Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम बांधवाच्या पवित्र उपवास ( रोजा )महीन्यात अल्लातालाकडे ज्या मागण्या विनवण्या केल्या असतील त्या सर्व पूर्ण होवुन हींदु मुस्लिम बांधवाचा आपापसातील स्नेह असाच वृद्धींगत होवो अशी अपेक्षा श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व काँग्रेसचे कार्याध्यक्ष  सचिन गुजर यांनी व्यक्त केली                            बेलापुर येथील जामा मस्जिद येथे बेलापुर काँग्रेस कमीटी व सुधीर नवले मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी गुजर बोलत होते या प्रसंगी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक प्रगत बागायतदार संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक आदिंनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या या वेळी जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके शिवाजी पा वाबळे  ,बेलापुर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड भास्करराव बंगाळ ,सेवा संस्थेचे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले माजी चेअरमन राजेंद्र सातभाई देविदास देसाई अतिश देसर्डा प्रदिप शेलार ,अंतोन आमोलीक ,विश्वनाथ गवते ,अयाजभाई सय्यद जाकीर शेख प्रकाश कुऱ्हे  जावेद शेख दत्ता कुमावत मोहसीन सय्यद जाफरभाई आतार वैभव कुऱ्हे रमेश अमोलीक अनिल पवार विक्रम नाईक आदिसह मुस्लिम बांधव उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम बांधवांचा पवित्र उपवासाचा महीना सुरु असुन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या  सण निमित्त ईश्वरा कडे हेच मागणे मागतो की गावातील हिंदु मुस्लिम बांधवाचे प्रेम असेच वाढत राहो असे उद्ःगार मा.जि प सदस्य शरद नवले यांनी काढले  गावकरी मंडळाच्या वतीने बेलापुर येथील जामा मस्जिद येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी मा .जि प सदस्य शरद नवले बोलत होते या वेळी  सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यानी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान यांनी रमजान महिन्याचे उपवास केल्याबद्दल त्यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,मौलाना शकील अहमद,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,देविदास देसाई, खरमाळे,सुभाष अमोलीक, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अँड.अरविंद साळवी  दिलीप दायमा,अन्वर सय्यद,भाऊसाहेब तेलोरे, संजय बाठीया,मोहसीन सय्यद,जिना शेख,बाबुलाल पठाण,रावसाहेब अमोलिक,अमोलिक,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,राजेंद्र वारे,भैय्या शेख,प्रशांत मुंडलिक,मास्तर हुडे,सद्दाम आतार,टिंकू राकेचा,दादासाहेब कुताळ,मुन्ना बागवान, रफिक बागवान, जाकीर मिस्तरी,बाळासाहेब शेलार, अजित शेलार,जब्बार आतार,विनायक जगताप,जब्बार पठाण,रिजवान आतार,अली सय्यद,बाबा सय्यद, रियाज शेख, इरफान जहागीरदार,कैफ काजी, अँड. आयाज सय्यद, अल्तामश तांबटकर, वासीम जहागीरदार, सलमान तांबोळी, युसूफ पिंजारी आदी उपस्थित होते.

नेवासा प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे हॉटेल दीपक असून नेवासा तालुक्यातील नगर औरंगाबाद महामार्गावर, मौजे प्रवरासंगम येथे गट  न. 146/1 न  तेथे बोगस बांधकाम परवानगीच्या आधारे परमिट रूम लायसन्स मंजूर केले आहे.वस्तुस्थिती अशी की, नगर रचना विभाग अहमदनगर यांच्याद्वारे सदर जागेवर 115 मीटर अंतर सोडून बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आली होती. पण सदर परवानगीच्या विपरीत, हॉटेलचे बांधकाम महामार्ग लगत अगदी 15 मीटर वर करण्यात आले आणि सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्या पोटी कागदोपत्री परमिट रूम लायसन्स, महामार्गापासून 115 मीटर लांब दाखवून मंजूर केले. जागेवरील हकीगत अशी की, महामार्गापासून 115 मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नाही. महामार्ग लगत 15 मीटरवर अवैध बांधकाम करून तेथे परमिट रूम लायसन्स चालविण्यात येत असून अवैध दारू विक्री होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निकषानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत स्थित असलेले अनुज्ञप्ती मंजूर करताना किमान 75 मीटर अंतर सोडणे अनिवार्य आहे पण हॉटेल दीपक येथे अवैधरित्या परमिट रूम लायसन्स मंजूर करून चालविण्यात येत आहे. सदर हॉटेल हे नगररचना विभागाच्या मंजूर नकाशाच्या "ओपन स्पेस" जागेत असून अवैध रित्या बांधलेले आहे. या वर आत काही कारवाई केली जाईल का ? या कडे तालुका व जिल्ह्यातील नागरिक कांचे लक्ष लागुन आहे.

श्रीरामपुर (वार्ताहर) - आई वडीलांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याची अंगी असलेली महत्वकांक्षा यामुळेच  सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने व श्रीरामपुर करांच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असुन आपण दिलेले प्रेम स्नेह कधीच विसरु शकणार नाही असे मत श्रीरामपूर येथून बदली झालेले तहसिलदार प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथुन नुकतीच बदली झालेले तहसिलदार प्रशांत पाटील यांचा अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व श्रीरामपुर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने आयोजीत निरोप अर्थात सन्मान सोहळ्यास उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई हे होते. यावेळी नायब तहसिलदार ज्योती गुंजाळ, अव्वल कारकुन सुहास पुजारी, क्लर्क मिलींद नवगिरे, माऊली वृद्धाश्रमाचे संचालक सुभाषराव वाघुंडे, संघटनेचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, सुर्योदय पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप गायके, पत्रकार लालमहमद जहागीरदार, भाऊसाहेब वाघमारे, गोपीनाथ शिंदे, सुभाष चोरडीया, प्रकाश गदीया आदि प्रमुख उपस्थीत होते.

तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की संविधानाने दिलेल्या शक्तीचा वापर सर्वसामान्यासाठी करायचा असतो. चांगल्या कुटूंबात जन्माला आलो तर चांगलं करायला काय हरकत आहे हे लक्षात ठेवून काम करत राहायचे असते. निष्कलंक व्यक्तीमत्व असलेले शिक्षक वडीलांनी कडक शिस्तीने केलेल्या संस्कारातून हे सर्व शक्य होत आहे. अचानक येणाऱ्या  संकट काळास अनेक लोक संधी समजतात अन् हात धुवून घेतात परंतु तालुक्यातील सर्व दुकानदारांनी मग तो स्वस्त धान्य दुकानदार असो किराणा दुकानदार असो सर्वांनी कोरोना काळात प्रशासनाला सहकार्यच केले त्यामुळेच आपण यशस्वीपणे कोरोनावर मात करु शकलो  पुरवठा विभागाने व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी चांगले काम केले.सर्वांच्या सहकार्यामुळेच आदर्श तहसीलदार होण्याचा बहुमान मिळाला असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगीतले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, पत्रकार लालमहमद जहागीरदार, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, माऊली वृद्धाश्रमाचे सुभाषराव वाघुंडे, भाऊसाहेब वाघमारे आदिंनी तहसिलदार प्रशांत पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यात सव्वाचार वर्षात केल्या कामांचा संदर्भ देत आपले अनुभव सांगत कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व, कुशल प्रशासक, उत्तम मार्गदर्शक व सकारात्मक विचारांचा ठेवा असलेले व्यक्तीमत्व म्हणजेच तहसिलदार प्रशांत पाटील हे असल्याचे अनेकांनी आपल्या  भाषणातून व्यक्त केले.तहसीलदार पाटील यांच्याविषयी अनुभव सांगताना प्रत्येक जण भावूक होत होता यावेळी काही काळ स्वत: तहसिलदार पाटील हे ही मनोगतं व्यक्त करताना भावूक झाले होते.

यावेळी देवराम गाडे, बाळासाहेब राठोड, मुरलीधर वधवाणी, राजन वधवाणी, वनराज ढाले, योगेश नागले, राजेंद्र वाघ, गणेश चव्हाण, उमेश दरंदले, अजीज शेख, प्रेम छतवाणी, विकी काळे, सुकदेव वाघमारे, आप्पा शिरोळे, सद्दाम शेख, नुरूद्दीन शेख आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत झुरंगे यांनी केले, प्रास्ताविक राजन वधवाणी यांनी केले तर आभार रज्जाक पठाण यांनी मानले.

श्रीरामपूर : तालुक्यातील प्रशासन नागरिकांसाठी आहे की, लोकांच्या जीवनाशी खेळणा-यांसाठी. असा प्रश्न पढेगाव येथील पडोळे कुटुंबाच्या व्यथेमुळे  समोर आला आहे. शासन नियमानुसार लोकवस्ती पासून ५०० फूट अंतर सोडून, कुकुट पालनाचा व्यवसाय करण्याचा नियम असतांना देखील, तालुका तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या परवानगी न घेता. पडोळे यांच्या घरापासून १५० फुटावर कोंडीराम उंडे यांनी सुरू केलेल्या, कुकुट पालन शेड उभारल्यामुळे, २०२२ साला पासून पडोळे कुटुंबाला जीवन जगणे अवघड झाले असून. पोल्ट्री फॉर्ममुळे पडोळे यांच्या घरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांच्या घरात दुर्गंधी तसेच माशांचे साम्राज्य निर्माण झाल्याने. पडोळे कुटुंबातील सदस्यांना वारंवार उलटी,ताप,मळमळ यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ३ वर्षांपासून होत असलेल्या शारिरीक,मानसिक  त्रासाला कंटाळून, स्थानिक तसेच जिल्हा आरोग्य विभागास तक्रार करून देखील अद्याप कोणताही कारवाई न. झाल्याने,पडोळे कुटुंबियांचे आयुष्य जगणे कठीण झाले असून. प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

श्रीरामपूर  : संपूर्ण राज्यात श्रीरामपूर शहराची ओळख,श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेमुळे निर्माण झालेली असल्याने. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यासह परराज्यातून,मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच रहाट पाळणे वाले येत असतात. परंतु यंदाच्या वर्षी अनेक वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या, श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेच्या नियोजन करतांना. प्रशासनाच्या बेजबाबदार व निष्काळजीपणाच्या भुमिकेमूळे,यात्रा भरणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना. रासकर नगर याठिकाणी,आनंद मेळा नावाने उत्सव भरविण्यात आला. मात्र केवळ गावातील काही विघ्नसंतोषी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वारांवर प्रशासनावर दबाव आणल्याने, पालिका व पोलीस प्रशासनाला दडपशाही करून.१० दिवस चालणारी यात्रा चौथ्या दिवशी बंद पडली. त्यामुळे बाहेरून आलेले व्यापारी व रहाट पाळणे चालकांवर उपासमारीची वेळ आली असून. शहरातील सर्व सामान्य जनतेला यात्रेचा आनंद घेता आला नसल्याने, जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष व संतापाची लाट उसळल्याने. रहाट पाळणे सुरू करा या मागणी करिता. शहरातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सदरच्या मागणी करिता भगवाधारी ग्रुप, बजरंग दल,विश्व हिंदू परिषद, शिवसेना ठाकरे गट, सिटीझन जस्टीस प्रेस कॉन्सिल,महाराष्ट्र  सर्वोदयोग कामागर कर्मचारी युनियन,भोईराज युवा प्रतिष्ठाण आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जात असलेल्या व्यावसायिकांनी आशा प्रकारे त्रास होत असेल तर ,यापुढे श्रीरामपूरच्या यात्रेवर न येण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका अधिका-यां समोर स्पष्ट केले. सदरच्या आंदोलनास सुरज यादव गौतम जावरे, सागर वाडीले,अर्जुन मापारी,यश बनसोडे,राहुल मापारी, रणरागिणीच्या सपनाताई थेटे,अमित मुथ्था, अनिल लगड,शक्तीराज सिंग,गणेश चव्हाण,अमोल सावंत,सेनेचे राहुल ,अकिल मानियार, नितीन बनसोडे, मच्छिंद्र शिंदे, सुनील डुकरे आदींसह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जगाला अहींसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात संपन्न झाली भगवान महावीरांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली जैन बांधव मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते जैन स्थानकापासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके आदिंनी सर्वांना भगवान महावीर जयंती निमित्त मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या तालुक्याचे आमदार लहु कानडे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनीही जैन स्थानकात जावुन भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करुन जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले भास्कर बंगाळ पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा प्रकाश कुऱ्हे दत्ता कुऱ्हे सुवालाल लुंक्कड शांतीलाल हिरण सचिन कोठारी प्रविण बाठीया अभिजित राका सुभाष बोरा अमीत लुक्कड अतिश देसर्डा विजय कोठारी विजय कटारीया संजया बाठीया योगेश कोठारी सांतोष ताथेड मनिष मुथा संदीप देसर्डा शितल गंगवाल आदि उपस्थितीत  होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget