Latest Post

बेलापुर ( प्रतिनिधी  )-कृषि प्रदर्शन अँग्रो वर्ल्ड २०२३ चा कृषि उद्योजक पुरस्कार सेंद्रिय व वैदिक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना प्रदान करण्यात आला                                   दिनाक ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान नाशिक येथील डोंगरे वसतीगृह मैदानात कृषि प्रदर्शन भरविण्यात आले होते या वेळी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सेंद्रिय  व वैदीक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते अँग्रो वर्ल्ड कृषि उद्योजक २०२३ हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे रासायनिक खते वापरुन मृत झालेल्या जमिनीला , शेतीला संजिवनी देण्याचे कार्य राम मुखेकर यांनी साँईल चार्जर टेक्नाँलाँजीच्या माध्यमातून सुरु केले अथक परिश्रमातून व संशोधनातून त्यांनी नैसर्गिक शेतीचे धडे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली पूर्व परंपरागत शेती सोडुन जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खते वापरुन शेती निर्जीव झाली त्या शेतीला कशाची गरज आहे यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना वैदीक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करुन दिले  रासायनिक शेती बंद करुन सेंद्रिय वैदीक शेती पिकवा आपले अन पुढील पिढीचे रोगापासून, आजारापसून संरक्षण करा रोगावर खर्च करण्याआगोदर पिकाच्या पोषणावर भर द्या पिकाला असलेल्या कमजोरीमुळे रोग येतो पिकाला पोषण भरपुर ताकद दिली तर रोगच येणार नाही  अशी त्यांची शेतकऱ्यांना शिकवण आहे शेतकऱ्यांच्या बांधावार जावुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची राम मुखेकर यांची पद्धत आहे आज महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ईतर राज्यातील शेतकरीही आता वैदीक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत राम मुखेकर यांच्या या कार्याची दखल घेवुन अँग्रो वर्ल्ड संस्थेच्या वतीने त्यांना या वर्षीचा कृषि उद्योजक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे .

कोपरगाव(गौरव डेंगळे)विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, यासाठी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव विविध स्पर्धा परीक्षांची दालन नेहमीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असते.या विद्यालयाचा विद्यार्थी कुमार अथर्व देवराम खेमनार याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी दिनांक ३१जुलै २०२२) ९१.६१% गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित सी व्ही रमण या परीक्षेत अथर्वने राज्यात चौथा क्रमांक मिळविला. तसेच ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक लेखी परीक्षेत अथर्व खेमनर याने यशस्वी होऊन चमकदार कामगिरी केली असून पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या  कुमारी स्वरा दत्तू शिंदे ७४.८९%, कुमारी सृष्टी नितीन वावधने ७१.१४ % आणि कुमारी ग्रीष्मा शरद कांबळे ६८.५५% या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे शारदा विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला. त्यांच्या या उत्तुंग भरारी बद्दल शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री सुहास गोडगे, माननीय प्राचार्य श्री के एल वाकचौरे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दिला जाणारा श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज  समाज भूषण पुरस्कार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बेलापुर येथील धडाडीचे कार्यकर्ते अरुण पा नाईक यांना तर डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहीती फाउंडेशनचे

अध्यक्ष रणजीत बनकर यांनी दिली आहे.सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दर वर्षी श्री  श्री १०८स्वामी रामदासजी महाराज समाज भूषण व जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते  संस्थेचे पुरस्कार वितरणाचे हे सलग दहावे वर्ष आहे श्री श्री स्वामी रामदासजी महाराज हे गेली ३८ वर्षापासून बारा महीन्यातुन एक महीना पढेगाव येथे वास्तव्यास राहतातया एक महीन्याच्या काळात ते धार्मिक व समाज प्रबोधनाचे काम करतात हीच प्रेरणा घेवुन नेताजी सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वामीजींच्या नावाने समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार देण्याची संकल्पना सुरु केली पढेगाव व स्वामीजींचा संपर्क असलेल्या गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहे या वर्षीचा समाज भूषण पुरस्कार सामाजिक  व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांना जाहीर झाला असुन पशु वैद्यकिय क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उक्कलगाव येथील ह भ प उल्हास महाराज तांबे कृषि क्षेत्रात कार्य करणारे लक्ष्मण बंगाळ तसेच धार्मिक व अध्यात्मीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे ह भ प अमोल महाराज बडाख व युवा उद्योजक चंद्रशेखर गोरे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे तर पशु वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे व आदर्श माता म्हणुन ग भा   ताराबाई काळे यांना जिवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी मंगल कार्यालय हनुमान मंदीर पढेगाव येथे सकाळी दहा वाजता श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहीती नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष रणजीत बनकर वतीने देण्यात आली असुन या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- विदेशात वैद्यकीय शिक्षणघेतल्यानंतरही भारतात मेडिकल प्रॅक्टीस अर्थात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई(विदेशी चिकित्सा स्नातक परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मात्र, ही परीक्षा पास न होताच औरंगाबाद येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तालुक्यातील देऊळगाव माळी येथील एका डॉक्टरवर केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने छापे घालून त्यांच्याकडून दस्तावेज जप्त केलेत.तसेच, कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे. देशभरातील ७३ डॉक्टर्सवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यात मेहकर येथील डॉ. विनायक अभिमन्यू मगर यांच्या औरंगाबाद येथील दवाखान्यावर देखील छापा घालण्यात येऊन, दस्तावेज व सामग्री जप्त करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच मोठमोठे शहरांमध्ये मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे नुकताच अहमदनगर जिल्ह्यात नेवासा या ठिकाणी नेवासा फाट्यावर श्वास हॉस्पिटल याला देखील आपल्याकडील योग्य ते दस्तावेज आठ दिवसात दाखल करावे या करीता पंचायत समिती आरोग्य अधिकारी यांनी नोटीस बजावली होती मात्र त्यानंतर देखील दवाखाना सुरू असल्याचं वृत्तवाहिन्यांनी वर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि पंचायत समिती अधिकारी आरोग्य अधिकारी यांचे दाबे दणाणले त्यांना त्या क्षणी जाग आली आणि पुन्हा नोटीस बजावण्यात आली व श्वास हॉस्पिटल यास सील करण्यात आले अशाच अनेक मुन्नाभाई डॉक्टरांवर आता सीबीआयची कारवाई होणार याकरिता आता बोगस डॉक्टरांचे धावपळ झाली आहे या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. याप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या १४ मेडिकल काउन्सिल्सलादेखील चौकशीच्या घेऱ्यात घेतले आहे.

बेलापूर (वार्ताहर) येथील नाभिक समाज संघटनेच्या वतीने शहीद भाई वीर कोतवाल यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. वीर भाई कोतवाल चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रवींद्र खटोड, सुधीर नवले, शरद नवले, भरत साळुंके, चंद्रकांत नाईक, प्रसाद खरात , वैभव कु-हे, पुरुषोत्तम भराटे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.क्रार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे स्थानिक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सुनिल सोनवणे, गोरक्षनाथ कणसे, रमेश कुटे, विजय हुडे,नंदु भागवत,सागर हुडे, सतीश सोनवणे, विजय शेजूळ, निलेश हुडे, कृष्णा भागवत, योगेश बोरसे, नवीन भागवत, गणेश कणसे, आनंद वैदय, बबनराव रावताळे आदींनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूर - महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात खाजगी कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवाना न मिळणेबाबत महावितरण च्या अधिकारी कर्मचारी  संपाला आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा दिला यावेळी कामगार नेते नागेश सावंत तसेच महावितरणाचे सर्व अधिकारी कर्मचारी,व आप'चे कार्यकर्ते उपस्थित होते,महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा महावितरण मध्ये खाजगी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षारक्षक कामगारांना कायम करा तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा इम्पेनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरण मधील 2019 नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रात कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा या मागण्यांसाठी हा संप चालू आहे, राज्यातील महसुली दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा ठाणे नवी मुंबई उरण, पनवेल ,तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाचे समांतर परवानासाठी अर्ज आलेला आहे असा परवाना देण्यात आला तर राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील सदरचे ग्राहक जर महावितरण कंपनीकडून खाजगी भांडवलदार यांच्याकडे गेले तर उर्वरित वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो व त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात वाढीव वीजदरामुळे वीज वापर करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसणार, अदानी हे पंतप्रधान  यांचे चांगले मित्र आहे आणि म्हणूनच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि आदानींच्या फायद्यासाठी देशातील एअरपोर्ट, बीएसएनएल, भारतातील बंदरे, व धारावली पूर्ण विकास प्रकल्प आणि आता महावितरण कंपनीला सुद्धा आदानी यांना देण्याचा सरकारचा डाव आहे हे सर्व राजकीय स्वार्थ व आदांच्या फायद्यासाठी चालू असल्याचा आरोप आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केला,

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील पोहेगाव येथील बाजारतळाजवळील डोर्‍हाळे रोड लगत असलेल्या बंधार्‍यात रविवार 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या पूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली होती.शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवी 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ काही तासांत गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.सदर गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मयत सोमनाथ शंकर कल्लारे (वय 33 रा. रांजणगाव, ता. राहाता) मित्रासमवेत खटकळी येथे रात्रीच्या वेळी वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी करत असताना मयताने एकाचा मोबाईल घेऊन मारहाण केली. तो निघून गेला. मात्र इतर मित्रांनी का त्रास देतो असे म्हणत असताना झालेल्या मारहाणीत मयत जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.31 डिसेंबर रोजी मृतदेह दोन दुचाकी वरुन गोणीत बांधुन मृतदेह पोहेगाव येथे फेकून देण्यात आला. या खुनात संशयित म्हणून दिनेश फुलचंद बनसोडे (वय 22), सचिन उत्तम पवार (वय 22), प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय 22), सिध्दांत प्रमोद निकाळे (वय 20) सर्व राहणार राहाता या चौघांना शिताफीने पकडण्यात आले असून आणखी संशयिताचा शोध सुरू आहे.या खुनात जो मयत आहे त्यांच्यावर लोणी, राहाता पोलीस स्टेशन मध्ये 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात अटक करणार्‍या आलेले 4 आरोपी व पसार असलेले 3 आरोपी यांच्यावर राहाता- शिर्डी तसेच विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरी तसेच विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे, संभाजी पाटील, अंजय अंधारे, नितीन शेलार, सुर्यकांत ढाके संदिप गडाख, राजवीर बिरदवडे यांनी काम पाहिले. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध लावला त्याबद्दल त्यांच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget