Latest Post

श्रीरामपूर(गौरव डेंगळे):विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाच्या प्रेमात पडावे.आज विद्यार्थीचे ध्येय दिवसाला दीड जीबी डाटा संपवणे बनलेले आहे.दीड जीबी डाटा रोज संपवणे आजच्या तरुण पिढीचे राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे का? असा सवाल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित केला.न्यू इंग्लिश स्कूलचे महत्व विशद करताना त्यांनी हे ही सांगितले की आई ही मुलांची पहिली शाळा आहे,तर शाळा ही मुलांची पहिली आई असते.

आजची तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असून यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक व आपल्या अभ्यासातील प्रगतीसाठी करावा.पोलीस दलातील माणसे हे परग्रहावरील नसून ती आपल्यातलीच आहे असं प्रत्येकाने समजलं पाहिजे. पोलीस दलामध्ये कार्य करत असताना त्यांनी आपले अनेक अनुभव विद्यार्थ्यां व पालकांसमोर श्री मिटके यांनी व्यक्त केले.

वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप मिटके,अविनाश कुदळे, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे,अनुजा टेकावडे,प्रतीक्षित टेकावडे,बाळासाहेब ओझा,विधिज्ञ दादासाहेब औताडे,संगीता कासलीवाल, अरुण पुंड,प्राचार्या जयश्री पोडघन,प्राचार्य डॉ योगेश पुंड आदींच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक सत्र २०२१-२२ वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून हिरण जेठवा हिचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात २०१९ ते २०२१ पर्यंत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यानंतर ज्युनिअर के जी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व वाहवा मिळवली.

 वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करताना शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर २४ डिसें.: श्रीराम अकॅडमी सी.बी.एस.ई. शाळेचा १४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार, दि. २० डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 'पौर्वात्य-पाश्चात्य' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम डावखर लॉन्स, गोंधवणी रोड या सभागृहात सादर करण्यात आला. 

           विविध कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.  मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष तसेच पाल्यांना जबाबदारीचे जाणीव करून देणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच हिंदी अथवा मराठी भाषेतून आपण ऐकलेल्या जाहिरातीचे संस्कृत भाषेतून सादरीकरण करण्यात आले. 

               यावेळी कॅनरा बँक, श्रीरामपूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक नंदराज कुमार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; तसेच भैरवनाथ नगर ग्राम पंचायतीचे सरपंच भारत तुपे,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन राम टेकावडे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,ॲडव्हायझरी कमिटी सदस्या,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पुंड हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका जयश्री पोटघन यांनी शालेय वार्षिक अहवाल सादर केला.

           वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . बालचमुंनी कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. ' रामायण महाभारतावरील नृत्य सादरीकरण' कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सोहळ्याची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली. व्यवस्थापन समितीकडून कौतुकाची थाप मिळाल्यावर सोहळ्यासाठी सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे शालेय १९ वर्षाखालील मुला-मुलींचे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हाभरातून १४ तालुक्यातील विजयी संघ सहभागी झाले होते. श्रीरामपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने पहिल्या सामन्यात अकोला तालुका, दुसऱ्या सामन्यात राहुरी तालुका तर उपांत्य फेरीचा लढतीत श्रीगोंदा तालुक्याचा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रीरामपूर तालुक्याचा सामना रंगला तो बलाढ्य नेवासा संघाबरोबर.भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी नेवासाची रक्षा खेनवार तिच्याविरुद्ध खेळताना श्रीरामपूरच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. श्रीरामपूर संघाची कर्णधार खुशी यादव,वेदश्री नवले,सुहानी यादव, समृद्धी अभंग, त्रिशा वाघ, श्रावणी पवार,प्राप्ती जैत, देवांशी यादव, समीक्षा शिवरकर आधी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. उपविजेता संघाला क्रीडाशिक्षक नितीन गायधने यांचा मार्गदर्शन लाभले. उपविजेत्या संघाचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब घाडागे पाटील,सचिव प्रतीक्षित टेकावडे,सदस्य विधीज्ञ दादासाहेब औताडे,बाळासाहेब ओझा, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष पार्थ दोशी,प्राचार्या जयश्री पोडघन, प्राचार्य डॉ योगेश पुंड,पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव दादासाहेब तुपे,नितीन बलराज, नितीन तमनार तसेच शाळेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


कोट: उपविजेता श्रीरामपूर संघाला त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री साहेबराव घाडगे पाटील यांच्याकडून विशेष ₹ १५००/- रुपये पारितोषिक देण्यात आले. यावेळी घाडगे पाटलांनी व्हॉलीबॉल व इतर खेळांना लागेल ती मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या.१४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.

या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील श्रीगोंदा तालुका तर अंतिम सामन्यात नेवासा तालुका संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करेल. विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती, शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

राहुरी प्रतिनिधी-प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की, राहुरी पोस्टे गु.र.नं ॥ ११५६/ २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधिक्षक सो अनगर व श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर भाग यांनी पोनि / प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. सदर आदेशाप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनकडील पोनि / प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेत आली आहे.

     नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी पोसई खोंडे, सफौ/चंद्रकांत ब-हाटे, पोहेकॉ/दिनकर चव्हाण, पोहेकॉ / सोमनाथ जायभाय, पोना/ अमित राठोड, पोकों / अदिनाथ पाखरे, पोकों/सचिन ताजणे, पोकों / संतोष राठोड, पोकों/गणेश लिपणे, पोकॉ/नदिम शेख .पोकॉ/ अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते.सदर बाबत पोनि प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १) अभिषेक बाबासाहेब हुडे २) हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा. उंबरे ता. राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे. गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३)जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४) छोट, उर्फ सौरभ संजय दुशिंग ५) राहुल दादु वैरागळ सर्व रा. उंबरे ता. राहुरी जि. अनगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, TATA कंपनीची ACE मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला सो, पोलीस अधिक्षक, अ.नगर श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व श्री संदिप मिटके सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.


श्रीरामपूर : शहरा नजीक असलेल्या, जिल्हा परिषद शाळेतील एका लिंग पिसाट शिक्षकाने, शाळेतील अल्पवयीन मुलीच्या मोबाईल वर अश्लील मेसेज पाठविल्याचे,मुलीच्या  पालकांच्या लक्षात आल्याने. संताप झालेल्या पालकांनी, जिल्हा परिषद वस्ती शाळेतील लिंग पिसाट शिक्षकाला एकदा नाहीतर सलग २ दिवस चांगलाच चोप दिल्याने. गावात चर्चेला उधाण आले असून. शिक्षकी पेशास काळिमा फासणा-या, शिक्षका विरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली जात असून. या प्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारचा तक्रार दाखल झाली नसून. या लिंग पिसाट शिक्षकला चोप दिल्याने, इतर चांगल्या शिक्षकांकडे देखील. पाहण्याचा दृष्टिकोन बदल असल्याने, अशा सडक्या कांद्यांमुळे पवित्र समजल्या जाणारा शिक्षकी पेशा बदनाम होत असून. अशा नितीहीन आणि लिंग पिसाटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी, महिला वर्गातून केली जात आहे.

श्रीरामपूर : लग्नाचा बनावा करून, एका विशिष्ट समाजाच्या मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या, युवराज शिंदे या जिम मालका विरोधात, पीडित मुलीच्या तक्रारीवरून १० डिसेंबर रोजी भादवी कलम ३७६, ३७६ (२), एन, ४२०,३२३, ५०४, ५०६ अन्वये, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी फरार होता. सदर आरोपीस अटक करून, कठोर कारवाईच्या मागणी करिता. विविध संघटनांनी मोर्चा देखील काढला होता. या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली,मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे,पोलीस नाईक गौतम लगड,राहुल नरवडे, रमीज अत्तार, गणेश गावडे,अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक प्रमोद जाधव फुरकान शेख आदींच्या पथकाने, पुणे जिल्ह्यातील खडक वासला येथुन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी युवराज शिंदे यास, सायंकाळी जेरबंद करून. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजार केले असून. मुलीवरील अत्याचार प्रकरणी १० डिसेंबर रोजी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget