
बेलापुर (प्रतिनिधी )-गावातील वातावरण अवैध व्यवसायामुळे दुषित होत असेल तर पोलीसांनी गावातील सर्वच अवैध व्यवसाय बंद करावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की गावात चाललेल्या अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आली असेल तर गावातील सर्व अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावेत गावात गुटखा मटका जुगार बिंगो जुगार सर्व काही खुले आम सुरु आहे गावची शांतता धोक्यात आली असल्याचे वृत्त प्रकाशीत झाले असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय पोलीसांनी तातडीने बंद करावेत या बाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणार असुन हे व्यवसाय बंद न झाल्यास गावातील एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस राकेश ओला यांना भेटणार आहे गावातील कुणीही पुढारी अवैध व्यवसायाला पाठींबा देणारच नाही असे कुणी पुढारी अवैध व्यवसायाला गुपचुप पाठींबा देत असेल तर असे पुढारीही गावापुढे उघडे झालेच पाहीजे परंतु पुढाऱ्याच्या नावाखाली कुणी मलीदा लाटत असेल तर ते ही उघड झाले पाहीजे आम्ही केव्हाच अवैध व्यवसायाला पाठींबा दिलेला नाही आता या पुढे गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी बेलापुर ग्रामस्थांची मागणी आहे अवैध व्यवसायामुळे गावातील तरुण पिढी भरकटली आहे मटका गुटखा अन दारुच्या नशेत तरुण पिढी बरबाद होत आहे त्यामुळे गावातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी सरपंच साळवी यांनी केली आहे अवैध धंद्याबाबत आमदार लहु कानडे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आता बेलापुरचे प्रथम नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे त्यामुळे आता लोकप्रतिनिधीच आवैध धंद्याबाबत आक्रमक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
Post a Comment