श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या अथर्व खेमनार शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ६ वा.

कोपरगाव(गौरव डेंगळे)विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, यासाठी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव विविध स्पर्धा परीक्षांची दालन नेहमीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असते.या विद्यालयाचा विद्यार्थी कुमार अथर्व देवराम खेमनार याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी दिनांक ३१जुलै २०२२) ९१.६१% गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित सी व्ही रमण या परीक्षेत अथर्वने राज्यात चौथा क्रमांक मिळविला. तसेच ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक लेखी परीक्षेत अथर्व खेमनर याने यशस्वी होऊन चमकदार कामगिरी केली असून पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या  कुमारी स्वरा दत्तू शिंदे ७४.८९%, कुमारी सृष्टी नितीन वावधने ७१.१४ % आणि कुमारी ग्रीष्मा शरद कांबळे ६८.५५% या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे शारदा विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला. त्यांच्या या उत्तुंग भरारी बद्दल शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री सुहास गोडगे, माननीय प्राचार्य श्री के एल वाकचौरे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget