लाखो नारळाच्या होळीने हजरत सैलानी बाबांच्या यात्रेचा आरंभ,लाखो भाविक सैलानीत दाखल.
बुलढाणा-देशभरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या, तसेच राज्यातील सर्वात मोठ्या यात्रेपैकी एक असलेली. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रा आज सोमवारी रोजी आरंभ झाला असून. यात्रेचा शुंभारंभ जवळपास १० ते १२ ट्रक नारळाच्या महा होळीने करण्यात आला. करोनामुळे मागील ३ वर्षे यात्रा न भरल्याने, यंदाच्या वर्षी लाखो सर्वधर्मीय भाविकांनी हजरत सैलानी बाबा यात्रेस हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या होळीसाठी सैलानी बाबा दरगाह परिसरातील मुजावर परिवाराच्या शेतात, जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा घेऊन, महा होळीचे दहन करण्यात आले. यावेळी शेख रफिक मुजावर, पंचायत समिती ससदय शेख मुजावर,शेख शाफिक मुजावर व इतर मुजावर परिवारातील मान्यवरांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार रुपेश खंडारे ,रायपूरचे पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या सह लाखो भाविकांच्या साक्षीने, नारळांची महाहोळी प्रज्वलित करण्यात आली. दक्षतेचा भाग म्हणून अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते.
Post a Comment