्यानंतर तेथील यमदूत कोण ? कोणते प्रश्न विचारला जाईल??  आपल्या शरीराच्या धडाला काय ? काय ? यातना भोगव्या लागतील ,हे फक्त कबरीमधील धडाला माहीत...??     तुमचे तुमच्या मागिल कर्मानुसार -कृतीनुसार, चांगल्या- वाईट कामानुसार तुमच्या शिक्षा ठरलेल्या आहेत; त्या सर्व चांगल्या- वाईट शिक्षा फक्त तुम्हाला स्वतःलाच भोगावे लागतील.. कबरीमधे दुसरा कोणीच येणार नाहीत. तुम्ही केलेल्या बऱ्यावाईट कामांचं फळ तुम्हां फक्त एकट्यालाच भोगावे लागतील...

पुन्हा प्रत्येकाला " कयामत " अर्थात:- आफत, -  तबाही- विनाशकारी दिवस --  प्रलयं- विपत्त्ति-शेवटचा न्याय निवाडयाचा दिवस -किंवा सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस , किंवा सृष्टीचा जलमय होण्याचा दिवस .

तुम्हाला जो अर्थ समजून घेण्यासाठी घ्यायचा तो घ्यावा .

मुस्लिम - ख्रिश्चन - यहुदी (ज्यू) धर्मातील ग्रंथानुसार सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस येणार आहे .

तसेच  श्रीमद्भगवद्गीता च्या अनुसार असं म्हणतात की,दोन कल्पो च्या नंतर सृष्टीचा अंत होत असतो.दोन कल्पोंचा अर्थ दोन हजार चतुर्युग यालाच दुसरा काव्य पुर्ण होणे यानंतर प्रलयंकारी (कयामत अर्थात) सृष्टीचा विनाश होत असते. असो.

           त्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून जेवढे मृत्यू झाले त्या सर्वांना कयामतच्या ( अंतिम न्याय निवाडयाच्या दिवशी) एकत्र करुन प्रत्येकाला आपल्या कामाचा हिशोब जाब द्यावा लागणार आहेत.. प्रत्येक मानवाला त्या दिवशी पुन्हा एकदा पुनर्जन्म मिळणार आहेत.. मग तुमची लाखों करोंडौं वर्ष जरी तुमच्या मरणाला झाली असतील तरी तुम्हाला या मातीतुन पुन्हा जन्माला घातले जाणार आहेत ,हे पवित्र कुरआन म्हणतो...

     मागील लेखात आपण पवित्र कुरआन म्हणतो बघितले होते की ," तुम्हाला याच मातीतून दुसऱ्यांदा पुनर्जन्म कयामत च्या दिवशी देणार आहेत"  तुमच्या हिशोबासाठी व त्यानंतर अनंत काळ तुम्ही तुमच्या कर्तुत्वा- कर्मानुसार नरक ( दोजख ) किंवा जन्नतुल फिरदौस ( स्वर्गात) मधे अनंत काळ ,तेथे कधीच मृत्यू नाहीत.. आशा ठिकाणी कायमच राहणार आहे.

पवित्र कुरआन म्हणतो की," जेव्हा कानांचे पडद्ये फुटतील तेवढा आवाज होईल , सर्व सृष्टीत अंधकारमय होईल,संगळ अस्त व्यस्त होईल ,त्या दिवशी माणूस सैरावैरा पळू लागतील सख्खे भाऊ - बहिण एकमेकांना ओळखणार नाही, आईवडील आपल्या मुलांना ओळखणार नाही, पती पत्नी एकमेकांना ओळखणार नाही,त्या वेळी- दिवशी अशी परिस्थिती राहील की  प्रत्येकालाच प्रत्येकाच स्वतःचच पडेल ..त्या दिवशी प्रत्येक माणसाचं असेच राहीलं ..( सुराह नं.८० ,आ.नं.३३ ते ३७),  जर स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस,) की नरकात (दोजख) राहवयाचे यासाठी जीवनात कायम चांगले काम करणं फार गरजेचे आहे ... त्यासाठी मग..आपले व्यवहार-, वागणुक - आपले आचार - विचार,  चांगले संस्कार मुल्यं, शिक्षण, चारित्र्य निष्कलंक होण्यासाठी सतत कार्यरत रहा व सतत आपल्या अंतिम दिवसांची काळजी काळजीपुर्वक घेत राहणे गरजेचे आहे. हेच फक्त आपल्या हातात आहे... अंतिम सत्य कोणी ही नाकारु शकत नाहीत..हेच सत्य आहे...

(लेख वाचून आवडल्यास नक्कीच आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा व आपल्या परिवारास मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवावेत...)

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपुर

मोबा: 92716 40014

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget