Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी बेलापुर  पोलीसांच्या मदतीने प्रवरा नदीपात्रातुन होत असलेल्या बेकायदा वाळू वहातुक करणाऱ्या वहानावर मोठी कारवाई करुन सात  लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला असुन तीन वहानावर कारवाई करण्यात आली आहे                                           उक्कलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असुन लगेच गेल्यास वाळूची वहाने मिळून येतील अशी गुप्त खबर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली त्यांनी तातडीने आपले वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना सोबत घेवुन छापा टाकला असता तीन वहाने वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू वहातुक करताना आढळून आली पहील्या घटनेत रमेश धनवटे व अभिषेक किशोर गायकवाड रा उक्कलगाव हे प्रवरा नदीपात्रात नाव घाटाजवळ टाटा झेनाँन गाडी क्रमांक एमएच ४१ जी ९०७९ मधुन अवैधरित्यावाळु वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी २ लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वाहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपये किंमतीची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या बाबतची खबर पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिली  दुसऱ्या घटनेत गणेश फुलपगार उक्कलगाव व सागर साळवे राहणार बेलापुर हे उक्कलगाव शिवारात झेनाँन क्रमांक एमएच १९ एस ७३९४ मधुन अवैधरित्या वाळू वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीसऱ्या घटनेत नाना बाळू गुंजाळ हा एक पांढऱ्या रंगाचा टाटा झेनाँन क्रमांक एमएच १५ ईजी १७० किंमत रुपये दोन लाख पन्नास हजार व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा असा एकुण ७ लाख ६५  हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त  केला असुन संबधीता विरोधात भा द वि कलम ३७९ सह भारतीय पर्यावरण संरक्षक कायदा कलम ३/१५ प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे करत आहेत  [बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  व सर्व सदस्यांनी गाव व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीसांनी मोठी कारवाई केली असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे ]

श्रीरामपूर : काल सायंकाळी सव्वा ५ वाजेच्या सुमारास, तपासासाठी आलेल्या जालना पोलिस अटक करतील या भीती पोटी. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील, ३५ वर्षीय जाकीर बबन पठारे नावाच्या इसमाने. ग्रामपंचायती शेजारील दुकानाच्या शेड मध्ये,स्वतःला पेटून घेतल्याची घटना घडली होती. ज्यात जखमी पठारे यास तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जाकीर पठारे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू असतांना. १२ मार्च २०२३ च्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास, उपचार सुरू असतांना जाकीर बबन पठारे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने. दत्तनगर परिसरात शोककळा पसरली आहे. दत्तनगर येथे यापूर्वी देखील अशाच पद्धतीने एका युवकाने, स्वतः ला पेटवून आपली जीवनयात्रा संपवली होती आणि आता जाकीर पठारे याने देखील, स्वतः ला पेटून आपला जीव दिल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

बेलापूरःबेलापूर-खडाळा-अस्तगाव या कुऱ्हे वस्ती रस्त्याच्या उर्वरित कामाला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू देऊ असे आश्वसन खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील कुऱ्हे वस्ती परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.

कुऱ्हे वस्ती वरील रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक तसेच कुऱ्हे वस्ती परिसरातील  नागरिकांच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे यांच्याकडे करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधी मधून १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व नुकतेच त्या निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले. याबद्दल श्री. लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात बेलापूर -खंंडाळा-अस्तगाव(प्रजिमा१२)हा रस्ता कु-हे वस्ती,जवाहरवाडी,टिळकनगर,रांजणखोल,खंडाळा,अस्तगाव असा आहे.हा रस्ता वर्दळीचा असून  वाहतुकीसाठी महत्वाचा आहे.तसेच हा रस्ता झाल्यास शिर्डी या तिर्थस्थळला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा होणार आहे.या रस्त्यामुळे बेलापूर -श्रीरामपूर रस्त्यावरचा वाहतुकीचा भार कमी होणार आहे. सध्या हा रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहतुकीसाठी अडचणीचा झाला आहे.यामुळे सदर रस्त्याचे नुतणीकरण व मजबुतीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी खासदार निधीतून या रस्त्याचे कामासाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे, प्रभात कुऱ्हे,अशोक कुऱ्हे,बापूसाहेब कुऱ्हे, सुनिल जाधव, दत्ता साळुंके, महेश कुऱ्हे, प्रफुल्ल कुऱ्हे, बापूसाहेब निर्मळ आदी उपस्थित होते.

बेलापुर- (प्रतिनीधी )राहुरी तालुक्यातील संक्रापुर येथील जाधव डीपी नादुरुस्त होवुन अठरा दिवस होवुनही नविन डीपी न आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात भरुन न येणारे नुकसान होत असुन तातडीने डीपी देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंर्द मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे                                       पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की संक्रापुर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथील जाधव डी पी वर मोठ्या प्रमाणात शेतकरी अवलंबून असुन हे ट्रान्सफार्मर जळुन अठरा दिवस झाले अजुनही दुरुस्त करुन मिळालेले नाही या बाबत महावितरणकडे वारवार मागणी करुनही डीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे .राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्या जनता दरबारात देखील ही समस्या मांडलेली आहे त्या घटनेस देखील सहा दिवस उलटुन गेलेले आहे विज नसल्यामुळे सर्व पिके जळून चाललेली आहैत जनावरांच्या चारा पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असुन आपणच आमचे मायबाप आहात आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे या निवेदनावर देविदास देसाई, कल्याणराव जगताप, नबाजी जगताप, बाळासाहेब जाधव, नारायण जाधव ,बाळासाहेब गुंड, नंदकुमार लोंढे, वसंत बर्डे ,संपतराव होन, पंडीतराव थोरात ,विश्वनाथ जगताप, विकास पा थोरात, कचेश्वर जगताप, राजेंद्र जगताप, विश्वनाथ पवार ,वसंत लोखंडे, बाजीराव जगताप आदीच्या सह्या आहेत

बेलापूर: छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त नगररोड,वीर सावरकर चौक याठिकाणी शिवपुतळ्याचे पुजन व आरती बेलापूरचे भुमिपुत्र पोलिस उप अधीक्षक मिलिंद शिंदे साहेब (चंद्रपूर)यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यानिमित्ताने केशव गोविंद विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रशिक्षक अकबर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तलवार बाजीचे प्रात्यक्षिक सादर केले,या तलवार बाजीचे प्रात्यक्षिकास उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली व बक्षिसांची बरसात केली.या कार्यक्रमास मंडळाचे आधारस्तंभ सुनिल भाऊ मुथ्था,जि.प. सदस्य शरदराव नवले,पं.स.सदस्य अरुण पा.नाईक,सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे , रविंद्र खटोड, भरत साळूंके,सुधीर नवले, सुवालालजी लुंक्कड, प्रशांत लढ्ढा ,शांतीलाल हिरण ,अशोक गवते ,राजेश खटोड विलासनाना मेहेत्रे, लहानुभाऊ नागले,भाऊ डाकले, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, मारूती राशीनकर ,वैभव कुर्हे, भाऊसाहेब तेलोरे,सागर खरात, रमेश अमोलिक ,रावसाहेब अमोलिक ,महेश कुर्हे, मुश्ताक शेख ,प्रभात कुर्हे ,साईनाथ शिरसाठ, अमोल गाढे ,दिपक क्षत्रिय ,मोहसिन सय्यद ,आलम शेख ,समीर जाहगिरदार ,विलास सोनवणे ,सचिन वाघ ,राकेश कुंभकर्ण ,सागर ढवळे ,किशोर खरोटे , बाळासाहेब दाणी, पप्पू कुलथे,कलेश सातभाई , गजानन डावरे, शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच मंडळाच्या वतीने उद्या शनिवार दिनांक ११मार्च रोजी सायंकाळी ६वा.जे.टि.एस.हायस्कुलच्या समोरील मैदानावर प्रसिद्ध व्याख्याते श्री. सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे त्या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे व कार्याध्यक्ष राहुल माळवदे यांनी केले आहे.

बुलढाणा-देशभरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या, तसेच राज्यातील सर्वात मोठ्या  यात्रेपैकी एक असलेली. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रा आज सोमवारी रोजी आरंभ झाला असून. यात्रेचा शुंभारंभ जवळपास १० ते १२ ट्रक नारळाच्या महा होळीने करण्यात आला. करोनामुळे मागील ३ वर्षे यात्रा न भरल्याने, यंदाच्या वर्षी लाखो सर्वधर्मीय भाविकांनी हजरत सैलानी बाबा यात्रेस हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या होळीसाठी सैलानी बाबा दरगाह परिसरातील मुजावर परिवाराच्या शेतात, जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा घेऊन, महा होळीचे दहन करण्यात आले. यावेळी शेख रफिक मुजावर, पंचायत समिती ससदय शेख मुजावर,शेख शाफिक मुजावर व इतर मुजावर परिवारातील मान्यवरांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार रुपेश खंडारे ,रायपूरचे पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या सह लाखो भाविकांच्या साक्षीने, नारळांची महाहोळी प्रज्वलित करण्यात आली. दक्षतेचा भाग म्हणून अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावातील वातावरण अवैध व्यवसायामुळे दुषित होत असेल तर पोलीसांनी गावातील सर्वच अवैध व्यवसाय बंद करावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे                           प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की गावात चाललेल्या अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आली असेल तर गावातील सर्व अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावेत गावात गुटखा मटका जुगार बिंगो जुगार सर्व काही खुले आम सुरु आहे गावची शांतता धोक्यात आली असल्याचे वृत्त प्रकाशीत झाले असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय पोलीसांनी तातडीने बंद करावेत या बाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणार असुन हे व्यवसाय बंद न झाल्यास गावातील एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस राकेश ओला यांना भेटणार आहे गावातील कुणीही पुढारी अवैध व्यवसायाला पाठींबा देणारच नाही असे कुणी पुढारी अवैध व्यवसायाला गुपचुप पाठींबा देत असेल तर असे पुढारीही गावापुढे उघडे झालेच पाहीजे परंतु पुढाऱ्याच्या नावाखाली कुणी मलीदा लाटत असेल तर ते ही उघड झाले पाहीजे आम्ही केव्हाच अवैध व्यवसायाला पाठींबा दिलेला नाही आता या पुढे गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी बेलापुर ग्रामस्थांची मागणी आहे अवैध व्यवसायामुळे गावातील तरुण पिढी भरकटली आहे मटका गुटखा अन दारुच्या नशेत तरुण पिढी बरबाद होत आहे त्यामुळे गावातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी सरपंच साळवी यांनी केली आहे अवैध धंद्याबाबत आमदार लहु कानडे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आता बेलापुरचे प्रथम नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे त्यामुळे आता लोकप्रतिनिधीच आवैध धंद्याबाबत आक्रमक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget