महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला आप'चा जाहीर पाठिंबा- तिलक डुगंरवाल
श्रीरामपूर - महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात खाजगी कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवाना न मिळणेबाबत महावितरण च्या अधिकारी कर्मचारी संपाला आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा दिला यावेळी कामगार नेते नागेश सावंत तसेच महावितरणाचे सर्व अधिकारी कर्मचारी,व आप'चे कार्यकर्ते उपस्थित होते,महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा महावितरण मध्ये खाजगी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षारक्षक कामगारांना कायम करा तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा इम्पेनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरण मधील 2019 नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रात कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा या मागण्यांसाठी हा संप चालू आहे, राज्यातील महसुली दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा ठाणे नवी मुंबई उरण, पनवेल ,तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाचे समांतर परवानासाठी अर्ज आलेला आहे असा परवाना देण्यात आला तर राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील सदरचे ग्राहक जर महावितरण कंपनीकडून खाजगी भांडवलदार यांच्याकडे गेले तर उर्वरित वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो व त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात वाढीव वीजदरामुळे वीज वापर करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसणार, अदानी हे पंतप्रधान यांचे चांगले मित्र आहे आणि म्हणूनच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि आदानींच्या फायद्यासाठी देशातील एअरपोर्ट, बीएसएनएल, भारतातील बंदरे, व धारावली पूर्ण विकास प्रकल्प आणि आता महावितरण कंपनीला सुद्धा आदानी यांना देण्याचा सरकारचा डाव आहे हे सर्व राजकीय स्वार्थ व आदांच्या फायद्यासाठी चालू असल्याचा आरोप आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केला,
Post a Comment