बेलापुर (प्रतिनिधी )-नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दिला जाणारा श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज समाज भूषण पुरस्कार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बेलापुर येथील धडाडीचे कार्यकर्ते अरुण पा नाईक यांना तर डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहीती फाउंडेशनचे
अध्यक्ष रणजीत बनकर यांनी दिली आहे.सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दर वर्षी श्री श्री १०८स्वामी रामदासजी महाराज समाज भूषण व जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते संस्थेचे पुरस्कार वितरणाचे हे सलग दहावे वर्ष आहे श्री श्री स्वामी रामदासजी महाराज हे गेली ३८ वर्षापासून बारा महीन्यातुन एक महीना पढेगाव येथे वास्तव्यास राहतातया एक महीन्याच्या काळात ते धार्मिक व समाज प्रबोधनाचे काम करतात हीच प्रेरणा घेवुन नेताजी सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वामीजींच्या नावाने समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार देण्याची संकल्पना सुरु केली पढेगाव व स्वामीजींचा संपर्क असलेल्या गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहे या वर्षीचा समाज भूषण पुरस्कार सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांना जाहीर झाला असुन पशु वैद्यकिय क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उक्कलगाव येथील ह भ प उल्हास महाराज तांबे कृषि क्षेत्रात कार्य करणारे लक्ष्मण बंगाळ तसेच धार्मिक व अध्यात्मीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे ह भ प अमोल महाराज बडाख व युवा उद्योजक चंद्रशेखर गोरे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे तर पशु वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे व आदर्श माता म्हणुन ग भा ताराबाई काळे यांना जिवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी मंगल कार्यालय हनुमान मंदीर पढेगाव येथे सकाळी दहा वाजता श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहीती नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष रणजीत बनकर वतीने देण्यात आली असुन या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post a Comment