Latest Post

बेलापुर- (प्रतिनीधी )राहुरी तालुक्यातील संक्रापुर येथील जाधव डीपी नादुरुस्त होवुन अठरा दिवस होवुनही नविन डीपी न आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात भरुन न येणारे नुकसान होत असुन तातडीने डीपी देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंर्द मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे                                       पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की संक्रापुर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथील जाधव डी पी वर मोठ्या प्रमाणात शेतकरी अवलंबून असुन हे ट्रान्सफार्मर जळुन अठरा दिवस झाले अजुनही दुरुस्त करुन मिळालेले नाही या बाबत महावितरणकडे वारवार मागणी करुनही डीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे .राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्या जनता दरबारात देखील ही समस्या मांडलेली आहे त्या घटनेस देखील सहा दिवस उलटुन गेलेले आहे विज नसल्यामुळे सर्व पिके जळून चाललेली आहैत जनावरांच्या चारा पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असुन आपणच आमचे मायबाप आहात आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे या निवेदनावर देविदास देसाई, कल्याणराव जगताप, नबाजी जगताप, बाळासाहेब जाधव, नारायण जाधव ,बाळासाहेब गुंड, नंदकुमार लोंढे, वसंत बर्डे ,संपतराव होन, पंडीतराव थोरात ,विश्वनाथ जगताप, विकास पा थोरात, कचेश्वर जगताप, राजेंद्र जगताप, विश्वनाथ पवार ,वसंत लोखंडे, बाजीराव जगताप आदीच्या सह्या आहेत

बेलापूर: छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त नगररोड,वीर सावरकर चौक याठिकाणी शिवपुतळ्याचे पुजन व आरती बेलापूरचे भुमिपुत्र पोलिस उप अधीक्षक मिलिंद शिंदे साहेब (चंद्रपूर)यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यानिमित्ताने केशव गोविंद विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रशिक्षक अकबर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तलवार बाजीचे प्रात्यक्षिक सादर केले,या तलवार बाजीचे प्रात्यक्षिकास उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली व बक्षिसांची बरसात केली.या कार्यक्रमास मंडळाचे आधारस्तंभ सुनिल भाऊ मुथ्था,जि.प. सदस्य शरदराव नवले,पं.स.सदस्य अरुण पा.नाईक,सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे , रविंद्र खटोड, भरत साळूंके,सुधीर नवले, सुवालालजी लुंक्कड, प्रशांत लढ्ढा ,शांतीलाल हिरण ,अशोक गवते ,राजेश खटोड विलासनाना मेहेत्रे, लहानुभाऊ नागले,भाऊ डाकले, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, मारूती राशीनकर ,वैभव कुर्हे, भाऊसाहेब तेलोरे,सागर खरात, रमेश अमोलिक ,रावसाहेब अमोलिक ,महेश कुर्हे, मुश्ताक शेख ,प्रभात कुर्हे ,साईनाथ शिरसाठ, अमोल गाढे ,दिपक क्षत्रिय ,मोहसिन सय्यद ,आलम शेख ,समीर जाहगिरदार ,विलास सोनवणे ,सचिन वाघ ,राकेश कुंभकर्ण ,सागर ढवळे ,किशोर खरोटे , बाळासाहेब दाणी, पप्पू कुलथे,कलेश सातभाई , गजानन डावरे, शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच मंडळाच्या वतीने उद्या शनिवार दिनांक ११मार्च रोजी सायंकाळी ६वा.जे.टि.एस.हायस्कुलच्या समोरील मैदानावर प्रसिद्ध व्याख्याते श्री. सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे त्या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे व कार्याध्यक्ष राहुल माळवदे यांनी केले आहे.

बुलढाणा-देशभरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या, तसेच राज्यातील सर्वात मोठ्या  यात्रेपैकी एक असलेली. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रा आज सोमवारी रोजी आरंभ झाला असून. यात्रेचा शुंभारंभ जवळपास १० ते १२ ट्रक नारळाच्या महा होळीने करण्यात आला. करोनामुळे मागील ३ वर्षे यात्रा न भरल्याने, यंदाच्या वर्षी लाखो सर्वधर्मीय भाविकांनी हजरत सैलानी बाबा यात्रेस हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या होळीसाठी सैलानी बाबा दरगाह परिसरातील मुजावर परिवाराच्या शेतात, जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा घेऊन, महा होळीचे दहन करण्यात आले. यावेळी शेख रफिक मुजावर, पंचायत समिती ससदय शेख मुजावर,शेख शाफिक मुजावर व इतर मुजावर परिवारातील मान्यवरांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार रुपेश खंडारे ,रायपूरचे पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या सह लाखो भाविकांच्या साक्षीने, नारळांची महाहोळी प्रज्वलित करण्यात आली. दक्षतेचा भाग म्हणून अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावातील वातावरण अवैध व्यवसायामुळे दुषित होत असेल तर पोलीसांनी गावातील सर्वच अवैध व्यवसाय बंद करावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे                           प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की गावात चाललेल्या अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आली असेल तर गावातील सर्व अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावेत गावात गुटखा मटका जुगार बिंगो जुगार सर्व काही खुले आम सुरु आहे गावची शांतता धोक्यात आली असल्याचे वृत्त प्रकाशीत झाले असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय पोलीसांनी तातडीने बंद करावेत या बाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणार असुन हे व्यवसाय बंद न झाल्यास गावातील एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस राकेश ओला यांना भेटणार आहे गावातील कुणीही पुढारी अवैध व्यवसायाला पाठींबा देणारच नाही असे कुणी पुढारी अवैध व्यवसायाला गुपचुप पाठींबा देत असेल तर असे पुढारीही गावापुढे उघडे झालेच पाहीजे परंतु पुढाऱ्याच्या नावाखाली कुणी मलीदा लाटत असेल तर ते ही उघड झाले पाहीजे आम्ही केव्हाच अवैध व्यवसायाला पाठींबा दिलेला नाही आता या पुढे गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी बेलापुर ग्रामस्थांची मागणी आहे अवैध व्यवसायामुळे गावातील तरुण पिढी भरकटली आहे मटका गुटखा अन दारुच्या नशेत तरुण पिढी बरबाद होत आहे त्यामुळे गावातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी सरपंच साळवी यांनी केली आहे अवैध धंद्याबाबत आमदार लहु कानडे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आता बेलापुरचे प्रथम नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे त्यामुळे आता लोकप्रतिनिधीच आवैध धंद्याबाबत आक्रमक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-ग्रामीण भागाचा विकास होण्याकरीता दळणवळणाची साधने, रस्ते  चांगली हवीत .त्यामुळेच खेड्याची ,ग्रामीण भागांची प्रगती व्हावी या करीता आमदार लहु कानडे यांनी मतदार संघात रस्त्याची कामे वेगाने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद़्गार माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी काढले                                       बेलापुर हद्दीतील गायकवाड वस्ती सुभाषवाडी वळदगाव या दिड किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकर अंदाजीत  रुपये ४० लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभांरभ माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्या वेळी बोलताना कानडे म्हणाले की या रस्त्याच्या कामासंदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी वांरवार पाठपुरावा केला होता आमदार लहु कानडे यांनी मतदार संघातील सर्व रस्ते दुरुस्त करण्याचा चंग बांधला आहे असेही ते म्हणाले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक म्हणाले की आमदार लहु कानडे या तालुक्याचे लोकप्रतिनीधी झाल्यापासुन श्रीरामपुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत असेही नाईक म्हणाले या वेळी बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले म्हाणाले की सुभाषवाडी वळदगाव या नागरीकासाठी श्रीरामपुर कडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे तसेच विद्यानिकेतन शाळेत १५०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असुन हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी पालकांची अनेक दिवसापासुन मागणी होती ही मागणी आमदार लहु कानडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ या रस्त्याच्या कामास ४० लाख रुपयांचा निधी दिला असुन बेलापुर ते श्रीरामपुर या रस्त्याच्या कामास आमदार कानडे यांनी १६ कोटी रुपये दिले असल्याचे नवले यांनी सांगितले या वेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, श्रीकृष्ण ताम्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले .या वेळी डाँक्टर राजीव शिंदे, प्राचार्य शेळके ,किशोर नवले,अशोक भोसले,प्रमोद भोसले,दिपक निंबाळकर ,माजी सभापती दत्ता कुऱ्हे ,व्हा .चेअरमन पंडीतराव बोंबले,गणेश राशिनकर परिक्षित नवले ,विपुल नवले सागर नवले,अशोक नवले, संजय नवले ,महेश खंडागळे ,वैष्णव साळवे संदीप नवले आदिसह विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्रीरामपुर-मराठी भाषेत सर्व प्रकारचे साहित्य प्रकार उपलब्ध असल्याने ती सर्वंकष आणि समृद्ध आहे.त्यामुळे संपूर्ण जग मराठी भाषेचा गजर आणि जागर करीत असल्याचे प्रतिपादन पत्रकार व वात्रटिकाकार नवनाथ कुताळ यांनी केले आहे.

               मॉडेल इंग्लिश स्कुल येथे मराठी गौरव दिनाचे  आयोजन करण्यात आले होते  त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्या तृप्ती करीर होत्या.यावेळी मराठी गौरव पिठावर संस्थेच्या अध्यक्षा मैमकौरजी सेठी,संचालक रतनसिंगजी सेठी, बलजीत कौरजी सेठी,उपमुख्याध्यापक विनोद जोशी,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

उपप्राचार्य जोशी,सुतार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.नवनाथ कुताळ पुढे म्हणाले की मॉडेल इंग्रजी माध्यमाची शाळा असतानाही फक्त इंग्रजीचाच विचार न करता मराठी भाषाही समृद्ध ठेवली आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य ग्रंथ दिंडी काढली होती.तर पोवाडे,कविता,पंढरीची वारी अन भजने, स्फूर्ती गीते आदींसह मराठी साहित्य प्रकारातील वैविध्यपूर्ण सादरीकरण करून बाल पिढीतही मराठी भाषा कशी समृद्ध आहे हे दाखवुन दिले.

           स्वागत आयुष बागूल याने,परिचय कार्तिक आसने या विद्यार्थांनी तर प्राची सुर्यवंशी, तन्मय खटाणे,ओम शिंदे,अभिराज लोंढे यांनी मनोगत,कविता,पोवाडा सादर केला.विद्यार्थ्यानी ग्रंथदिडी,शिवाजी महाराज,विठ्ठल रूख्मिनी ,लेझिम,'होता जीवा म्हणून वाचला शिवा' यावर आधारीत पोवाडा, असे साहित्याचे अनेक पैलू सादर केले. आर्या लोंढे व आर्यन सरोदे यांनी सूत्रसंचालन केले तर आयुष बागुल याने स्वागत केले शेवटी विराज चौधरी याने आभार मानले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - आत्तापर्यंत मी सहा ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. त्यापैकी पाच ठिकाणी शिक्षण मंडळे होती. त्यामुळे नगरपालिका शाळांच्या समस्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत .वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील नगरपालिकेच्या सर्व शाळा अत्याधुनिक करण्यासाठी पालिकेने योजना तयार केली असून प्रत्येक शाळेला डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देणार आहोत.तसेच इतर सर्व भौतिक सुविधा पुरविल्या जातील. पालिकेची उर्दू शाळा क्रमांक पाच ही आमचा मानबिंदू आहे. या शाळेची प्रगती नेत्र दीपक असून आजच्या स्पर्धेच्या युगात शाळेने आपली पटसंख्या आणि गुणवत्ता टिकवून ठेवली. त्यामुळे ही शाळा आज जिल्ह्यात नावाजलेली आहे.पालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रिडा स्पर्धेत स्पर्धेत मिळवलेले यश भविष्यात शहराला नवीन खेळाडू मिळवून देतील असा आशावाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे यांनी व्यक्त केला.

येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच च्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक मुख्तार शाह होते. व्यासपीठावर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अविनाश आदिक,प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, नगरसेवक संजय छल्लारे,ताराचंद रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते मुक्तार मणियार, माजी नगरसेवक दत्तात्रय सानप, राजेंद्र सोनवणे, याकूबभाई बागवान,

कलीम कुरेशी,हिंद सेवा मंडळाचे सहसचिव अशोक उपाध्ये, खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जयंत चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अकिल सुन्नाभाई, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव गाडेकर, अनिल पांडे, महेश माळवे, रवी भागवत, संतोष मते,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, माजी अध्यक्ष रज्जाकभाई पठाण तसेच सरवरअली मास्टर, युवा नेते तौफिक शेख, जमील शाह, शफी शाह, फयाज कुरेशी, जाफर शाह,जिजामाता तरुण मंडळाचे उपाध्यक्ष संजय साळवे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नगरसेवक संजय छल्लारे तसेच अशोक उपाध्ये यांनी उर्दू शाळेच्या प्रगतीचा आवर्जून उल्लेख केला. मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली या शाळेची प्रगतीची घौडदौड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात नगरसेवक मुख्तार शाह यांनी शुभेच्छा दिल्या.

*आदिकांची फटकेबाजी*

या कार्यक्रमास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी अचानकपणे दिलेल्या  भेटी प्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगताने कार्यक्रमाची रंगत वाढवली.त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत व्यासपीठावरील उपस्थित माजी नगरसेवकांना चिमटे घेतले. हे सर्वजण माझे चांगले मित्र आहेत. यांच्यामुळे मी घडलो असे सांगत यातील अनेक जण मला दररोज मेसेज करीत असतात. वेगवेगळी चित्रे व फुले ते पाठवित असतात.मला आनंद एकाच गोष्टीचा आहे कि त्यांनी अजून कमळाचे फुल मला पाठवलेले नाही असे ते म्हणताच एकच हंशा पिकला.शाळा क्रमांक पाचच्या प्रगतीचे कौतुक करत अविनाश आदिक यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.

प्रास्ताविक भाषणात शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख यांनी शाळेमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल माजी अध्यक्ष रज्जाक पठाण यांचा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख, मुख्याध्यापक जलील शेख, शाळा क्रमांक सहाच्या उपाध्यापिका लता औटी यांचा सत्कार करण्यात आला तर शिरसगाव शाळेचे मुख्याध्यापक सिद्दीक शेख हे उमराह यात्रेसाठी रवाना होत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसे दुपारच्या सत्रात शाळेचे स्नेहसंमेलन पार पाडले यामध्ये सर्वच वर्गांनी बहारदार कार्यक्रम सादर केले विशेषतः शाळा क्रमांक नऊच्या बेटीया आणि शाळा क्रमांक पाच च्या कव्वालीने उपस्थित प्रेक्षकांची खूप व्हावा मिळवली .

होते. दुपार सत्रात शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, लिपिक रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे,माजी संचालक नानासाहेब बडाख,माध्यमिक सोसायटीचे संचालक सूर्यकांत डावखर, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर सय्यद,विकास मंडळाचे विश्वस्त प्रदीप दळवी, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष वाघमोडे, कार्याध्यक्ष शाम पटारे, गणेश पिंगळे, केंद्रप्रमुख वाघुजी पटारे, शिक्षक नेते जब्बार सय्यद, मुख्याध्यापक राजू थोरात,परवीन शेख, जावेद शेख,समीरखान पठाण,जलील शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget