श्रीरामपुर तालुक्याचा विकास व्हावा या करीता रस्त्याची कामे वेगाने -कानडे
बेलापुर (प्रतिनिधी )-ग्रामीण भागाचा विकास होण्याकरीता दळणवळणाची साधने, रस्ते चांगली हवीत .त्यामुळेच खेड्याची ,ग्रामीण भागांची प्रगती व्हावी या करीता आमदार लहु कानडे यांनी मतदार संघात रस्त्याची कामे वेगाने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद़्गार माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी काढले बेलापुर हद्दीतील गायकवाड वस्ती सुभाषवाडी वळदगाव या दिड किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकर अंदाजीत रुपये ४० लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभांरभ माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्या वेळी बोलताना कानडे म्हणाले की या रस्त्याच्या कामासंदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी वांरवार पाठपुरावा केला होता आमदार लहु कानडे यांनी मतदार संघातील सर्व रस्ते दुरुस्त करण्याचा चंग बांधला आहे असेही ते म्हणाले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक म्हणाले की आमदार लहु कानडे या तालुक्याचे लोकप्रतिनीधी झाल्यापासुन श्रीरामपुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत असेही नाईक म्हणाले या वेळी बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले म्हाणाले की सुभाषवाडी वळदगाव या नागरीकासाठी श्रीरामपुर कडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे तसेच विद्यानिकेतन शाळेत १५०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असुन हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी पालकांची अनेक दिवसापासुन मागणी होती ही मागणी आमदार लहु कानडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ या रस्त्याच्या कामास ४० लाख रुपयांचा निधी दिला असुन बेलापुर ते श्रीरामपुर या रस्त्याच्या कामास आमदार कानडे यांनी १६ कोटी रुपये दिले असल्याचे नवले यांनी सांगितले या वेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, श्रीकृष्ण ताम्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले .या वेळी डाँक्टर राजीव शिंदे, प्राचार्य शेळके ,किशोर नवले,अशोक भोसले,प्रमोद भोसले,दिपक निंबाळकर ,माजी सभापती दत्ता कुऱ्हे ,व्हा .चेअरमन पंडीतराव बोंबले,गणेश राशिनकर परिक्षित नवले ,विपुल नवले सागर नवले,अशोक नवले, संजय नवले ,महेश खंडागळे ,वैष्णव साळवे संदीप नवले आदिसह विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment